“दोष फक्त तिचा च असतो” ©दिप्ती अजमीरे

Written by

दोष फक्त तिचा च असतो
तिने सहन केलं तरी…
आणि विरोध केला तरी…

दोष फक्त तिचा च असतो
ती माय बनली(लग्नाआधी) तरी…
ती माय नाही बनली(लग्नानंतर) तरी…

दोष फक्त तिचा च असतो
गर्भिणी असली तरी…
गर्भपात झाला तरी…

दोष फक्त तिचाच असतो
ती शिकली तरी…
तीने शिकवलं तरीही…

दोष फक्त तिचाच असतो
ती कमावती असली तरी…
ती कमावती नसली तरी…

दोष फक्त तिचा च असतो
संसार फुलवला तरी…
संसार गमावला तरी ही…

दोष फक्त तिचा च असतो
कधी ती अजाण असली तरी…
आणि नसली तरी…

दोष फक्त तिचा च असतो
ती एक स्त्री असली तरी…
ती एक सुखसाधना असली तरी…

दिप्ती अजमीरे

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा