द अनटर्न पेज ….संपूर्ण

Written by

THE UNTURN PAGE

राजदीप गाडी पार्किंग मधून बाहेर काढत होता आणि फाईल, हॅन्डबॅग अस सगळ सांभाळत स्वरा

तिथे पोहोचली , आत बसता बसता, “खूपच उशीर होईल कारे ? फर्स्ट मीटिंग आहे नवीन क्लायंट बरोबर”

राजदीप: नाही ग पोहोचू शून्य मिनिटांत.

स्वरा: हो ४५ km शून्य मिनिटांत

राजदीप: गम्मत केली ग,तासभरात पोहोचू,वेळेच्या आधी जाऊ; अस म्हणत त्याने FM चालू केला आणि “ ये रेशमी जुल्फे” ऐकल्यावर स्वराकडे पहिल तसा तिने मोठे डोळे करून गाडी कडे लक्ष दे असा खुणावल हुकुमाचा ताबेदार असल्याप्रमाणे राजदीप हसला आणि म्हणाला “ जो हुकुम मेरे आका”

राजदीप आणि स्वरा देसाई ३ वर्षांपूर्वी ह्याचं लग्न झाल. ते एकमेकांना अगदी लहान असल्यापासून ओळखत होते कारण शेजारी शेजारी राहत होते, एकाच शाळेत , कॉलेज मध्ये आणि मग अर्कीटेकट पण एकत्रच झाले. नाही म्हंटले तर फक्त स्वराचे बाबा रिटायर झाल्यावर ती फॅमिली साधारण २ वर्ष मुंबईला गेले आणि मग स्वरा राजादिपाशी लग्न करून पुन्हा पुण्यात आली. विरहामुळे त्यांना त्यांचे प्रेम उमगले असावे. असो तर ह्या दोघांनी लग्न झाल्यावर जॉब सोडून त्यांची फर्म सुरू केली. राजदीप अत्यंत कष्टाळू तर स्वरा हुशार आणि क्रिएटीव त्यामुळे ३ वर्षांत त्यांचा चांगला जम बसला. आज त्यांना प्रसिद्ध उद्योगपती गणेश काकडे ह्यांच्या मुलाच्या नवीन प्रोजेक्टसाठी बोलावलं होत. त्याने तशी माहिती गोळा केली होती की राजस्व builders साठी काही landscaping and gardening करायचा आहे तो स्वराचा प्रांत होता पण first मीटिंग म्हणून राजदीप पण निघाला होता, साधारण तासाभरात ते पोहोचले तिथे , reception मध्ये एक मुलगा होता त्याने आत जा असे सांगितले स्वरा पुढे झालि आणि दीप (राज दीप ला ती दीप म्हणत असे) लॅपटॉप घेऊन येत होता. स्वरा आत गेली आणि थबकली, राजेश? त्यानेही स्वराला पहिले. त्याचीही काही वेगळी अवस्था नव्हती तीतक्यात दीप आंत आला आणि फोर्मल मीटिंग सुरु झाली अवघडलेपणा लपवण्यात दोघेही यशस्वी झाले. प्लॉट बघण्यासाठी तिघे बाहेर पडले पण अचानक दीप ला कॅाल आला म्हणून तो बाजूला गेला. “ तू परत यायला नको होतास स्वरा” राजेश म्हणाला. प्रचंड दुखावलेला वाटत होता. “ हा निव्वळ योगायोग आहे राज आणि तुला ते माहिती आहे, आपण काम करू शकतो be practical” स्वरा म्हणाली

राजेश : वाह तू अजूनही तशीच आहेस अस म्हणत रागाने राजेशने त्याचा हात बाजूच्या ग्लास मॉडेल वर मारला आणि तो रक्तबंबाळ झाला सगळे जमा झाले दीप पण आला .

राजेश : दीप आपण पुन्हा कधीतरी मीटिंग करू आता हे..

दीप : ok पण आधी तुम्ही ड्रेसिंग तर करून घ्या .. आम्ही निघतो

स्वरा केव्हाच बाहेर आली होती दीप तिला शोधात आला “ अग कस लागल त्यांना ??” “

“काही कळलच नाही “स्वरा म्हणाली. “चल निघूया का आपण?”

वर वर जरी खूप शांत दिसत असली तरी ती आतून पुरती धास्तावली होती, राज परत का आलाय?? पुण्यात त्याच काय काम?? आजची मीटिंग खरच योगायोग होती की आणखी काही ?? राजस्व हे नाव म्हणजे राजेश आणि स्वरा. तो विसरला नाही का मला ?? पण मी का इतका विचार करतीये ?? माझ काही चुकलेल नाही मी माझ्या जागी बरोबर आहे.

पण दीपच काय त्याला जेव्हा जेव्हा मी राजेश किंबहुना माझ्या भूतकाळाबद्दल बद्दल सांगायचा प्रयत्न केला तेव्हा तो मला नेहमीच म्हणाला की” तु माझ्यासाठी open book आहे. आपण एकत्रच होतो नेहमी. आगदि बालवाडी पासून आतापर्यंत “

कस सांगू त्याला there are some unturn pages too क्रमश:

***************************************************************************************************************************************

“कॉफी ??” दिपच्या प्रश्नाने स्वरा भानावर आली एव्हाना ते ऑफीसच्या अगदी जवळ असणाऱ्या CCD जवळ पोहोचले होते, अर्थात स्वराला आत्ता कॉफीची खूप गरज होती त्यामुळेच ती पटकन हो म्हणाली आजच्या मीटिंगचा विषय टाळत ती इतर कामाविषयी बोलत राहिली,तिची ही कसरत दिपच्या लक्षात आली नाही हे नशीब.

तिकडे राजेश घरी गेल्यावर नीताचे हातावरच्या ड्रेसिंग कडे लक्ष गेले “ काय रे हे??” , राजेश काहीच न बोलता रूममध्ये निघून गेला आणि लॉक करून घेतले त्याच्या विक्षिप्त पणाची पुरेशी प्रचीती असल्यामुळे तिने शांत राहणे पसंत केले. ऑफिस मध्ये करंजकर काकांना कॉल करून तिने काय झालाय ह्याची महिति घेतली. निता राजेशची बायको तिचे वडील राजेशच्या वडिलांचे पार्टनर पण आता ते त्यांच्या मुलाकडे ऑस्ट्रेलियाला कायमचे स्थायिक झालेत त्यांचे सगळे शेयर्स निताच्या नावावर करून पण त्यासाठी तिने राजेशशी लग्न करावं ही अट होती राजेशच्या वडिलांनी पण त्याला इमोशनल ब्लॅकमेल करून लग्न करायला भाग पाडले पण हे दोघे मित्र असल्याने त्यांची आधीच ओळख होती , राजेश आणि स्वरा हे समीकरण निताच्या पाहण्यातलं होत आणि नीताचा इंटरेस्ट फक्त तिच्या करीयर वर होता तिला पेंटींग मध्ये गती होती आणि तसे शास्त्रीय शिक्षण तिने जे जे स्कूल ऑफ फाइन आर्ट मधून घेतले होते लग्नानंतर ते मनाने खूप जवळ आले म्हणूनच स्वराच कुठल्याही कारणाने त्याचा आयुष्यात परत येणं तीला खटकत होतं पण अर्थात ती ते उघडपणे मान्य करणार नव्हती ,करण राज सारखा जवळच मिञ तिला गमवायचा नव्हता आणि तो चुकेल असं वाटत नव्हतं आज जरी तो गोंधळून चुकीचे वागला होता तरी तो नक्कीच त्याचा उद्देश पूर्ण करेल ह्यावर निताचा विश्वास होता.

जरा वेळाने राज फ्रेश होऊन आला “ wow नितु अमेझींग painting पण हे सरळ कसं बघायचं ?? म्हणजे उभ की आडवं ??” नितुने पेंट ब्रश खाली ठेवला आणि बाजूची उशी राजला फेकून मारली त्याने ती हसतच झेलली
नीतू: दुखतंय का फार ??
राज: नोप, I am alright ,मि पुन्हा तसाच वागलो ती समोर आली आणि मला माहित नाही इतका राग आला ,जे सांगण्यासाठी हे सारं जुळवून आणलं होतं ते राहील आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या, मला नाही वाटत आता ती काही काम करेल आपल्या बरोबर हेच एक निमित्त होत ते पण…
नीतू: पण तुला राग कशाचा आला नेमका ? सकाळपर्यंत तर तुझा प्लॅन वेगळा होता.
राज : तिला केबिन मध्ये बघून मि स्तब्ध झालो काही क्षण , तिचे डोळे तसेच खूप बोलके , तीही तशीच सुंदर अजून जास्त उन्मादक पण तितक्यात राजदीप आला; तिचा नवरा , तो तिच्या बरोबर, कसं सांगू तुला नितु नकळत माझ मन तुलना करायला लागल तो आहे तिथे मि असायला हव असही वाटलं आणि त्यांची केमिस्ट्री बघून मला राग येत गेला आणि त्याचाच हा परिणाम . ( राज हाताकडे बघत म्हणाला)
नीतू त्याच्याजवळ बसली त्याचा केसातून हात फिरवत त्याच्याकडे एकटक बघत होती त्याने बघताच तिने नजर वळवली आणि जायला उठली त्याने तिचा हात धरुन तिला बसवलं “ तू तरी मला समजून घे plz, हे अवघड आहे पण मी ते करिन ” राज म्हणाला त्यावर नितु फक्त हसली.

इकडे स्वरा मात्र त्यारात्री झोपू शकली नाही हे कॉन्ट्रॅक्ट आपण नाही घेतलं तर चालेल का असा तिने दीपला विचारलं तेव्हा तो कमालीचा चिडला त्याचही बरोबर होतं एकदा हो म्हंटल्यावर withdraw करण हे unprofesional वाटत ,पण स्वरा त्याच एकत नव्हती मग थोडा वाद झाला

सकाळी सकाळी दीप कॉफी घेऊन आला पण एकट्यासाठी आता मात्र स्वरा जरा चिडली

स्वरा : मला ??

दीप : करून घे

स्वरा : तुझ्या हाताची हवी होती ( ती दीपच्या जवळ जाऊन म्हणाली)

दीप : स्टे अवे … माझा राग गेला नाही अजून

स्वरा: पण ( ती रडवेली झाली )

दीप : dont do this , हे ऑफिशियल कंमिटमेन्ट आहे आजच्या आज ब्लू प्रिंट्स आणि ppt राजस्व मध्ये ई-मेल करायला हवय, नो डिस्कशन

तो अंघोळीला गेला

स्वराला काहीच सुचत नव्हतं, आणि दीप ऑफिस वर्कसाठी सिरीयस आहे हे ती पुरत जाणून होती , म्हणून माघार घेत तिने काम करायचं ठरवलं संध्याकाळ पर्यंत मेल करून तिच्या असिस्टंट ला राजस्व मध्ये कॉ ऑर्डीनेट करायला लावून आजपुरात तरी तिने त्याला टाळलं होतं.

आवाज दिवसभर दीप बाहेर होता कामानिमित्त सो ती एकटीच घरी आली पहाटते तर दीप महाशय पोहोचले होते मावशी जेवण बनवत होत्या, ती काहीही न बोलता आत गेली दीपही पाठोपाठ गेला त्याला साधारण कल्पना होती कि ती रागावली असेल , ती चेंज करायला बाथरूम मध्ये जात होती हा मध्येच आडवा उभा राहिला तिने डोळ्यानेच विचारले काय??

दीप: मदतीला येऊ का ?? त्याने मिश्किल हसत विचारलं

तिला जवळ खेचलं , तिच्या डोळ्यात रोखून बघत राहिला , हे अस पाहिल्यावर स्वरा क्षणभर का होईना त्याच्या डोळ्यात हरवली आणि भानावर आल्यावर हे प्रेम असच कायम राहील का ? ह्या विचाराने तिचे डोळे भरून आले आणि ती दीपच्या आलिंगनात बंदिस्त झाली, किती सुरक्षित वाटतंय माझं फक्त दिपवर प्रेम आहे आणि ते असच राहणार आहे कायम, जर त्याला सत्य कळलं आणि तो दुरावला तर, पण मग मीच सांगते त्याला सगळं त्याला एकावच लागेल राज का परत आलाय हे शोधायला हवाच पण त्याआधी ह्या भावनिक आंदोलनांतून मला मोकळं व्हाव लागेल द्विधा मनस्थितीत कोणताही पाऊल उचलण अविववेकी असेल.

असो आता बघू स्वरा दिपला काय सांगणार ?? राज परत का आलाय? ? नीताचे प्रेम तिला कळेल ?? आणि राजला ती अडवू शकेल ?

***************************************************************************************************************************************

मी पत्र लिहू की मेल करू ?समोरासमोर दीपला काही सांगण मला जमणार नाही तो कसा react होईल हे सांगता येत नाही त्याला आपली फसगत झाली असा तर वाटणार नाही ना मी तेव्हाच बाबांना सांगितलं होत दिपला सर्व गोष्टींची कल्पना द्या, ते मला म्हणाले मी बोलतो, म्हणून मी निर्धास्त झाले पण तेही नाही बोलले आता समोर असा भूतकाळ उभा आहे त्याला समोर जानं जरा कठीण जाणार आहे असे बरेच विचार स्वराच्या डोक्यात चालू होते पहाटे पासून ती जागीच होती ” चुळबुळ बंद कर ग आता तरी , रात्रभर झोपू दिल नाहीस ” दीप तिला चिडवत म्हणाला आणि ती भानावर आली ” . “काय ?मि झोपु दिलं नाही “ती लटक्या रागाने म्हणाली ,दोघेही हसले

पण दिपला जरा स्वराच वागणं खटकलं होत ती खूपच इमोशनल झाली आहे असा विचार करत त्याने आवरायला घेतलं ” आज काही urjant commitments आहेत का ??” स्वराने आवरता आवरता दिपला विचारले ” नाही का ग ?? ” तो कॉफी घेत म्हणाला ” मला काही सांगायचय ” तीच वाक्य पुर्ण होतें न होते तेच मोबाईल मध्ये बघत तो जवळ जवळ किंचालाळ्या सारखा म्हणाला ,” अरे यार त्यांनी तुझा प्लॅन रिजेक्ट केलाय , त्यात काहीच इंनोवेटीव्ह नाही असं राजेश सरांना वाटतय सो त्यांना परत नवीन प्लॅन हवाय आणि आधी ते मीटिंग करून मग पुढे ठरवू असा मेल आलाय ”

” हे होणारच होत , हेच सांगणार होते तुला ” , “म्हणजे ???”

” काही गोष्टी आहेत ज्या कधीच तुला सांगता आल्या नाहीत पण आता संगव्या लागतील पण मला एक प्रॉमिस हवा आहे आधी ”

राजदीप : तू बरी आहेस ना ? since फर्स्ट मीटिंग विथ राजस्व काहीतरी बिनसलय तूझ काहीही बडबडत असते

स्वरा : प्लीज दीप लिसन यार मीही तेच सांगायचा प्रयत्न करतीये

राजदीप: मला माहीत नाही असं काही झालाय का ? त्याची नजर खराब आहे असं सुचवायचे आहे तुला ??

स्वरा काय बोलणार विचारी, तिला आठवत होतं ज्या नजरेत गुंतून ती जग विसरून जायची, ज्याच्या कडे चोरून बघत तिने कित्येक तास घालवले असतील, जी नजर तिच्यावर पडावी म्हणून तिने खुप प्रयास केले ती नजर खराब, छे काहीतारीच काय; तो अविचारी, विक्षिप्त ,हलक्या कानाचा असेल पण त्याची नजर वाईट नव्हती कधीच आता ती मला नाकोशीच आहे एवडच

स्वरा: नाही पण आधी मला वचन हवं आहे तुझ्याकडून ?

प्रचंड राग येत होता दिपला अजिबात कळत नव्हतं की काय चाललंय हीच ?? पण आता काय ते वचन द्यावे लागेल काय माहीत पण ती म्हणते तर काही गंभीर असावे

राजदीप: काय हवंय

स्वरा : मला कधीच अंतर देणार नाहीस , माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे आणि मी जे सांगणार आहे ते आपल्या नात्यावर परिणाम करु शकतं
तिचं वाक्य अर्ध्यात तोडून दीप म्हणाला

राजदीप : स्वरा मला नाही कळत तुझ्या मनात आता काय आहे आणि हे वचन मी तुला आधीही दिल आहे

स्वराचा बोलण्याचा रोख बघून दीप जरा गंभीर झाला होता तो तिच्या अगदी जवळ जाऊन बसला तिला जवळ ओढले तिचे डोके त्याच्या छातीवर होते आणि डोळे भरून वाहत होते

स्वरा : तुला आठवतंय दीप आपल्या फायनल एक्साम नंतर आम्ही मुंबईला शिफ्ट झालो आणि आपल बोलणं कमी झाल तेव्हा आपण फक्त सख्खे मित्र होतो आपल्यात बाकि कुठलीच बंधन नव्हती .

राजदीप : हो , चांगलंच आठवतंय तू जाणार म्हणून मी खूप अस्वस्थ झालो होतो , तुझ्या असण्याची इतकी सवय होती हे अचानक जाणार हे कळलं मी धावतच तुला भेटायला आलो तुला, तू जाऊ नकोस असं सांगायला पण माझे शब्द ओठातून परत फिरले कारण तू खूपच खुश होतीस मला अजूनही आठवत आहे जेव्हा तुला मी तुझी आठवण येईल हे सांगितलं तेव्हा तू मला प्रॅक्टिकल विचार करण्याचा सल्ला दिला होतास मुंबईत कसा करीयर स्कोप आहे हे सांगत होतीस खरतर तुझा निर्णय झालेला होता आणि तू गेलीसच……

स्वरा : हो मला मान्य आहे मी खूप महत्त्वकांशी होते करियर च्या बाबतीत मला मुंबई मध्ये खुप काही करता येईल अस वाटलं होतं आणि तसे मी खूप प्रयत्न पण केले . आम्ही मुंबईत स्थिरस्थावर झालो तोपर्यंत आपला निकाल पण आला. चांगले मार्क्स मिळाले होते मला ,बाबांचे मित्र होते सहानी त्यांची फार मोठी फर्म होती मी तिथे जॉब करावा अस बाबांना मनोमन वाटे पण, त्यांनी काकांना वशिला लावला . असा वाशिल्याचा जॉब नको म्हणून मी त्यांचे प्रतिस्पर्धी आलेल्या कर्णिक असोसिएट मध्ये इंटरव्ह्यू दिला आणि माझे सिलेक्शन झाले आणि तिथेच माझी भेट झाली ती राजेश बरोबर राजेश tall dark handsum अगदी आर माधवन सारखा मला तो आवडू लागला नंतर मला कळलं की कर्णिक मध्ये त्याच्या बाबांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि तो तिथे ही ब्रांच हेड करतो
मि जॉईन केल्यापासून साधारण 2 महिने झाले असतील आणि मला राजेशच्या टीम मध्ये एक प्रोजेक्ट करायला मिळाला तेव्हा तो माझ्याशी पहिल्यांदा बोलला , महिनाभर आम्ही त्या प्रोजेक्टवर काम केलं आणि त्यादरम्यान मला तो आणखी आवडू लागला पण तो कधीच कुणाकडे त्या नजरेने पाहत नव्हता पण माझी त्याच्या नजरेत येण्याची धडपड इतरांना कळली होती. प्रेझेन्टेशन च्या दिवशी मी मुद्दाम फॉर्मल टॉप आणि स्कर्ट घालून गेले पण त्याच्याकडून काहीच रीअकॅशन आली नाही . मी मनातून खूप खट्टू झाले होते हे सोनम च्या लक्षात आलं ती आमची कलीग होती आणि राजेशची मैत्रीण ही होती ते दोघे असताना तिने राजेशला चिडवत विचारलं की त्याला मी आवडते की नाही पण तो हो किंवा नाही काहीच म्हणाला नाही फक्त हसला हे सोनमने मला संगीतल . पण मी माझ्या कामात खूप मेहनत घेत होते हे त्याला समजत होते मग तो माझ्याशी थोडंफार बोलायला लागला
चॅटींग करायला लागला , त्यात मला कळलं की त्याची आई तो लहान असताना गेली आणि दोन वर्षांपूर्वी त्याच्या बाबांनी दुसर लग्न केलय त्याला जरी आई म्हणून त्या पटत नसल्या तरी बाबांसाठी तो खूष आहे . आम्ही ऑनलाइन चॅट करायचो पण ऑफिसमध्ये जास्त बोलत नसू आम्ही गुंतत होतो पण मान्य करत नव्हतो किंबहुना त्याने मान्य करावे असं मला फार वाटे
असेच काही दिवसांनी ऑफिसमध्ये पार्टी होती म्हणून मी वेस्टर्न वन पीस घालून गेले सगळे माझ्याकडे बघत होते कॉम्प्लेमेंट्स देत होते माझी नजर माञ राजेशला शोधत होती तितक्यात मला SMS आला राजेशचा meet me on tarrec मला खूप धडधडायला लागलं ते वाचून मी जरा दबकत सगळयांची नजर चुकवून वर गेले

तिथे कोणीही नव्हते मी परत खाली जायला वळणावर इतक्यातच मला राजेशचा आवाज आला ” don’t turn swara ,” माझ्या मागे तो उभा होता , तो जवळ आला, इतका जवळ की त्याचे श्वास मला जाणवले, त्याच्या हृदयाची धड धड मला माझ्याच हृदयाच्या वाटू लागली मला अजूनही आठवतंय स्पष्ट तो मला म्हणाला ” तुझ्या डोळ्यात मला बांधून नेणार काहीतरी आहे मी इतका हरवून जातो की माझं प्रेम तू क्षणांत समजून जाशील म्हणून तुला पाहणं टाळत राहतो पण आता हे मला जमणार नाही तुझी आयुष्यभर साथ मिळाली तर मी स्वतःला नशीबवान समजेन ”

खूप फिल्मी होता , पण मी त्याला काहीच उत्तर न देता निघन्याचा प्रयत्न केला तर त्याने मला ओढून मिठीत घेतले ” प्लीज सोडा मला कुणीतरी बघेल ” मी स्वतःला सोडवून घेण्याचा निष्फळ प्रयत्न केला ” आणि आणखीन गुरफटले मला तो क्षण हवा होता पण राज च वागणं अनपेक्षित देखील होतं माझ्याही नकळत मी त्याची झाले आणि तो माझा राज झाला .खाली आलो तरी आमची नजर एकमेकांना शोधत होती त्याने त्या रात्री मला घरी सोडले पण आमचे दोघांचेही पाय निघत नव्हते. त्यानंतर आम्ही नेहमी भेटत राहिलो साधारण एक महिन्याने राज मला त्याच्या घरी घेऊन गेला त्याचे आई बाबा मला भेटले मला त्याचा आईला ओळखल्या सारखे वाटले पण कोण हे आठवत नव्हतं मला पाहून त्याही जर अवघडल्या सारख्या वाटल्या पण फ्या नक्की कोण होत्या ???

कोण असतील राजेशच्या आई ?? काय reaction असतील दिपच्या ?? स्वरा आणि राजच काय बिघडले असेल ???
***************************************************************************************************************************************

घरी आल्यावर मी खूप प्रयत्न केल्यावर मला आठवल त्या नर्मदा काकू होत्या हो, नर्मदा काकूच . तुला आठवत असेल दीप, माझ्या काकांच लग्न त्यांचा बरोबर झाल आणि त्या साधारणपणे एक वर्षाच्या आत फसवून त्या सगळे दागिणे घेऊन पळून गेल्या होत्या आपण दहावीला होतो सगळ्यांना शॉक बसला होता काकांचा तर विश्वास बसत नव्हता त्यांना शोधण्याचे खूप प्रयत्न केले आम्ही पण काहीच निष्पन्न झाले नाही काकांनी बदनामीच्या भीतीने दिल्लीला बदली करून घेतली ,हे सगळं मी बाबांना सांगितले तेव्हा मला कळलं की बाबा आणि काका जेव्हा पोलीस कॉम्प्लेमेंट् करायला गेले होते तेव्हाच त्यांना काकूंच्या ह्या अपराधी रूपाची कल्पना आली होती आणि ह्या फसवणूकिमुळे काका डिप्रेशनमध्ये होते
मी ठरवल राजला ह्या सर्व गोष्टींची कल्पना द्यावी कोण जाणे त्यांनी आणखी किती लोकांना फसवलं असेल पण बाबांचे मत पडले की आपल्याकडे काही पुरावे नसताना आपन शांत राहिलेलाच बरं

मी मनाशी पक्के केले की त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करायचे आणि त्यांच पितळ उघड पडायच त्यादृष्टीने मी हालचाल सुरू केली काकांचा लग्नाचा अल्बम काडून घेतला त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट शोधलं ह्या खटाटोपात 2 आठवडे गेले असतिल दरम्यान मी राज बरोबर नॉर्मल वागत होते त्याला विश्वासात घेऊन मी सगळे सांगायचे ठरवले

नेहमीप्रमाणे मी वेळेवर ऑफिसमध्ये पोहोचले पण काहीतरी गडबड होती कोणीतरी मोठ्या टेंडर्सजे quotation लीक केले होते साहनी असोसिटसला मेल केले होते असं कळलं राज तर खूप चिडलेला होता IT expert तो मेल कोणत्या computer वरूम मेल केलय आम्ही सगळे कॅफ्फेटेरिया मध्ये थांबलो होतो . खूप नुकसान झालं होतं हे टेंडर गेल्यामुळे, राज त्याचे बाबा कर्णीक सर सगळे आत होते.थोड्यावेळाने मला कर्णिक सरांनि आत बोलावलं सगळे प्रचंड रागाने माझ्याकडे बघत होते मी खूप घाबरून अपेक्षेने राज कडे पाहिले पण तो तर माझ्याकडे पाहताच नव्हता मला विचारणा होत होती कारण तो मेल माझ्या कॉम्प्युटर वरून गेला होता मला काहीच कल्पना नव्हती मी परोपरी समजावण्याचा प्रयत्न केला पण माझं कोणीच ऐकत नव्हतं मी अक्षरशः रडकुंडीला आले होते मला टेन्शन मुळे चक्कर आली आणि मी बेशुद्ध झाले . मला शुद्ध अली मी हॉस्पिटलमध्ये होते , समोर बाबा होते त्यानी मला शांत राहायला सांगितले नंतर मला आईकडून समजले की बाबा सोहणी काकांचे मित्रा आहेत म्हणून त्यांना माझ्या वर संशय होता आणि राजकडे पुरावा होता मी कॉन्फिडन्सीयल डेटा लीक केल्याचा , तो पोलीस कॉम्प्लेट करण्याच्या तयारीत होता पण बाबांनी खूप विनंत्या करून त्याला थांबवले माझातर विश्वास बसत नव्हता की राज असा वागेल मी त्याला कॉल केला पण काहीच उत्तर नाही मिळाले तो मला avoid करत होता

मी दोन दिवसानंतर त्याला भेटण्यासाठी ऑफिसच्या खाली थांबले आत जाण्याची मला भीती वाटत होती मी जरा वेळ वाट पाहिल्यावर तो आला त्याचा राग ऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता

राजेश: वेलकम मॅम वेलकम , आता काय बाकी राहिलाय का तुमचं काम अरे हो तुमच्या प्रिय गुरू साठी अजून काही माहिती गोळा करायचीय का ??
स्वरा : कोण गुरू ?? राज मी काहीच नाही केलाय तू विश्वास ठेव नारे
राजेश : वाव गुरू कोण ? गुरू सोहणी तुझा यार ज्याच्यासाठी तू मला फसवलस माझ्या भावनांशी खेळलीस आणि आता म्हणते कोण गुरू
स्वरा : कोणी सांगितले तुला हे मी कधी भेटली नाही त्या गुरूला कधी पाहिलाही नाही आणि तू असं नको बोलुस माझ्याशी
राजेश: किती निर्लज्ज पणा, हे तुझे आणि त्याचे फोटो शी लाज वाटते मला

ते फोटो खूप वाईट अवस्थेतील होते पण मी नव्हते ती कोणीतरी ते मुद्दाम बनवले असावेत

स्वरा : तोंड सांभाळून बोल राजेश ह्या फोटो बद्दल मला कल्पना नाही मी फक्त तुझ्यावर प्रेम केलाय आणि तुलाही हे माहीत आहे हे सगळं कारस्थान आहे कोणीतरी रचलेल आणि मी ते शोधून काढेनच
राजेश : मला आता तू इथून जायला हवंय आणि ते ही कायमच तू फक्त फसवू शकतेस लोकांना आणि आता मी तुझ्या या सध्या भोळ्या रुपाला भुलणार नाही मला खोट्याची चीड आहे आणि तू तेच केलस खरंतर पोलिसात देणार होतो तुला पण तुझा तो बाप गयावया करत आला म्हणून सोडलं , तेही तुझ्यासारखे तुम्ही मिडलकलास लोक पैशांसाठी कुठल्याही थराला जाल

स्वरा : बाबांना काही बोलू नकोस त्यांचा काहीही संबंध नाही इथे

राजेश : अरे यार जा ना तू का परत परत तेच तेच बोलायचं निघ इथून , कुत्रा सुद्धा हाड म्हंटल की हाड टाकून पळून जातो आणि तू

राजेशच्या बोलण्याने आधीच माझा राग अनावर झाला होता मी त्याच्या कानाखाली ठेऊन दिली आणि गाडी घेऊन निघाले रडत रडत गाडी चालवत होते पण मन थार्यावर नव्हतं गाडी स्लीप झाली आणि माझा अपघात झाला तुला हे कळल्यावर तू लगेच मुंबईला आलास माझ्यासाठी तू केलेली धडपड बघून आईबाबांनी मला तुझ्याशी लग्नाला तयार केल खरतर मी तेव्हाच तुला सगळं सांगणार होते पण हिम्मत झाली नाही कधी ., I am sorry deep,
***************************************************************************************************************************************

दीप उठून खिडकीजवळ गेला एक दीर्घ सुस्कारा टाकून त्याने विचारले ” आता काय करायचे ठरवले आहे तू ??”

स्वरा : ठाऊक नाही,
दीप: मला वाटत तू त्याला भेटून घे स्पष्ट बोला सगळं म्हणजे गैरसमज दूर होतील

स्वरा: मला नाही भेटायचं त्याला आणि एकटी तर मुळीच नाही आणि तू असं का म्हणतोयस ??? तू नसणार माझ्यासोबत

दीप : नाही ग, तसं नव्हे पण जे काही मी अत्ता ऐकल त्यावरून तरी मला तू भेटून घ्यावं असच वाटत तसही चार दिवसांनी त्याने मीटिंग साठी बोलावलं आहेच की

स्वरा उठून दीपजवळ गेली तिच्या डोळ्यात भीती आणि निराश स्पष्ट दिसत होती ती दिपला काही बोलणार इतक्यात तो तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला ” डोन्ट वरी मी आहे , चल मी निघतो ऑफिसमध्ये जातो ”

आणि तो गेला पाठमोऱ्या दीप कडे बघत स्वरांच्या डोक्यात विचारांचे काहूर उठले , दीप खूप hurt झालाय हे कळत होतं पण तो कधीच हे बोलुन दाखवणार नाही आपल्या प्रिय व्यक्तीकडून आपली फसवणूक झाल्याचे दुःख त्याला त्रास देणार आणि ते अव्यक्त ठेऊन तो स्वतः ला त्रास करून घेणार हे तिला चांगलच ठाऊक होत पण आता त्याला थोडा वेळ देणं गरजेचं होते.

राजेश चार दिवसांनी होणाऱ्या भेटीचा विचार करत बसला होता नीताने जेवण वाढून त्याला आवाज दिला
राज : अरे वा! मावशी आज अळूवडी बनवून गेल्या का ?? डाळ भात तूप लिंबू पोळी मस्त बेत जमवून आणलाय की
नीतू : ह्म्म
राज : अरे किती मीठ पडलंय डाळीत हे असं जेवण बनवतात का ?? पैसे घेऊनपन काम नीट करत नाहीत.

आपल्या स्वभावाप्रमाणे मागचा पुढचा विचार न करता राज निष्कर्ष काडून मोकळा झाला . नीताने जरा रागातच सांगितले त्याला की जेवण तिने बनवले आहे, आज मावशी आल्या नव्हत्या “सॉरी” म्हणून तो मुकाट्याने जेवला .

नीता बेडरूममध्ये आली तेव्हा राज हेडफोन लावून गाणी ऐकत होता नीताला बघून त्याने एक plug तिला दिला ती त्याच्या जवळ बसली गाणं चालू होतं फुलो की रंग से , दिल की तरंग से
नीताच्या मनात विचार चालु होते की राज हे गाणं फक्त स्वरासाठी ऐकत असेल ।हणून तिने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले पण तो डोळे मिटून शांत ऐकत होता त्याला असं पाहून नीताला खूप छान वाटायचं त्याने आयुषभर असेच माझ्या जवळ असावे.

इकडे राजला हल्ली कळात नव्हतं काय होतंय पण त्याला नीताच्या आसपास असण्याची सवय झाली होती ,तिच्या डोळ्यात रिकामा कॅनव्हास पाहून येणारी चमक , सर्जनशील आणि अतिशय भावनिक चित्रकार, निरागस आणि तन्मयतेने कलाकृती निर्माण करण,सार त्याला वेडावून टाकणार होतं पण ते तो सतत नाकारत होता भूतकाळाला पूर्णविराम दिल्याशिवाय भविष्याला साद घालण त्याला रुचत नव्हतं असा विचारात असताना गाणं संपलं
झोपुयात का नीताच्या प्रश्नाने तो भानावर आला ती तिच्या लांबसडक केसात बोट फिरवत विचारत होती राजला तिची गम्मत करायची लहर आली
राज : सगळ्या घरात केस पडलेले असतात किती मोठे ते केस आज काल कोणी एवढे काकुबाई सारखे केस ठेवत का ??

नीता : कापते मी उद्या जाऊन मग चालेल ??

राज : नको ,नाही ,असं कसं राहू दे ना ,झोप आता गुड नाइट.

नीताला हसू आवारत नव्हतं

नीताची उंची आणि बांधा एखाद्या मॉडेलला लाजवेल असा होता सावळी असली तरी आखीव रेखीव नक्कीच होती आणि त्यात तिचे केस तिच्या कंबरेच्या खाली पोहाचत होते मेस्सी बन किंवा एक वेणी हा अवतार ठरलेला असायचाच पण झोपताना केस मोकळे केले की राजची विकेट पडायची पण सांगणार कोणाला म्हणून तो कायम तिला काकूबाई चिडवायचा

दोन दिवस झाले होते दिपला सगळं सांगून तो नॉर्मल वागत होता आणि तेच स्वराला गुदमरून टाकत होतं हाच विचार करत ती रात्री शॉवर घेत होती जवळ जवळ अर्धा तास ती शॉवर खाली उभी होती
शेवटी दिपणे दरवाजा वाजवला तेव्हा ती बाहेर आली बाथसूट होता पण केस खूप ओले होते दिपने तिचे केस पुसायला टॉवेल आणला, तिला दिला ,तिने तो फेकुण दिला तशीच जाऊन झोपली

दीप : काय वेडेपणा आहे हा ?? बेड खराब होईल ओला होईल सगळा
तशी ती चिडून उठून बसली
स्वरा : वॉव मस्त! आता तुला बेडची जास्त काळजी आहे छान चाललंय सगळं मस्त
दीप: का चिडतीयेस काहीही झालेलं नाही आहे
स्वरा : हो काहीच नाही झालाय म्हणूनच
दीप : हे बघ जुन्या गोष्टींचा आपल्या नात्यावर परिणाम होणार नाही हे प्रॉमिस केलाय ना मी
स्वरा : तसा वागत तर नाही आहेस दोन दिवस झालेत दीप किती बदलालस तू ?? छोट्या छोट्या गोष्टी असतात पण कळतात रे
माझ्यासाठी मॉर्निंग कॉफी तीन वर्षात कधी विसरला नाहीस मग मागचे दोन दिवस , एकटाच आवरून ऑफिसला जातोस सकाळी लवकर , घरी जेवला नाहीस , बाहेरच खतोयस , काल स्मोक करत हातास रात्री उशिरा टेरेस मध्ये पाहिलं मी रोज मला पांघरून दिल्याशिवाय स्वतः झोपत नाहीस पण दोन दिवस तेही नाही किती लहान पण माझ्यासाठी महत्वाची गोष्ट ! मागचे दोन दिवस तू तोंडावर पांघरूण घेऊन झोपतोस मी यायच्या आधी मग आज काय फरक पडला तुला मी शॉवरखाली उभी होते किंवा आणखी काय ,

दीप : स्वरा मी मुद्दाम नाही केलाय यातलं काहीच पण तुला दुखवायच नव्हतं मला

तो टॉवेलने तिचे केस पुसू लागला बाथसुटमधून तिच्या उघड्या गोऱ्या खांद्यावर ओघळलेले पाण्याचे थेंब त्याला खुणावत होते पण स्वतः ला आवरून त्याने तिच्या डोळ्यात बघून बोलायला सुरुवात केली

दीप: तू मला जे काही सांगितलं किंवा कंफेस केलं तसा एक कंफेशन माझ्याकडे पण आहे

स्वराने जवळ जवळ त्याला ढकलून दिले तो बेडवर आडवा झाला

स्वरा : कोण होती ती ?की आहे? कधीपासून चालु आहे सगळे? सांग आता नाहीतर बघ

ती खूप चिडली होती आणि दिपला गंमत वाटत होती तो म्हणाला ” आता मूड नाही आहे नंतर सांगेन ” तो उठून तिच्या दिशेने जात होता ती मागे सरकली भिंतीला टेकली दीप तिच्या खूप जवळ गेला ” आता मूड काही दुसर करायचा आहे ” असं म्हणत त्याने तिला किस केलं थोड्यावेळ स्वराला विसर पडला आपल्या प्रश्नांचा पण काही क्षणातच तिने दिपला दूर ढकललं

स्वरा : आधी मला सांग काय भानगड आहे ते ??
दीप : हे बर आहे बुवा ;तुम्ही करता ते प्रेम
स्वरा : नाही रे तसं नाही माझंच चुकलंय पण तुला कोणाशी शेयर करायचा विचार सुद्धा मला अस्वस्थ करून गेला

ती बेडवर जाऊन बसली दीप तिच्या जवळ आला आणि तिच्या पायावर पांघरूण घातल

स्वरा : हे काय आता मधेच ??

दीप : ते distraction होऊ नये म्हणून

स्वरा : शी ; तुम्हा पुरुषांच्या डोक्यात ही एकच गोष्ट असते का ??

दीप: कोण सांगत का असे बाथसुट घालून बेडवर बसायला , तसही तू बोरिंग आहेसच

स्वरा : म्हणून दुसरी का ?? कोण होती ती ??

दीप : नाहीग ती नाही किंवा तसं काहीच नाही ,हे आपल्या दोघांचं आहे पण

स्वरा : म्हणजे मी समजले नाही

दीप : सांगतो ,तुला आठवतंय आपण मालदीवला हानीमून साठी गेलो होतो, त्या रात्री मी तुला ज्युस मधून ड्रिंक्स दिले होते

स्वरा : काय ??

दीप : चिडू नकोस एकूण घे आधी , मी गंमत म्हणून दिले होते पण तुला चढली थोडी आपण रूमवर आलो आणि मी तुला जवळ घेतलं पहिल्यांदा we kissed each other मग तू मला नशेतच सांगत होतीस
“my first kiss you know first very first राजला पण किस नाही केलं त्याला काहीच कळत नाही he don’t deserve me , I dump him , शहाणा मोठा मला चालती हो म्हणतो , तू नाही ना म्हणणार असं तू नको जाऊस मला सोडून कुठे ‘”
त्या क्षणी तू माझ्या इतकी जवळ होतीस की तुला नाही म्हणन मला शक्य नव्हते मी ठरवले ,की ह्या बद्दल तुला काहीच कधीच सांगायचे नाही तू अपराधी वाटून घेऊ नयेस हीच माझी इच्छा होती ” पण अचानक ह्या घटना घडल्या आणि तूला मला सर्वकाही सांगावं लागलं तेव्हा मलाच guilty वाटत होतं की मला माहित आहे पण तुला वाटतंय की माहीत नाही

स्वरा : मीही विसरले होते सारकही तुझ्या सहवासात .आपल्या संसारात ,कामात बुडून गेलो आपण मग असा अचानक भूतकाळ समोर आला की चाचरत माणूस पण थँक्स दीप तू मला तेव्हा आणि आताही समजून घेतलं . तू आहेस बरोबर मग मी कशालाच घाबरत नाही बघू काय हवय त्या राजला परत .

दीप : मला वाटत आता तू मला काय हवय असं विचार

तो तिच्या जवळ जात म्हणाला ,मग काय लाजली ती विचारू नका
त्या रात्री ते तनाने मनाने आणि अत्म्यानेही एकरूप झाले

***************************************************************************************************************************************

सोमवारी स्वरा भेटणार आहे हे सांगणारा मेल कालच वाचला त्याने, ती एकटी येईल का हाच विचार करत रात्री बराच वेळ तो जागा होता . नीतू देखील खूप उशिरा येते हल्ली; तिचं काय चालू आहे हे तिलाच माहित, विचारलं तर चीड चीड करेल उगीच,ह्या विचारात तो झोपी गेला .रविवारचा दिवस असल्याने राज थोडा उशीराच उठला. बघतो तर नीतू काही लोकांना पेंटिंग उचलून घेऊन न्यायला सांगत होती. जवळ जवळ सगळ्याच नेत होते राजेश काही विचारायच्या आधीच ती त्याला गुडमॉर्निंग विश करून निघून गेली दोन मिनिटातच तिचा sms आला की ब्रेकफास्ट रेडी आहे खाऊन घे.तो हसला आणि अंघोळीसाठी निघून गेला.

संध्याकाळपर्यंत राजचा ना फोन ना sms, नितुला खूप राग आला होता. स्वतः च्या कोषातून हा कधीच बाहेर येत नाही; आता बघू घरी गेल्यावर ,असा विचार करत ती तिच्या कामात गुंतून गेली. रात्री ती घरी पोहोचली तेव्हा प्रचंड थकलेली होती.
राज बेडवर बसून काहीतरी वाचत होता.
नीतू : तू सकाळपासून किचनमध्ये गेलाच नाहीस का ???
तिच्या प्रश्नाने राज भानावर आला
राज: नो रे सकाळी तू गेल्यावर बाबांचा कॉल आला आणि लगेच मी गेलो तसाच, ते आत्ता just आलोय एक जमीन बघायची होती आणि त्यासंदर्भात मीटिंगस होत्या सो.. पण काय झालं ??
any issues??
तीचा राग आता उदासीनतेत परिवर्तित झाला ,ती किचनमध्ये गेली प्लेट च्या खाली लपवून ठेवलेलं आमंत्रण पत्र उचलून घेतलं त्यातली पिवळी चिट्ठी चुरगळून dustbin मध्ये टाकली आणि बेडरूम मध्ये गेली तिच्या मागे आलेल्या राजने हे सर्व पाहिलं आणि हॉल मध्ये निघून गेला तिच्या नकळत, ती आमंत्रण बॅग मध्ये ठेऊन शॉवर घ्यायला निघून गेली .

राजने dustbin मधला कागद आणि तिच्या बॅग मधून आमंत्रण पत्र हळूच काढले आणि वाचले तो खूप खुश झाला नितुच्या चित्रांचे प्रदर्शन होते ब्लिस आर्ट गॅलरी मध्ये आणि मोठे चित्रकार येणार होते उदघाटनाला सोमवारी संध्याकाळी, तेवढ्यात नीतू बाथरूममधून आली. तो हातातलं आमंत्रणपत्र तिला दाखवत म्हणाला

राज: हे काय ? मला साधं सांगावस पण वाटलं नाही तूला ? माझीपण मदत झाली असती तुला ? anyways पण मी खूप खुश आहे तुझ्यासाठी. त्याने तिला गच्च मिठी मारली त्या मिठीत कौतुक,आधार, आश्वासन सारकाही होतें. ती क्षणभर का होईना पण सुखावली .ती जरा नाराजच वाटली खूप थकलीये असं म्हणून जाऊन झोपली. ती झोपेत आहे ही खात्री करून राजने ती चिट्ठी वाचायला घेतली .

प्रिय राज,

तुला प्रिय म्हंटले म्हणून हसू नकोस, बरच काही बोलायचं असत आपल्याला, पण गेले काही दिवस आपण टाळतो एकमेकांना. आता तू म्हणशील की तसही आपलं लग्न हे खूप मोठी तडजोड होती म्हणून आपण एकत्र राहणं ही फक्त औपचारिकता आहे आणि हे बऱ्याच अंशी मी मान्यही करते . मग अपल्यातल्या मैत्रीच्या नात्याला सुद्धा आपण संपवणार आहोत का ?

आता ना आपण धड मित्र आहोत ना नवरा बायको, एक विचीत्र तिढा झालाय तो सोडवायचा असेल तर आपण बोलायला हवं,अर्थात तुझ्या भूतकाळाशी तुझी वीण अजूनही खूप घट्ट आहे ती तू पक्की करणार की उसवणार हे सर्वस्वी तुझ्या हातात आहे . जसा उद्या तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे तसाच माझ्यासाठीहि खूप मोठा दिवस आहे , जर तू प्रदर्शन पाहायला आलास तर मी समजेन की तुला आपल्या नात्याला एक संधी द्यायची आहे .

मला असं लिहिता वैगरे येत नाही पण हे सगळं तुझ्या समोर बोलण्याची माझी हिम्मत नाही म्हणून हे पत्र.

तुझी

नीता.

एक दीर्घ श्वास घेऊन राजने चिठ्ठी बाजूच्या ड्रॉवर मध्ये ठेवली . तो नक्की काय फील करतोय हे ठरवणं त्यालाही अवघड जात होतं, नितुच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट त्याने हळूच मागे केली ‘किती निरागस आहे ही पण फक्त झोपेतच… जागी झाली की अंबाबाई , दुर्गा माता , भवानीमाता सगळ्या संचारतात हिच्या अंगात; चीड चीड करते सतत. फक्त ती माझ्या प्रेमात आहे हे लपवण्यासाठी हा बुरखा घेतलाय बाईसाहेबांनी but at the same time she is tremendously graceful ह्या स्वरा प्रकरणांत ति नेहमीच माझ्या बाजूने उभी राहिली ‘ असा विचार करता करता त्याला झोप लागली .त्याला उद्याचा दिवस खूप अवघड जाणार होता.

नीतू पहाटेच उठली तीला आवरून निघता निघता सहा वाजून गेले होते. सगळ्या अर्रेंजमेंट्स चेक करून तिला ब्युटी पार्लर मध्ये जायचे होते. तीने संध्याकाळी स्पेशल दिसण्यासाठी थोडी खरेदीपण केली होती. wristwatch राजच्या ड्रॉवर मधून घेताना तिला कळून चुकलं कि हे राजने वाचलंय तिला थोडं बार वाटलं पण आता मात्र धाकधूक होती ती येणाऱ्या संध्याकाळची .

ती स्मरणीय, रमणीय संध्या असेल कि आयुष्यभरासाठी कासावीस करणारी कातरवेळ हे आज ठरणार होतं .

***************************************************************************************************************************************

दीप कॉफी घेत बसला होता स्वराची चीड चीड त्याला काळत होती, तिचा त्यांने बरोबर असावा हा आग्रह देखील चुकीचा नव्हताच मुळी.तो राज आणि स्वराबद्दल माहित नसताना गेला होताचकि मीटिंगला .मग आज त्याला थोडं का होईना इनसेक्युर का वाटत होत. जर स्वरा आपल्याला सोडून गेली तर असा वेडा विचारपण येऊन गेला एकदा. म्हणतात ना मन चिंती ते वैरी न चिंती त्यातली गत.

खिडकीतून बाहेर नजर लावून स्वरा एकटक बघत होती दीप हळूच तिच्या बाजूला जाऊन उभा राहिला , ती रागातच तिथून बाजूला सरकली. दिपणे तिचा हात हातात घेतला हलकेच दाबला.ती त्याची नेहमीची सवय होती कुठल्याही गोष्टीला होकार देण्याची, स्वराने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पहिलं “we will go together,don’t worry” दीप म्हणाला .

इकडे doorbell च्या आवाजाने राजेशला जाग आली पाहिलं तर मावशी होत्या त्या त्यांच्या कामला लागल्या आणि राज नितुला कॉल लावत होता , तिने उचलला
राज: तू आहेस कुठे अजून मॉर्निंग वॉक ? आठ वाजता आले.
नीता: नाही मी जरा लवकर निघाले आज काम आहेत भरपुर सो…
राज : माझी काही मदत लागली किंवा मी काही करू शकलो तर सांग
नीता: विचारलं म्हणून थँक्स. पण मी म्यॅनेज करते तसही मदतीची सवय नंतर त्रासदायक असते चल ठेऊ मग फोन
राज : तू चिडतीयेस का हल्ली इतकी ?? माझ काही चुकलंय का ? ज्यामुळे तुला त्रास होतोय
नीता: तुला असं का वाटलं ? तुझं काहीच चुकत नाही रे कधी, पण मी मात्र इमोशनल फुल असल्यासारखे वागते. anyways chill
राज: फारच विसंगत बोलतीयेस तू नीतू
नीता: हो ना , बघ मी म्हंटल ना. चल ठेवते बाय

अशी काय ही ?बघतो संध्याकाळी पण खरंच काय करणार मी माझं मलाच ठाऊक नाही.मी जरी हे लग्न नाईलाजाने केलं होतं तरी त्यात नितु विषयी राग नव्हताच ,हो तेव्हा प्रेमही नव्हतंच करण प्रेम म्हणजे फसवणूक असं गृहीतक मी माझ्या पुरते पक्के केले होते. पण नितुमुळेच ह्या सगळ्या प्रकारचा उलगडा झाला, गैरसमजुतींचा निचरा झाला .पण नेमके मी स्वराला भेटण्याची तिच्याशी हे सारं सविस्तर बोलण्याची इछा व्यक्त केली आणि तिथेच माशी शिंकली. आता कळतंय मला वरकरणी जरी ती दाखवत नसली तरी तिला हेच खटकलं असणार आणि त्यात त्यादिवशी मी स्वरा समोर आल्यावर जे काही वागलो त्यावरून मी तिला विसरू शकत नाही असं नितुला वाटत असणार .

कसं समजाऊ नितुला सगळीच नाती पारदर्शक नसतात किंबहुना सगळ्यांनाच नैतिक अनैतिकतेचा मापदंड लावता येत नाही.स्वरा आता माझी कोणीही नाही कदाचित कधीच असनार ही नाही म्हणून कडू झालेलं नात सुधारूच नये का ? माझ्याशी धड बोलतच नाही तर सांगणार तरी कसं नितुला ? आधी सगळं share करायचो आम्ही एकमेकांशी,त्यातच तिने मला माझ्या अनाठायी रागावर नियंत्रण करायला सारासार विचार करायला लावलं आणि आता तीच अविचार करतीये,तिचे काळेभोर डोळे पेटिंग करताना किती चमक असते त्यात ओह्ह गॉड आय मिस हर ,

राज विचार करता करता ऑफिस साठी आवारात होता स्वरा भेटणार असूनसुद्धा त्याच्या मनात नीतूचेच विचार येत होते. माझ्याशिवाय कुणी नाही तीला सगळे लांब आहेत नाही म्हणायला चेरी आहे तिची बेस्ट फ्रेंड पण हि चिट्ठीची भानगड चेरीचा सल्ला असेल, असुदे आज संध्याकाळी तिला छान surprise देईन मग खुश होईल ती .
स्वरा आलीच आज तर मी बोलेन शांतपणे तिच्याशी करण माझी तिला भेटलो तेव्हा दिलेली प्रतिक्रिया नितुला अपेक्षित नसणार म्हणूनच त्यादिवशी पासून कमी बोलते वेडी आहे थोडीशी . ह्याच विचारात राज आवरून निघाला

ठरल्याप्रमाणे स्वरा आणि दीप पोहोचले मीटिंगसाठी राज आलेलाच होता स्वरांच्या डोळ्यात प्रचंड राग दिसत होता.पण दीप का आला असेल हा प्रश्न राजला पडला अरे आता फक्त कामचंच बोलावं लागेल असे वाटले त्याला

राज: हाय , वेलकम मला वाटलं फक्त मॅडम येणार आहेत.

स्वरा : का तुला दिपसमोर लाज वाटते की भीती ?

स्वराचा हा अवतार राजला जरा नवीन होता पण दिपने ओळखलं आता काही खर नाही तो तिला अडवतच म्हणाला शांतपणे बोलायचंय ना ? तसं ठरलंय आधीच.
राज : yaa please have a sit, पाणी घ्या .

स्वरा : बोल काय हवंय तुला ?? आणि हे कॉन्ट्रॅक्ट का केलास आमच्या बरोबर ? मला नाही करायचंय काम तुझ्यासोबत

राज : ओके काहीच प्रॉब्लेम नाही आपण ते रद्द करूयात खरतर मला तुला भेटायला काहीतरी करण हवं म्हणून हा खटाटोप होता मला काही गैरसमज दूर करायचे होते इतकंच

स्वरा : कसले गैरसमज ?

स्वराच स्वर जरा मऊ झाला आणि इकडे दिप जरा अस्वस्थ झाला. राज बोलू लागला

” स्वरा तुला आठवतच असेल आपली शेवटची भेट आणि ऑफिसमधला तो प्रकार जो तू केलास म्हणून तुलाऑफिस सोडावं लागलं”

” मी काहीही केलं नव्हतं” स्वरा ओरडली राजवर

” अगं एकूण तर घे तो काय म्हणतोय ते” दीप म्हणाला

राज पुढं सांगू लागला ” हो,ते हि खरंच आहे पण तेव्हा त्या प्रकरणानंतर मी खचलो होतो जरा त्यामुळे मी तूला दोष देऊन मोकळा झालो,फसवलं गेलोय हे दुःख कुरवाळत बसायचं ,रडकी गाणी ऐकायची असे सगळे फिल्मी प्रकार मी केले, पण इगो बाजूला ठेऊन ह्या सगळ्या प्रकरणाचा विचार केलाच नाही. हळू हळू विसरलो सगळं, तुलाही विसरलो .मग दोन वर्ष कोणताही डेटा लीक झाला नाही आणि अचानक मागच्या वर्षी पुन्हा एक पैशाच्या फरकाने टेंडर्स दुसर्यांना मिळालं,3 वेळा अर्थात सोहोनी अससोसिएट्सला नाही पण असे योगायोग सतत होत नाहीत याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतय हे लक्षात आल .”

” म्हणजे तुला असं म्हणायच की कोणीतरी ऑफिसमधून डेटा लीक करत होत आणि आरोप माझ्या वर आला आणि असं असलं तर ते फोटो ते कुठून आले होते ? स्वराने विचारले

राज: हो सांगतो , हा सगळंच एक मोठ्या षड्यंत्रचा भाग होता.

म्हणजे ?? नकळत दिपच्या तोंडातून बाहेर पडलेला हा प्रश्नच ह्या सगळ्या गोष्टींची उकल करणार होता.

***************************************************************************************************************************************

“होय षड्यंत्रच ” राज एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाला .

वाफाळत्या कॉफीच्या मगकडे एकटक पाहत असलेली स्वरा मात्र शांत होती .राज पुढे सांगू लागला

” तुला आठवतंय आपण माझ्या आई बाबांना भेटायला माझ्या घरी गेलो होतो आई म्हणजेच बाबांची दुसरी बायको , तुला भेटल्यापासून ती जरा अस्वस्थ होती. मला सतत तुझ्याबद्दल काहीतरी सांगून अश्या मुली वाईट असतात, माझ्या संपत्तीचा हव्यास म्हणूनच तू माझ्याशी जवळीक वाढवते आहे , हे सांगून मला गोंधळात टाकत होती , पण मी लक्ष दिलं नाही .माझा पूर्ण विश्वास होता तुझ्यावर ;आणि तसही त्यांचं आणि माझं रिलेशन असावं इतक्या मला त्या आवडत नव्हत्याच, फक्त बाबांसाठी मी त्यांना आदर देत होतो.

त्यानंतर दोन आठवड्यातच तुझ्यावर आरोप झाले त्यासाठी कदाचित मी तुला माफ केले असते पण मला जे काही सांगितले गेले, जे पुरावे दाखवले गेले, त्यात तुझे आणि गुरू सोहणी चे काही फोटोस होते जे तुमचं खूप जवळ असणं अधोरेखित करत होते. आधीच तुझे बाबा आणि सोहोनी खूप जवळचे मित्र असलयाचे तू मला बोलली होतीस त्यामुळे मला ते सहजासहजी पटलं.

मी इतका वेडेपणा केला स्वरा तेव्हा कसं वागलो तुझ्याशी , एकदाही तुला बोलण्याची संधी दिली नाही तुला माहीत नसेल पण मी तुझ्या विरुद्ध पोलीस कम्प्लेट् पण करायला निघालो होतो ”

“काय ??” स्वराने अविश्वासाने राज कडे पाहिले.

“हो हे खरं आहे कारण ह्या सगळ्या प्रकारामुळे झालेले नुकसान करोडोत होते आणि माझं मनही जखमी होतं, फसवलं गेल्याची भावना फार त्रासदायक असते स्वरा, एकवेळ फसवणार्याला आपण माफ करू शकतो पण स्वतः ला माफ करण कठीण .
सतत वाटत राहतं आपण असा कसा विश्वास ठेवला ?

anyways सांगायचं मुद्दा असा की तर त्यानंतर 2 वर्षांनी माझं आणि नितुच लग्न झालं तीही एक बिसनेस डील होति पण मुळातच नीतू खूप मायाळू प्रेमळ समजूतदार असल्याने आमची मैत्री खूप घट्ट झाली तिला आपल्याबद्दल सगळे माहीत होतेच आणि पुन्हा ऑफिसमध्ये घडलेल्या प्रकारामुळे तिनेच मला ह्या सगळ्यांच्या मुळाशी जाण्याचा सल्ला दिला .

मग आम्ही एक योजना आखली मी तेव्हा बाबांच्या इतर बिसिनेस मधेही लक्ष घालत असल्यामुळे मला नितुच्या मदत घेऊन सारे काही करावे लागले

ज्यांना टेंडरचे पेपर सहजासहजी मिळू शकतात अशांना shortlist केल आणि मग त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवायला सुरवात केली पण हाती काहीच लागत नव्हत नितुसुद्धा ऑफिसमध्ये येत असे वरचेवर तेव्हा तिला काही गोष्टी संशयास्पद वाटल्या . हरी म्हणजे ऑफिसचा पियुन खूप जुना त्यच्या घरची परिस्थिती तशी फारशी बरी नव्हती पण हल्ली तो फारच टापटीप राहायला लागला होता ब्रँडेड घड्याळ , मोबाइल , हॉटेलिंग, जुगार . मग आम्ही एका टेंडर मध्ये पार्टीसिपेट करण्याचं ठरवलं आणि हरीवर लक्ष ठेवलं . सकाळी सगळ्यांच्या आधी येऊन त्याने पेपर्स चे फोटो काढले बाबांच्या केबिन मध्ये असलेलया गोदरेज तिजोरीचा पासवर्ड त्याला कसा माहित होता हे तेव्हा कळलं नाही. त्याने फोटो कोणाला पाठवले हे कळण्यासाठी त्याचा मोबाइलला हवा होता. आम्ही रोज ऑफिसमध्ये गेलो कि security रूम मध्ये जाऊन फुटेज चेक करत असू टेंडर भरल्यापासून , ही नितूंचि आयडिया होती त्यादिवशी सुद्धा फुटेज चेक केल्यावर आम्हाला हे कळलं मग त्याचा मोबाइलला मोठया शिताफीने मी हस्तगत केला फोटो पाठवलेला नंबर सेव नव्हता.

मी तो माझ्या मोबाईलमध्ये सेव केला आणि जे नाव आले ते पाहून मला भोवळ यायची बाकी होती.”

” हरी काका आठवतायेत मला पण त्याने असं केल ?? आणि कोणाला पाठवले ते पेपर्स” स्वरा न राहवून म्हणाली.

” देव मामा …. माझ्या नवीन आईचे भाऊ मला बाबाना हे सांगायचं धीर होत नव्हता म्हणून मी आणि नीतू दोघेही बाबांकडे गेलो हे सांगायला पण बाबा वेगळ्याच विवनचनेत वाटले हल्ली हल्ली ते फार अस्वस्थ असायचे

नीतू : काय झालाय बाबा, बर वाटत नाहीये का ?

बाबा : अरे बाळांनो तुम्ही कधी आलात ?? फोन केला नाहीत अचानक

राज: इथे राहत नाही म्हणून काय आता तुमची अपॉइंटमेंट घ्यायची कि काय ?? मी मिश्किल पने म्हणालो.पण बाबांची खालावलेली प्रकृती माझ्या नजरेतुन सुटली नाही.

नीतूने ऑफिसमधला सगळा प्रकार बाबाना सांगितला ते पण जरा अवाकच झाले, पण मग त्यांच्या सांगण्यानुसारच आम्ही नितुच्या वडिलांच्या माणसांना देव सुर्वे वर नजर ठेवायला सांगितली .

त्याचदरम्यान मला आमच्या वकिलांकडून बाबांच्या मृत्त्यूपत्राबद्दल समजलं. साठी सुद्धा ओलांडलेली नसताना त्यांनी विलचा विचार करावा हे मला न पचणार होत म्हणून मी त्यांच्याशी बोलायला गेलो तेव्हा मला कळाल कि गेले काही दिवस आई त्यांच्या मागे लागली आहे विल बनवण्यासाठी.

त्यानंतर ३ दिवसांनी नितुने आम्हाला सगळ्यांना बाबांच्या घरी ठीक दुपारी १ वाजता एकत्रित यायला सांगितलं आई, बाबा, नितुचे वडील, देव मामा नीतू आणि पोलिस. तिने त्यानंतर केलेला खुलासा धक्कादायक होता आई म्हणजे बाबांची दुसरी बायको जीने तीच नाव सुहासिनी असे सांगितले होते आणि शहिद मेजर देवराम भोसले ह्यांची विधवा असल्याचे सांगितले होते त्यासुहासिनी बाई ४ वर्षांपूर्वी वरल्या होत्या त्यांचे पेपर वापरून देव आणि आई बाबाना फसवत होते .माणसाना मोहात पाडून त्यांच्याशी लग्न करायचं आणि त्यांना लुबाडून प्रसंगी संपवून त्यांची इस्टेट हस्तगत करायची हे काम ते दोघे आणि त्यांचे चार साथीदार करत असत, महत्त्वाचं म्हणजे हा काम ते गेली १५ वर्षे करत आहेत आधी सर्व सामान्य लोकांना फसवन्या पासून सुरवात करून ते आता मोठं उद्योगपती शोधत आणि त्यांचं महत्वाची माणसे फोडून त्यांची महत्वाची व्यावसायिक कागदपत्रे हस्तगत करून त्याच गैरवापर करत असत त्याखेरीज ते ड्रग डीलिंग मधेही अडकल्याचे समजले. सगळेच अचंबित झाले होते बाबांची अवस्था तर वाईट झाली होती .
आमचे टेंडर्स लीक करायचे नव्हते पण देवला पैशाचा मोह झाला आणि तो अडकला आणि तसेही पोलीस त्यांच्या ४ साथीदारांच्या मागावर होते पण हे दोघे पांढरपेशा समजत वावरनारे त्यांचे बॉस आहेत हे त्यांनाही मागच्या तीन दिवसाच्या तपासात समजलं.

त्यांनी हे सांगितलं कि तू त्यांना ओळ्खल्याचा संशय आल्यामुळे त्यांनी ते टेंडर्स लीक केले आणि हरीच्या मदतीने तुला अडकवलं . गुरुचे आणि तुझे फोटोही असेच फोटोशॉप एडिट करून बनवण्यात आले होते सो तू त्यांच्या मार्गातून बाजूला जाशील , जास्त काही नाही सांगितलं त्यांनी पण बहुतेक तुझ्या फॅमिलीला त्यांनी असच फसवलं होत . बाबाना कसलेसे ड्रग रोज जेवणातून देऊन त्यांना हळू हळू संपवण्याचा प्लान होता म्हणून मृत्यूपत्राच्या तगादा त्यांच्या मागे लावला होता.

हे सगळं खूपच भयावह होतं आमच्याच बाबतीत असं का घडलं माहीत नाही पण नितुच्या बाबांची खूप मदत झाली ह्या सगळ्यात आणि नितूचीही .बाबा सावरेपर्यंत मी तिथेच थांबलो त्याच्याजवळ नितुहि होती.

तिचे आभार मानले मी पण तुझी क्षमा मागायची राहिली होती.

” म्हणून तू हे सगळे केलं ? स्वरासाठी ??” दीप विचारू लागला.

” नितुसाठी” त्याच्या ह्या उत्तराने दीप शांत झाला तर स्वर थोडी अस्वस्थ.

” भूतकाळातले गैरसमज सोडवून पाटी कोरी करूनच नवीन धडा लिहायचा ठरवलंय मी, म्हणून मीच तिला स्वराशी बोलणायची इच्छा व्यक्त केली आणि तिने ह्यातसुद्धा माझी मदत केली नेहमीप्रमाणे ”

स्वरा : हो मला त्यांचं संशय आला होता आणि मी तुला सांगणारही होते पण हे सगळं झालं आणि राहील. पण एक गोष्ट नक्की सांगू शकते मी हे सगळं खूप मागे टाकून आले होते. दीप बरोबरच आयुष्य म्हणजे एक गोड स्वप्न होतं आणि तू मला झोपेतून जाग केलस परत येऊन अर्थात त्यामुळे दीप आणि मी आणखी जवळ आलो आणि हे आम्ही एकमेकांकडे कबूलही केलय .

दीप: प्रेम फक्त विश्वासावर आणि आदरावर अवलंबून असत आणि मला वाटत नीताने तुझ्यावर विश्वास ठेवलाय आणि तुझ्या मताचा आदरही करते.ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ यु.

” थँक्स तुम्ही दोघांनी मला वेळ दिलात आणि ते कॉन्ट्रॅक्ट मी रद्द करतोय , पुढे कोणताही गुंता होण्यापेक्षा आपण आपापल्या जागी स्वतंत्र जगलेलंच चांगलं आणि स्वरा नो हार्ड फीलिंग्स ”

एकमेकांचा निरोप घेऊन ते तिघेही आपापल्या मार्गी निघाले .

राज शांतपणे डोळे मिटून बसला तितक्यात त्याला प्रदर्शनाची आठवण झाली आणि तो तयारीला लागला.

स्वरा दिपला सांगून घरी गेली आणि अजून वेळ आहे म्हणून दीप ऑफिसला गेला इतकं खुश होता दीप आज स्वरासाठी surprise म्हणून त्याने घरी जात असताना तिच्या आवडीची सोनचाफ्याची फुले घेतली आणि डायमंड स्टड घेतले.

राजने पीए च्या मदतीने घरात सजावटीसाठी काही समान मागवले तो स्वतः घरी गेला आणि बेडरूम डेकोरेट केली पण ह्या सगळ्या भानगडीत त्याला प्रदर्शनाला जायला चांगलाच उशीर झाला, नीतू चिडेल ह्या विचाराने तो नाही म्हंटल तरी जरा घाबरलाच होता

***************************************************************************************************************************************

दीप खूपच उत्साहात घराची किल्ली उघडून आत शिरला स्वरा साडी नेसून कुठेतरी निघण्याच्या तयारीत होती
दीप : काय मग आज साडीमध्ये एकदम ??
स्वरा : अरे वा बर झालं तू फ्लॉवर्स घेऊन आलास मी गिफ्ट आणले आहे आवार तू निघुया आपण .
दीप : कुठे जायचंय ??
स्वरा : अरे आज दादा वहिनीची anniversary आहे ना ? विसरलास का ??
दीप : नाही विसरलो पण आपण जात नाही आहोत ,
स्वरा: का ?
दीप: मी फ्रेश होउन येतो जरा ,मग सांगतो .
स्वरा गोंधळलेल्या अवस्थेत थांबली, दीप आल्यावर तिने त्याला न जाण्याचं करण विचारल

दीप: ते गोव्याला निघालेत मी त्यांना ही टूर गिफ्ट केली आहे आपल्या दोघांकडून सो ते तिकडे एन्जॉय करतील आणि आपल्याला इथेच करता येईल .अस म्हणत दीप स्वराच्या पाठीमागे जाऊन उभा राहिला ती आरशात बघून केस विंचरत होती.

स्वरा : दिप मस्ती नको माझी साडी खराब होईल आणि दादा वहिनी नाही आहेत तर आपण बाहेर जाऊया छान कुठेतरी डिनर साठी.

अस म्हणत ती तिथून निसटलि आणि हॉल मध्ये पळाली.
टीपॉय जवळ तीच गिफ्ट होत ते तिने पाहिलं तितक्यात दिपणे मागून येऊन तिला मिठीत घेऊन विचाल ” आवडलं का ” .

” हो खूपच छान आहेत स्टड्स ” स्वरा म्हणाली
” आता मला खर खर सांग दीप मी समज तुला सोडून निघून गेले असते तर बघ हा म्हणजे तो राज बराच हँडसम आहे अजून आणि तू पांडा सारखा गुबगुबीत ?? ” ती चिडवत होती त्याला
दीप जरा रागाने तिथून बेडरूम मध्ये निघून गेला जाताना तू कर तुला हवं ते अस म्हणत जोरात दार आपटले त्याने
स्वराला अजून हसू आले पण आता जास्त चिडवायला नको म्हणून ती त्याच्या जवळ जाऊन बसली
स्वरा : चिडला का माझा बोका !! बरं मला जरा मदत करशील का ??
अस म्हणत तिने त्याच्या कडे पाठ केली आणि केस मानेवरून पुढे घेतले
(बॅकलेस गोल्डन ब्लाउज आणि व्हाईट कॉटन जारीकठाची साडी दिपची आवडती हे तिला अगदी पक्के माहीत होतं)
दीप जरा रागातच काय म्हणाला आणि तिच्या कडे बघितले
स्वरा : जरा गाठ सोडून देतोस का ??
आता कसला राग आणि कसले काय ? दीप पण विसरला सगळं मग दोघांत जी साखरपेरणी झाली तिची गोडी मनात ठेवूनच रात्र सरली .

राज प्रदर्शनाला पोहोचला तेव्हा बराच उशीर झाला होता त्याची नजर नितुला शोधत होती तेव्हड्यात त्याला बाबा आणि बाकीचे काहि ओळखीचे लोक भेटले बोलता बोलता त्याचे लक्ष एका पैंटींग समोर उभ्या असलेल्या व्यक्तीवर गेले ती नीतू होती ह्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता तिने केस कापले होते की कुरळे केले होते पीच कलरचा लो बॅक कुर्ता आणि व्हाईट लेगिंगस तेच मोहक हसू टपोरे डोळे आणि सतेज सावळा रंग तो बघतच राहिला.

त्याने तिच्याजवळ जाऊन तिचे अभिनंदन केले आणि फुलांचा गुच्छ दिला आणि नेहमीप्रमाणे मुर्खासारखा आजही स्वरा दिप आणि त्याच्याबद्दल आज काय बोलणं झालं हे सांगत राहिला .

नितु उदास हसली तिचा आत्तापर्यंतचा सागळा उत्साह विरून गेला
राजला दुसऱ्या लोकांना पैंटींग दाखवायचा बहाण्याने टाळत तिथून निघून गेली तिच्या कामच कौतुक टाळ्यांचा खडखडाट सगळ कानावर पडत होत पण मनात उतरत नव्हतं, आता ती त्या मुडमध्येच नव्ह्ती.

राज बाबा आणि ती सगळ्यात शेवटी निघाले बाबा घरी गेले आणि हे दोघे ह्यांच्या फ्लॅटवर आले .

नीतू पटकन सोफ्यावर बसली सगळं उरलसुरल अवसान गळून पडलं होत पाय पोटाशी घेऊन ती रडत होती राज फ्रेश होऊन आला त्यानेच तिला बेडरूम मध्ये येऊ नको सांगितलं होतं त्याला तिला सरप्राईज द्याचे होते म्हणून, पण तिला रडताना पाहून तो तिच्या जवळ गेला तसं तिने त्याचा हात झटकून दिला

राज : काय ग का रडतेस ?छान झाला कार्यक्रम सगळे किती कौतुक करत होते तुझं

नीतू : हो अरे बापरे तुला ऐकू आला का माझं कौतुक ?

राज : असं का बोलतीयेस ??

नीतू : अरे हो तुला काही कळलंच नसेल नाही का ?? anyway माझा निर्णय झालाय मला डिओर्स हवाय i cant stay with you anymore .

राज : शांत हो !! काय झालाय सांगशील नक्की ???

नितू : काहीच कळत नाही तुला ,असाच करत असतो नेहमी. मान्य आहे मी मैत्रिण आहे तुझी पण आता नाही. मी तुझ्यावर प्रेम करते आणि त्यामुळे हे मैत्रीचं नाटक मी नाही करू शकत आणि तसही तुझ्यावर प्रेम करण हा माझा खूप खाजगी प्रश्न आहे ;तुही तेच करवस असा अट्टहास नाहीच आहे, सो प्लीझ लेट्स गेट सेपरेट.

राज तिला जवळ घेत ” कोण म्हणतं माझं तुझ्यावर प्रेम नाही ”

नीता : हाच प्रोब्लेम आहे राज तू स्वतः काहीच म्हणत नाहीस आज मी म्हणते प्रेम आहे म्हणून आहे .तुला काय वाटतंय नक्की, हे तुला ठरवता येत नाही, मी पण मूर्ख गेले कीत्येक दिवस तुझ्या मनातलं जाणून घ्यायचं प्रयत्न करतिये .मला वाटलं होतं आज तू नोटीस करशील बदलेली hairstyle लुक पण काहीच नाही तू उशिरा आलास एक फॉर्मलिटी म्हणून ,
प्रदर्शन सुरू झाल्यापासून तुझी वाट बघत होते इतका मोठा दिवस होता माझ्या साठी पण तुझ्या प्रयोरिटी वेगळ्या आहेत त्यात मी कुठेच नाही. मी मेरीशी बोललीये तिच्या रूमवर पेइंग गेस्ट हणून राहत येईल .कारण आता इथे तुझ्या सोबत मला नाही जमणार

राज अवाक होऊन तिच्याकडे पाहत होता इतकी बोलते ही मुलगी आज पर्यंत तर मणी माऊ होती अचानक जखमी वाघीण काशी झाली ? आधी समजूत काढायला हवी तो तिच्याजवळ गेला तिचा हात हातात घेऊन म्हणाला ” म्हणजे तुझं प्रेम आहे माझ्यावर तर ( हे एकताच रडताना ही तीचे गाल आरक्त झाले नजर झुकली त्याने तिचे अश्रू पुसले ) आणि तुझं प्रेम खर करण तू आधी सांगितले आणि माझं खोटं करण मी नंतर सांगितले . मग अस असेल तर मॅडम जरा बेडरूम मध्ये जाऊन बघा तर मग समजेल आम्ही उशिरा का आलो ते ” नितुने प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याला बघितले तेव्हा त्याने हातानेच बेडरूम कडे इशारा केला .

ती गेली आणि दरवाजा उघडला पाठोपाठ आलेल्या राज ने lights ऑन केले बेड वरच्या भीतीला नीतू आणि राजच्या लग्नातील फोटो फ्रेम केला होता . नितुच्या आवडीच्या तिच्या माहेरच्या बेडरूममधल्या wind chimes लावल्या होत्या तिच्या आईबाबांचा आणि तिचे फोटो कोलाज करून लावले होते रेड बलूनस आणि सेंटेड कॅडल्स सजवलेला बेड आणि त्यावर एक गिफ्ट बॉक्स

तिला काही कळायच्या आताच राज ने तिला ते गिफ्ट बॉक्स उगडायला सांगितलं त्यात तिचे वेगवेगळ्या मूड मधले 12 फोटो आणि राज तिच्या प्रेमात पडण्याची 12 कारणे लिहिली होती हो ते हँडमेड होत .

नितु हे सगल बघून थक्क झाली होती तिला हे अनपेक्षित होत राजने तिला मिठीत घेतले तिनेही त्याला घट्ट मिठी मारली आणि सॉरी म्हणाली .
राज : सॉरी ऐकण्यासाठी नाही केलाय एवढा खटाटोप
नीतू : मग
राज : नीतू I love you
नीतू : म्हह
राज : काय
नीतू : मी पण
राज: तू पण काय
नीतू : जा ना रे तू

खूप लाजली ती डोळ्यात आनंदाचे अश्रू आणि भविष्याची रंगीत स्वप्ने समोर साकारणारा संसार आणि राजची खरेपणाची साथ सगळं विस्मयकारक. भविष्याची सुखमयी पहाट त्यांना खुणावत होती.

समाप्त

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा