द डार्क नाईट….. कोरोना.

Written by

डार्क नाईट…. कोरोना.

एक शेतकरी नेहमी त्याच्या पूर्वजांना, राजांनी दिलेली घड्याळ घेऊन शेतात जायचा. एकदिवशी त्याची ती घड्याळ त्याच्यामुळे शेतात हरवली. घड्याळ पूर्वजांनी त्याला दिली असल्यामुळे त्या घड्याळच मुल्य त्याच्या साठी खुप मोठं होत. त्याने ती हरवलेली घड्याळ खुप वेळ शेतात शोधली. पण त्याला ती सापडतच नव्हती. त्यामुळे तो थकला आणि बाजुला लहान मुले खेळत होती त्यांच्यामध्ये जावून बसला. त्याने त्या मुलांसोबत एक खेळ खेळण्याची युक्ती काढली. जो शेतात हरवलेली घड्याळ शोधेल त्याला बक्षीस देणार असा वादा त्या तीन लहान मुलांना केला . बक्षीस भेटणार हे ऐकून ती तिन्ही मुले धावतच शेताकडे निघाली. त्या तीन मुलांनी देखील खुप वेळ घड्याळ शोधली पण त्यांना देखील सापडत नव्हती.त्यामुळे तो शेतकरी खुप नाराज झाला. तेव्हड्यात त्या तीन मुलानं पैकी एका मुलाने हात वर केला आणि मला एक चान्स परत द्या म्हणून त्या शेतकऱ्याला विनंती करू लागला…. घड्याळ भेटणारच नाही असं त्याला वाटत होत त्यामुळे शेतकऱ्याने त्या मुलाला नकार दिला. तो मुलगा खूप नाराज झाला त्याला नाराज बघून शेतकऱ्याने त्याला परत होकार दिला.
तो मुलगा आनंदी होऊन घडयाळ शोधण्यासाठी परत शेतात गेला. थोड्यावेळातच त्या मुलाने त्या शेतकऱ्याची घड्याळ शोधुन आणली. शेतकरी खुपचं आच्छार्य चकीत झाला त्याला खुपचं आनंद झाला.
त्याने त्या मुलाला आवाज दिला आणि आम्ही सगळे हरलोत पण तु कसा जिंकलास अस त्या मुलाला विचारल त्यावर तो मुलगा म्हणाला ” मी काहीच नाही केलं. मी फकत जमिनीवर शांत बसलो आणि आवाज ऐकला. त्या शांत आवाजात मला घड्याळचा टिकटिक आवाज ऐकू आला आणि मी आवाज येणाऱ्या दिशे कडे शोधल त्यामुळे मला घड्याळ सापडली.”

गेल्या १५ ते २० दिवसांपासून मेडिकल शी संबंध असलेले सर्व शासकीय अधिकारी,डॉक्टर , नर्स आणि इतर कर्मचारी १८ तास किंवा ड्युटी असलेल्या वेळेपेक्षा जास्त काम करत आहेत. मी पण शासकीय वैद्यकिय अधिकारी या नात्याने माझी ड्युटी करत आहे.
काल संध्याकाळी ५ वाजता मी ड्युटीवर आलो .नाईट ला एकच डॉक्टर असल्यामुळे मला तीन वॉर्ड, प्रसुती कक्ष, तसेच कॅसुल्टी पण सांभाळावी लागते. .रात्रभर जागरण करायचं असल्यामुळे मी casualty मध्येच बसलो. काल सोबतीला रमेश ब्रदर ड्युटी ला होते. ते पण पुण्यात जॉब साठी एकटेच राहतात त्यांनी हॉस्पिटल च्या बाजुलाच रूम घेतली आहे. जेवण पण तिथच बनवतात , लग्न ठरलेलं आहे पण अजून लग्नाची तारीख ठरली नाही, २ महिन्यानी बहुतेक असेल अस सगळ ते ब्रदर मला एका श्वासात सागण्याचा प्रयत्न करत होते. मी हॉस्पीटल मध्ये काल संध्याकाळी 5 ला गेलो होतो.आज दुपारी २:३० वाजता घरी आलो. माझी २२ तास ड्युटी झाली.
नाईट शिप करून मी दुपारी घरी जायला निघालो. रात्रभर झोप झाली नसल्याने माझा गाडी चालवताना अचानक डोळा लागला. पण लगेच जाग पण आली. कर्फिव असल्यामुळे रस्त्यावर गर्दी नव्हती त्यामुळे लवकरच घरी पोहचलो. फ्रेश झालो मोबाईल बघितला. माझ्या फोनवर 16 मिसकॉल होते. फोन सायलेंट असल्यामुळे माझ लक्ष नव्हत. फोन एका डॉक्टर मित्रा चा होता.
त्याला माझ्या रूम ची चावी हवी होती.मी त्याला कारण विचारल तर त्याने जे सांगितल ते खुप भयानक होत. त्याला त्याच्या घर मालकाने त्याला न सांगता. त्याच सामान रूम मधुन बाहेर काढून टाकल. त्या मित्राने त्या रूम मालकाला कारण विचारलं तर त्या मालकाने सांगितल की तुम्ही कोरोनाग्रस्त पेशंटला चेक करता आणि त्यामुळे ते इन्फेक्शन तुमच्यामुळे आमच्या घराकडे येणार म्हणून रूम खाली केली. किती सहजरीत्या तो व्यक्ती बोलुन गेला. माझा मित्र हा पुण्यात नवीन असल्यामुळे मला काही दिवस द्या मी रूम सोडतो अश्या विनंत्या त्याने खुप वेळ केल्या. पण त्यांनी ऐकले नाही. म्हणून नंतर त्याने मला कॉल केला.
मी बॅग ठेवून परत त्या मित्राकडे निघालो आणि डॉ. विनय या माझ्या मित्राच्या रुममध्ये त्याला शिफ्ट केल.
लगेच संध्याकाळी परत वेगळा अनुभव आला.माझ चार्जर हॉस्पिटल मध्येच राहिलं असल्यामुळे मी हॉस्पिटल मध्ये कॉल केला. काल नाईट ला सोबत असलेल्या ब्रदर ने च फोन उचलला ते हॉस्पिटल मध्येच राहत आहेत कारण त्यांना देखील रूम मालकांनी घर खाली करायला सांगितल. त्या रूम मालकांनी तर त्यांच्या रूम च्या लॉक वर स्वतचं दुसरं लॉक लावलं.
माझी एक मैत्रीण पुण्यातच शासकीय वैद्यकिय अधिकारी आहे .ती राहायला एका नामांकित सोसायटी असते. तिला दोन दिवसा आधी एका मोठ्या राजकारणी व्यक्तीचा फोन आला आणि तुम्ही ज्या सोसायटी मध्ये राहता तिथल्या बी विंग ला माझी मुलगी राहते . तिच्या वरच्या मजल्यावर कोणी फॉरेन रिटर्न एक व्यक्ती आहे. जे इंडियन च आहेत. त्यांना सोसायटीतून काढा असा त्या कॉल वरील नेत्याने आदेश दिला. त्या वर माझ्या मैत्रिणीने त्या नेत्याच्या आदेशाला नकार दिला. कारण तो फॉरेन रिटर्न व्यक्ती सरकारी हॉस्पिटल मधुन स्वतची चेकअप करून आला होता. त्याला १४ दिवसांसाठी घरात राहायला सांगितल आहे तसच माझी मैत्रीण त्या सोसायटीत किराया देऊन राहते आणि त्या फॉरेन रिटर्न व्यक्तीचं स्वतचं घर आहे . त्यामुळे तिला त्या व्यक्तीला स्वतच्या घरातून काढेने कस शक्य असणार म्हणून तिने त्या राजकारणी व्यक्तीला नकार दिला.पण त्या राजकारण्यांनी तिला तुझी नोकरी कॅन्सल करतो अश्या धमक्या दिल्या……
कुठ चालोय आपण . टाळ्या किंवा थाळ्या वाजवून तुम्ही गोंधळ घालू शकता पण हे वास्तव नाही लपवू शकत.
वैद्यकिय क्षेत्राशी निगडित असलेला प्रत्येकच व्यक्ती हा करोनाच्या रुग्णाच्या संपर्कात येत नसतो. काही ठरवून दिलेल्या व्यक्तीशीच त्या रुग्णांचा संपर्क येतो पण संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शासनाने काही गावून आणि मास्क तसेच काही किट दिल्या आहेत. त्यामुळे करोणाग्रस्त रुग्ण हा डॉक्टर किंवा इतर कर्मचाऱ्यांच्या सरळ संपर्कात येत नाही हे आपल्याला माहीत असावं.
अशा युद्ध परिस्तिथी मध्ये आपण डॉक्टर आणि इतर आपत्कालीन परिस्थितीशी लढणाऱ्या व्यक्तींना मदत करणे गरजेचे असते. शारीरिक तर ते थकलेलेच आहेत पण असा वरील प्रकार करून आपण त्यांना मानसिक रित्या देखील थकवत आहोत.
कुठलाही निर्णय घेतांना वर सांगीतलेल्या कथेमधील शेतकऱ्याची घड्याळ शोधणारा मुलगा ज्या प्रमाणे शांत राहून घड्याळीचा आवाज ऐकतो आणि घड्याळ शोधतो त्याच प्रमाणे आजच्या या परिस्थितीत आपण पण शांत राहुन आवाज ऐकला तर कितीतरी डॉक्टर, नर्स आणि इतर स्टाफ यांच्या हृदयाचा आवाज ऐकू येईल.
वरील कथेचा बोध खुप सोपा आहे.
विचारात असलेल्या मना पेक्षा शांत असलेले मन उत्तम मार्ग दाखवतो.
त्यामुळे आपण या डार्क नाईट शी सर्व थोडं शांत राहून लढुया ……

~डॉ. राहुल दासु इंगळे
[email protected]

कारोना बद्दल कुठलीही शंका असल्यास या माझ्या इंस्टाग्राम लिंक वर मेसेज करा.

Instagram.com/rahuldasuingle

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.