धबधबा : जीवनात उत्साह आणणारा प्रवाह

Written by

पावसाळा आला की पावले धबधब्यांचे नयनरम्य सौंदर्य पहाण्यासाठी वळतात.डोंगर कपारीतुन वेडीवाकडी वळणे घेउन लयबद्धरित्या नाचत बागडत पाणी धबधब्याकडे जाते.उंचावरुन कोसळणारा पांढराशुभ्र धबधबा सार्यांचे लक्ष वेधून घेतो.वरुन कोसळताना त्याचा नादमधुर आवाज , मनाला भावणारे तुषार आणि पावसाची रिमझीम अस वाटत…..भिजून ओलचिंब होवुन या थेंबानी सदा टिपकतच रहावे….. निसर्गाची ही किमया आगळीवेगळीच असते …अशाच धबधब्याविषयी कवीमन जागृत झाल…..आणि सुचल्या या पंक्ती……….!!

? धबधबा : मानवी जीवनाला उत्साही करणारा प्रवाह…..!!

पावसाळ्यात सुरु होते
धबधब्यांचे आस्तित्व
त्यांच्या या किमयेने सुचते कवित्व

दर्याखोर्यातुन हा खळाळतो
सुश्राव्य आवाज त्याचा आवडतो

हिरव्यागार निसर्गाचा असतो तो साक्षीदार
थेंब थेंब त्याचा बहारदार

विलोभनिय मोहक त्याचे रुप
निसर्गाच्या सानिध्यात सुंदर दिसे खुप

उंच उंच कड्यावरुन तो कोसळतो
वेगाने तो दुधासारखा फेसाळतो

तुषारात त्याच्या मस्त भिजावे
प्रवाहात त्याच्या जीवानाचे गाणे गुणगुणावे

अबालवृधांचे तो असातो आकर्षण
स्मरणात रहातो त्याचा ऊधळणारा क्षण

सुंदर दिसण्यासाठी स्वतःला प्रवाहात देतो झोकून
धबधब्यांकडून हा गुण घ्यावा मानवाने शिकून

✍नामदेव पाटील..

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा