धरतीच फुफ्फुस धगधगतय … निसर्ग काहीतरी संकेत देतोय का …

Written by

गेल्या आठ दिवसांपासून मी धगधगणाऱ्या धरतीच्या फुफ्फुसाबद्दल सोशल मिडीयावर वेगवेगळ्या पोस्ट वाचत आहे. या आठ दिवसात जवळ जवळ 2700 किमीचा परिसर एका पेटलेल्या वणव्याणे आपल्या कवेत घेतले आहे. या वणव्यामुळे ब्राझील सारख्या देशात आणीबाणीची परीस्थिती उद्भवली आहे.
या क्षेत्रात धरतीवर निर्माण होणाऱ्या ऑक्सीजन पैकी 20% ऑक्सिजन निर्माण होतं हेच या क्षेत्राला धरतीच फुफ्फुस म्हणून संबोधण्याच मुख्य कारण आहे. (© खादीम सय्यद )
तब्बल 55 लाख चौरस किमीच्या परीसरात याचा विस्तार आहे. त्याला जग ॲमेझॉनच जंगल म्हणून म्हणून ओळखतो. या जंगलात 39 लाखाहून अधिक वृक्ष आहेत. 16 हजाराहून जास्त दुर्मिळ झाडाझुडपांच्या प्रजातींचा येथे वास्तव्य आहे. 25 लाखाहून अधिक कीटकांचे हे घर आहे. 500 पेक्षा जास्त आदिवासी या जंगलात राहतात. ज्यांचा इतर जगाशी कुठलाही संपर्क नाही. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणारे व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तत्पर असणार हे जंगल आज धुमसतोय, केवळ मानवी हव्यासापोटी. (© खादीम सय्यद )
नऊ देशाचा परिसर व्यापणाऱ्या या क्षेत्रात लाकूडतोड कंपन्यांद्वारे आगीचे वणवे पेटवले जातात असा आरोप नेहमीच स्थानिकांकडून केला जातो. या वणव्यातून निघणारा धूर थेट अंतराळातून स्पष्ट दिसत आहे. नासाने टिपलेले याची काही दृश्य ही प्रसारित केले आहेत. जागतिक हवामान संघटनेच्या आकडेवारी नुसार वायव्येतील पर्जन्य सृष्टीपासून ते अटलांटीक किनाऱ्यावरून हजारोमैल दुर असलेल्या रिओ दे जेनेइरोपर्यंत धुर पसरला आहे. आज या आगीच्या झळा आपल्या पर्यंत पोहचत नसल्यातरी भविष्यात आपणही ब्राझीलच्या जागी असू शकतो.
मानव वर्षानुवर्षे तिच तिच चूक पुन्हा पुन्हा करत आहे. अनेक नदीपात्रात डेव्हलपमेंटच्या नावाखाली घरे बांधण्यात आली. कितीतरी हिरवाईने नटलेली जंगले नष्ट करून सिमेंटची जंगले उभे करण्यात आली. त्याची पावती म्हणून निसर्ग वेगवेगळ्या नैसर्गिक संकटाच्या रूपात आपल्या समोर उभा ठाकतोय आणि म्हणूनच मनात प्रश्न निर्माण होतोय. निसर्ग काहीतरी संकेत देतोय का … ?
© खादीम सय्यद

Article Tags:
· ·
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा