धुंदी कळयांना भाग-3

Written by

त्याने पकडलेला हात तिने कसाबसा सोडवला,…आणि चिडलीच जरा ती,…त्याने अगदी सहजतेने घेतलं हे सगळं आणि आपला राग आणि भावना लपवत तो म्हणाला,”अग साखरपुडा झाला आहे आपला,…परत विरह 3 महिन्याचा कसा राहू तुझ्याशिवाय मग ह्या क्षणांची गोड आठवण नको का,..हं,..??”.तिच्या मानेवर गरम श्वास सोडत त्याने परत तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला,….ती परत घाबरली पण तिच्या लक्षात आलं आता स्वतःला सांभाळायचं असेल तर ठाम रहायला हवं,…पण जरा गोडीत कारण प्रकरण जरा जास्तच बिघडेल आपण चिडलो तर,…

त्याच्याच स्वरात सुर मिसळत ती म्हणाली,”तुझं सगळं खरं आहे रे,…पण अशीच आठवण कशाला हवी ना,…शेवटी हि ओढच तर आठवणीत बांधून ठेवेल आपल्याला,….फक्त 3 महिन्याची तर गोष्ट आहे,….तिच बोलणं ऐकून आता मात्र चांगला चिडला तो,…म्हणूनच आईला म्हणत होतो नको ह्या भारतीय पोरी फार चारित्र्याचा गवगवा करतात,…अग फॉरेन मध्ये ह्याला नैसर्गिक समजतात सगळं,…तो परत तिला ओढणार आता होता मात्र सावळी चिडली,…”मग तू फॉरेनचीच मुलगी कर,…अरे विवाहपूर्व किंवा विवाह बाह्य सम्बन्धच समाजात पसरवायचे असतील तर कशाला हि विवाह संस्था ,कुटुंब संस्था अस्तित्वात ठेवता??,…कशाला अडकवता स्वतःला ह्या बंधनात,…?आज 30 वर्षात जो देह जपला तो काय असाच का,..?भावना मला देखील आहेत पण त्यांना काबूत ठेवणारं मन देखील माझ्याजवळ आहे,…मला माफ कर तुझी हि मागणी मी पूर्ण करू शकणार नाही,…तो तणतणत निघून गेला,…त्याच दिवशी लग्न मोडल्याचा फोन आला घडलेलं सगळं मला सांगावं वाटलं नाही कारण शरीरसंबंध ह्यावर आपण मोकळे पणानी बोललोच नाही कधी,….त्या लग्न मोडल्याच खापर आई आजही माझ्यावरच फोडते,…तिला खरंतर पुसट सगळी त्याची मागणी सांगितली होती मी त्यावर चिडून म्हणते करायच मग इथे आईबापांच्या उरावर किती दिवस पडायचे आहे तुला,… आईच ते बोलणं ऐकून वाटलं,”तुम्ही दिलेले संस्कार असे मोडीत काढायचे आहेत तर मग रुजवू तरी नका आमच्यावर,…पण बोलणं व्यर्थ होतं,…

त्या घटनेपासून परत आई आणि बाबांनी जो माझा राग राग करणं सुरू केलं आहे ते आजपर्यंत,….आजच ठिकाण काही झालं तरी नाकारायचे नाही असा हट्ट आहे आईचा,…..मुलगा एकटाच आहे त्याला आई वडिल कोणी नाही कसाही असला दिसायला तरी होच म्हणायचं असं सारख ओरडून सांगत होती आई ,….

अगदी जेमतेम नोकरी दिसायला अगदी साधारण होता हा मुलगा पण पसंती आली तर होच कळवू आईने फर्मान सोडलं,…सावळी शून्यात नजर हरवून बसली होती आणि आलाच त्यांच्या पसंतीचा फोन,…नाराजीतच लग्न झालं,…

आज पहिल्या रात्री सावळी त्या फॉरेनच्या मुलाच्या घटनेने आधीच घाबरली होती,…आणि मनाला समजावत पण होती,..तेवढ्यात तो आला,…सावळी जरा खिन्न मनानेच बसली होती,..त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला,…आणि म्हणाला,”तू लग्न ठरलं तशी जरा खिन्न दिसतेस मला तुला भेटायचं होतं पण तुझ्या घरच्यांनी लग्नाची जी घाई केली त्यात हे जमलं नाही,…आज आपल्या मिलनाच्या पहिल्या रात्री सांगतो,..स्त्री पुरुष एक आकर्षण देवाने पृथ्वीवर आणलंय पण ,..त्यात दोघांना शरीर भिन्न असले तरी मन मात्र सारखेच आहे,…जेंव्हा आपलं मन जुळेल तेंव्हाच शरीराच्या मिलनाची गम्मत कळेल तुला त्यामुळे,… आज उगाच आकर्षणापायी ते झटणं नको,…झोप आता तू,…तो झोपलाही ,,….सावळीला त्याच्या विचारांचे आश्चर्य वाटले,…त्या दिवशीची शरीरासाठी असलेली झटापट पूर्ण अधिकार नसतानाही आणि आज ह्याचा अधिकार असून ह्याने समजवलेली मनोमिलनाची व्याख्या किती विरुद्ध,…खरतर तो दिसण्यापासून ते नोकरी पैश्याने ह्या ठिकाणापेक्षा वरचढ होता पण हा मनाने आणि संस्काराने जास्त श्रीमंत आहे ती ह्या विचाराने सुखावली आणि खुप दिवसांनी शांत झोपली,.. सकाळी जाग आली तेंव्हा त्याने गॅसवर ठेवलेल्या चहाच्या वासाने तिला प्रसन्न वाटलं आणि सोबत रेडिओवर चालू असलेल्या गाण्याने तिला अधिकच प्रसन्न वाटलं,…गाणंही तसच होतं,..

“धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना शब्द रूप आले मुक्या भावनांना,…”

चहाचा कप घेतांना त्याचा अलगद स्पर्श तिला खरंच फुलवून गेला,..😊

आजकाल बाजारी शृंगारामुळे हरवत चाललेल्या सुंदर भावना कुठेतरी शब्दात मांडाव्या वाटल्या कथा कशी वाटली नक्की सांगा😊

©स्वप्ना मुळे(मायी) औरंगाबाद

Article Tags:
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा