धुंदी कळ्यांना

Written by

धुंदी कळ्यांना भाग–1

©स्वप्ना मुळे(मायी)

आज परत सुमतीबाईंची तणतण सुरूच होती,…भांडे लावताना ती अदळ आपट करूनच जागेवर जात होती आणि त्या वेगात तोंडाचा पट्टा पण सुरूच होता,…सावळी मात्र आईची बडबड त्रासदायक होत असुनही ती ऐकत आपलं काम निमुटपणे करत होती,…धुणं धुताना तिला हे जाणवतही नव्हतं कि आपण किती घळाघळा रडतोय आपल्याच आयुष्यावर ,…जसं 30सावं लागलं तसं तर आता आईला आणि बाबांना आपण अगदीच जड झालोय,…कधी एकदाच ह्या घरातून आपण जाऊ असंच झालं आहे त्यांना पण आता आपण तरी काय करणार घटनाच अश्या घडत चालल्या आहेत,…त्यात आईने ज्योतिष्याकडे जाऊन जाऊन स्वतःला इतकं निगेटिव्ह करून घेतलं आहे,…पण त्याने सांगितलेले शेवटच वाक्य काही लक्षात ठेवत नाही ती,…तो ज्योतिष म्हणाला होता,…सगळं चांगलं होईल ह्या सगळ्यातून पण उशीरा आहेत चांगले योग,… हे विसरल्यामुळे तिला तर जे ठिकाण आलं ते आता जमुनच जावं म्हणून वाटतं,… मला तर धमकी दिल्यासारखीच बोलते आता,…ह्याला जर नाही म्हंटलीस तर बघ,…. आपणही तिचा विचार करून किंवा खरंतर घरच्या ह्या सगळ्या वातावरणाला कंटाळुन २ महिन्यापूर्वी आलेल्या ठिकाणाला हो म्हंटलो होतो आपण,…अगदी सगळं ठरल्यासारखच झालं होतं,…पण आपलं फबी अकाऊंट बघुन त्यात असलेले पुरूष फ्रेंडलिस्ट बघुन त्याच्या बहिणीने नकार दयायला लावला आणि त्याने पण तो दिला,…खरंतर एक दोन वेळा भेटी झाल्या होत्या छान विचार जुळत होते असं वाटत होतं,…पण मध्येच हे काय झालं,….खरं आपण स्वप्नच बघू नाहीत का??

त्या ज्योतिष्याने सांगितलेले सगळे प्रयोग हि सारखी करून घेते माझ्याकडून मी कितीही थकलेली असले,बिझी असले तरी सारखे फोन येताना कृष्ण मंदिरात 5 दिवे लावून ये,.. देवीला वेणी अर्पण करून ये,… एक ना अनेक वहीत त्या उपयां शिवाय काही नाही तिच्या,…तिचा राग करावा का किव हेच कळेनासं झालंय,.. पण काय करणार आईच शेवटी ती,… हळवी असणारच म्हणून असं काही तरी बोलून जाते,..कडकड भांडते,…आपण लहान असलो तरी आता समजुन घ्यायला हवं ना तिला,…पण बाबा बाबांना तर सगळं दिसतंय कळतंय,…पण बाबा पण अशीच चिडचिड करतायेत माझ्यावर,…मलाही वाटतंय ना लग्न व्हावं माझं,…माझ्या मैत्रिणींना लेकरं झाली आहेत,…खरंतर मी कुठेच नाही म्हणत नाही पण समोरच्या मुलांकडून अस काहीतरी येत त्याला मी तरी काय करणार आता महिनाभरापूर्वी मावशीने आणलेलं ते परदेशातल ठिकाण खरंच छान होतं,… त्याच्या पुढे मी दिसायला तर अगदीच काहीतरी होते,…पण जमुन गेलं किती आनंदून गेलो होतो आपण,..सगळं जमल्यासारखच ना पण पण त्याने केलेली मागणी कसं शक्य होतं मी ती मागणी पूर्ण करणं?? आणि तश्या त्याच्या वागण्याला हो म्हणणं,…

क्रमशः,…

वाचकहो काय म्हंटला होता तो मुलगा तिला ज्यामुळे एवढं छान ठिकाण तिने नाकारलं वाचू यात पुढिल भागात धुंदी कळयांना भाग 2,…हा लेख कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा,..😊

©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद…..

Article Tags:
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा