धोका अंतिम भाग – 23

Written by

#धोका अंतिम भाग
#भाग 23
तर प्लॅन असा होता की …मला कॉल येईल की उमाकांत शुद्धीवर आला आहे आणि मी ताबडतोब निघायचं …हॉस्पिटलमध्ये जायचं मी गेलो …त्यापूर्वीच तिथून उमाकांत गायब झालेला …मग आम्ही एका गरीब शेतकऱ्याची मदत घेतली.. .खूप मागे. बिचाऱ्याच शेत कर्जात अडकलेलं होत …ते आम्ही सोडवून दिल होत…बिचारा खूप कृतकृत्य झाला होता …बोलला होता साहेब माझ्या योग्य काही सेवा असेल तर नक्की आठवण करा माझी …मी कधीच नाही म्हणणार नाही …त्यालाच तर माझा मोबाईल आणि पैसे घेऊन आम्ही नूतनकडे पाठवलं होत …आम्हाला घरी यात कोण कोण सामील आहे माहीत नव्हतं .. आणि माझी नूतन तर सगळ्यांनाच जीव लावते …
आता नुतनला खरी प्रोटेक्शन ची गरज होती …आणि त्या रात्री पावसाने साथ दिली आम्हाला . .म्हणून त्याच दिवशी मुहूर्त साधून अविनाशने नुतनला प्रपोज केले …तो आता सतत तिच्या सोबत असण खूप गरजेचं होतं …माझी नूतन बिचारी तुमच्यामध्ये अडकणार होती ना ..सांभाळायला हवं होतं तिला …त्याच नूतनवर अतोनात प्रेम असल्यामुळे ती त्याला नाही बोलूच शकली नाही …आणि पावसामुळे ती घरी जाऊ शकली नाही …मग आम्ही ठरल्याप्रमाणे दाजीबा म्हणजे तो शेतकरी…त्याला ऑफिस ला पाठवले …संशयाला कुठे जागाच नव्हती कोणाला …हॉस्पिटलमध्ये जेव्हा तुम्ही माझी डेथ बॉडी घ्यायला आले तेव्हा मी फक्त 5 मिनिट तिथे शवागरात झोपलो होतो …तिथला डॉक्टर अमोल गुप्ते त्याच सगळं शिक्षण माझ्या संस्थेनी करवल आणि त्याला तिथे कामाला पण लावलं होत …त्याने नियमांच्या पुढे जाऊन मला मदत केली …एक बेवारस शव त्यांनी पूर्णपणे पॅक करून दिल ..की चेहरा दिसू नये …त्याचा बांधा माझ्यासारखाच होता …तुम्ही तीच बॉडी घेऊन आलात आणि अंत्यसंस्कार केले…
आम्ही नुतनला पण काहीच सांगितल नाही …ती चुकून कोणालाही बोलेल ..ती खूप तापट आहे …रागाच्या भरात घरी येऊन तुमच्यासोबत जर भांडली …तर तुम्ही तीच काय कराल ?? त्यामुळे नाहीच सांगितलं …आम्हाला तू आणि भीमा एक आहात माहीत होतं ..पण अजून कोण कोण आहे समजत नव्हतं ..
मला नूतनची खूप काळजी वाटत होती त्यामुळे मी रात्री तिच्या बेडरूम मधेच होतो ..जर काही दगा झाला तर तिला वाचवण्यासाठी…आपल्या या घराला मी खुप चोर दरवाजे बनवलेले आहेत ..शिवाय 2 आशा रूम आहेत की त्या लक्षातच येत नाहीत तिथे मी माझी सर्व व्यवस्था केली…आणि तिथेच राहिलो …त्या दिवशी रात्री नूतनने मला पाहिलं मी पटकन त्या रुममध्ये जाऊन लपलो ..तिला वाटलं माझं भूतच आहे.
ती अस्थीविसर्जन करायची कल्पना पण अविनाशचीच …खरतर त्याला या संजूचा खूप संशय येत होता …आणि त्याची पडताळणी करण्यासाठी तो एकटा हातात येन खूप गरजेचं होतं …आम्ही गाडीत अंत्यसंस्कार करण्यासाठी जात असताना संजू थोडाही दुःखी दिसत नव्हता …ना रडत होता …उलट त्याला भूक लागत होती …तो मस्त गेम खेळत होता मोबाईलवर …मध्ये मध्ये काही टेक्स्ट पाठवत होता कोणाला तरी …आता आम्हाला ते टेक्स्ट बघणं गरजेचं होत…त्यादिवशी पण मी त्यांच्या गाडीच्या मागेच होतो …मी वॉशरूम मध्ये जात असताना नूतनने मला पाहिलं …आणि बेशुद्ध झाली …खूप वाईट वाटलं मला …मग अविनाशनने नूतनतला उचलून गाडीत नेलं …आज संजुच्या बोलण्यात नेहमीप्रमाणे नूतनसाठी प्रेम दिसत नव्हतं … मी त्याच हॉटेलमध्ये राहिलो…
दुपारी नूतन आणि संजू त्यांच्या रूम मध्ये असताना अविनाश त्यांच्या रूम मध्ये गेला खरतर संजूचा मोबाईल चेक करायचा.. पण नूतनसमोर कस करणार …तर नूतनच अविनाशच्या रूम मध्ये गेली ..तेही बरच झालं …मी रूमच्या की होल मध्ये पाहिलं तर झोपेचं सोंग घेतलेला संजू उठला आणि मेघनाला कॉल केला…त्याने तिला सगळं सांगितलं ..कस आले ..काय खाल्लं …मग नूतन कशी बेशुद्ध झाली …अविनाशच्या रूम मध्ये गेलीये ती आता …आणि फोन ठेऊन तो बाहेर निघाला ..मी लगेच बाजूला लपलो तर तो अविनाशच्या रूम मध्ये …त्याने डोअरबेल वाजवली…. नुतनला चल बोलला आणि घेऊन गेला .समोरची व्यक्ती काय बोलली काही समजलं नाही फोनवर …मग आम्ही ठरवलं आज रात्री नूतन अविनाश च्या रूम मध्ये राहील आणि ती जबाबदारी अविनाशची …रात्री जेवताना अविनाशने गुपचूप झोपेची गोळी संजुच्या भातात टाकली त्याला समजलं पण नाही …त्यामुळे रूम वर गेल्या गेल्या संजू गाढ झोपला …
हीच ती वेळ होती जेव्हा संजूचा मोबाईल चेक करता येणार होता …कदाचित आमचा संशय चुकीचा पण असू शकत होता …मुलगा असपन आईला संगणारच ना काय काय झालं ते …मग अविनाशने लाडीगोडी लावून नुतनला त्याच्या रूम मध्ये बोलवलं …मी संजुच्या रूम मध्ये गेलो …त्याचा मोबाईल घेतला …आणि कॉल्स मेसेज चेक करायला सुरुवात केली …त्याचे काही कॉल भीमाला आणि काही मेघनाला…अरे हा भीमाला का कॉल करत असेल बर …
मग मी त्याचे टेक्स्ट बघायला सुरवात केली …
संजू :आई अग ही नूतन आणि तो अविनाश जास्तच जवळ येतायत …मला असं वाटत आहे तोंड काळ करणार ही बाई …त्या विश्वासला समजलं असत हे सगळं तर कसलं वाईट वाटलं असत ना ..हवा होता तो हे बघायला ..त्याची लाडकी लेक काय दिवे लावतीये ते बघायला
मेघना : हो रे ..पण तिला हा चान्स पण त्याच्याच कामामुळे मिळालाय ना …आणि दोन हसरे ईमोजी..हे बघ मला सगळं सांगत रहा …विश्वास तर गेलाच आता या नूतनचा नंबर लावूया …तुमच्या हॉटेलचं नाव आणि पत्ता पाठव मला .. बघूया आजच काम तमाम करू तीच
संजू बर आई पाठवतो
हे टेक्स्ट बघून माझ्या डोक्यात झिंझिण्याचं आल्या
पुढचा टेक्स्ट संजूचा भीमाला :बाबा आई बोलते आज या नुतनला उडवायचा …मग छान होईलना?सगळी संपत्ती आपलीच …आणि तुम्हींतर मला आजून जास्त जीव लावाल हो ना ?बाबा मला तुमची खूप आठवण येतीये …आणि मी आईला आणि तुम्हाला अड्रेस पाठवतो आजच निकाल लावून टाका या बयाचा …
बापरे ..बिचारी माझी पोर किती जीव लावायची याला …आणि हा बघा
पुढचा टेक्स्ट
संजू : बाबा ..आई हा हॉटेलचा ऍड्रेस आणि पत्ता आहे …डिटेल्स दिलेले ..रूम नंबर 321 मी आणि नूतन इथेच आहोत …
मेघना :बर बाळा पुढे काय ते सांगते
भीमा : पोरा आज रातच्याला तू 3 वाजता बाथरूम मध्ये जा हे लोक येतीन आणि त्या नुतनला ठार मरतील ..तू त्यांच्या समोर येऊ नगस ..येडी अस्त्यात ही लोक …आन मग ते गेल्यावर तू जोर जोरात वरडं …कुणीतरी मारलं ताईला मी नेमका बाथरूम मधी व्हतो …मंग तुझ्याव आळ न्हाई यायचा
संजू : हो बाबा मी करतो तसच आता जेवायला जातोय खाली …जमलं तर करतो मेसेज …पण तुम्ही त्या माणसांना सांगा त्यांचं काम करायला ..
मी घामाने डबडबलो होतो …किती भयानक लोक आहेत हे …मी नूतनच्या जागेवर ब्लॅंकेट उशी लावून तीच झोपली आहे असा भास तयार केला …स्वतः तिथेच लपुन राहिलो बरोबर3ला 5 कमी असताना या संजुला बेड खाली लपवला…ती लोक आली ..आणि त्या उशीला मारून गेली …मी त्यात सॉस घालून ठेवला होता …त्यामुळे त्यांना वाटलं काम झालं …
आज रात्री नुतनला इकडे येऊच देऊ नकोस अस मी अविनाशला टेक्स्ट केलं होतं …सकाळी तुमच्या रूमवर आलो आणि संजूचा मोबाईल अविनाशला देऊन मी निघालो …नूतन झोपलेलीच होती …थोड्यावेळाने उठल्यावर आधी नूतन खूप टेन्शन मध्ये होती हे काय केलं आपण …आणि पूर्ण रस्ताभर बोलली नाही अविनाश सोबत ..संजुला वाटलं ..त्याचा मोबाइल हरवला.. तो रडत होता ताई मोबाइल हरवला माझा …नूतनने त्याची समजूत घातली आपण नवा घेऊ …
पण आता हे नुतनला सांगणं आवश्यक होतं आणि.. तीच.. हे तुमच्या तोंडुन वादवून घेऊ शकत होती …संजुला काही समजलंच नाही नूतन आजून जिवंत कशी …नक्कीच ते लोक आले नाहीत …त्याला फोन नसल्याने ना टेक्स्ट करता येत होता न कॉल …पण अविनाश आणि नूतन बोलत नाहीत पाहून त्याला बर वाटल
पुढे जेवणासाठी एका हॉटेलमध्ये आम्ही थांबलो …तिथे एक रूम मी आधीच घेतली होती …नूतन जेव्हा वॉशरूम जवळ आली… मी तीचा हात पकडला आणि तिला रूम मध्ये घेऊन गेलो …पाठोपाठ अविनाश पण आला …माझा चेहरा पाहिल्यामुळे ती ओरडली नाही . नशीब साथ देत होत …मला जिवंत पाहून ती खूप खुश झाली ..पण अवाक पण झाली …हे कसं काय?पप्पा तुम्ही?आणि अविनाश तुला कस माहीत ?
मग मी तिला सर्व माहिती दिली…संजुचे टेक्स्ट दाखवले …आजपर्यंत जे घडलं ते सगळं सांगितलं…आता आपल्याला पुरावा हवा होता …जो फक्त त्यांच्याकडूनच मिळू शकतो …पण तू आणि अविनाश नाराजच आहात अस दाखव …म्हणजे त्यांना तू आता बेसहारा झाली आहेस अस वाटेल आणि त्यांच्या तुला मारायच्या हालचाली आजच चालू होतील …
मी तुषारला पण सगळं सांगून ठेवलं होतं …तो तर मी जिवंत आहे ऐकून खूप खुश झाला …आणि आता मी आणि उमाकांत एकत्र झालोत ऐकल्यावर तर खूपच खुश…त्याला पुरावा हवा होता …त्याकरिता नूतनच हे नाटक …तुम्हाला वाटलं नूतनला मारलं त्या लोकांनी…. तुम्ही बेसावध होता ..त्यामुळे नुतनला लगेच तर नक्कीच काही करू शकणार नव्हतात…आमच्या या पाशात तुम्ही अडकले आहात..तुम्ही जे काही बोललात सगळं नूतनने रेकॉर्ड केलं आहे …
इतक्यात तिथे तुषार आणि अविनाश आले …तुषारने त्यांना अटक केली …मेघना ओरडत होती मी चुकले माफ करा …मला असं जेल मध्ये नका टाकू …माझा पोरगा लहान आहे त्याला तरी सोडा …इतक्यात तुषार बोलला …वहिनी आपण जे पेरतो तेच उगवतो हो …तुम्ही तुमच्या मुलाला पण फक्त लोभी बनवले तो तसाच झाला …आणि विश्वासने सगळ्यांना नेहमी मदत केली …चांगले संस्कार केले …त्याच्या पाठीशी खूप जण उभे राहिले …त्याने केलेल्या पुण्यकर्मामुळे तो तुमच्या कटामधून सहीसलामत सुटला …तुषार त्या तिघांना घेऊन गेला …इतक्यात छोटी राजुल बाहेर आली … जी इतकावेळ झोपली होती …
नूतनने तिला उचलून घेतलं …आणि बोलली आजपासून तू माझी बहिण नाहीस मुलगी आहेस …
अविनाशने पण पाठीमागून येऊन नूतनच्या खांद्यावर हात ठेवला …

तळ टीप : आज या कथेचा शेवटचा भाग आहे … मी तुम्हा सगळ्यांची खूप आभारी आहे …माझी कथा तुम्ही सगळ्यांनी मनापासून वाचली..खूप प्रेम मिळालं मला तुमच्याकडून …मला जसा वेळ मिळेल तशी मी कथा लिहीत होते तुमच्या उस्फुर्त काँमेंट्स आणि लाईक्स मुळे मी कथा लिहितच राहिले …चुकभुल द्याविघ्यावी …
लवकरच पुन्हा भेटू नवीन कथे सोबत

#पूनम पिंगळे

09धोका भाग 1 https://irablogging.com/%e0%a4%a7%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be-2/

धोका भाग 2 https://irablogging.com/%e0%a4%a7%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-2-2/

धोका भाग 3 https://irablogging.com/%e0%a4%a7%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-3/

धोका भाग 4 https://irablogging.com/%e0%a4%a7%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-4/

धोका भाग 5 https://irablogging.com/%e0%a4%a7%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-5-2/

धोका भाग 6 https://irablogging.com/%e0%a4%a7%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-6/

धोका भाग 7 https://irablogging.com/%e0%a4%a7%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-7/

धोका भाग 8 https://irablogging.com/%e0%a4%a7%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-8/

धोका भाग 9 https://irablogging.com/%e0%a4%a7%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-9/

धोका भाग 10 https://irablogging.com/%e0%a4%a7%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-10-2/

धोका भाग 11 https://irablogging.com/%e0%a4%a7%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-11/

धोका भाग 12 https://irablogging.com/%e0%a4%a7%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-12/

धोका भाग 13 https://irablogging.com/%e0%a4%a7%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-13-2/

धोका भाग 14 https://irablogging.com/%e0%a4%a7%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-14/

धोका भाग 15 https://irablogging.com/%e0%a4%a7%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-15/

धोका भाग 16 https://irablogging.com/%e0%a4%a7%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-16-2/

धोका भाग 17 https://irablogging.com/%e0%a4%a7%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-17/

धोका भाग 18 https://irablogging.com/%e0%a4%a7%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-18/

धोका भाग 19 https://irablogging.com/%e0%a4%a7%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-19-2/

धोका भाग 20 https://irablogging.com/%e0%a4%a7%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-20-2/

धोका भाग 21 https://irablogging.com/%e0%a4%a7%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-21/

धोका भाग 22 https://irablogging.com/%e0%a4%a7%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-22-2/

Article Categories:
रोमांचक

Comments are closed.