धोका भाग 11

Written by

#धोका
#भाग 11
उमकांतला विश्वासचा खूप राग येत असे…त्या दोघांना हे माहीतच नव्हते की आपण जुळे भाऊ आहोत ..उमकांतला नेहमी वाटत असे..साला आम्ही दोघे दिसतो सारखेच पण तो मोठ्या बापाचा आणि मी एका शेतकऱ्याच्या घरी जन्म घेतलाय..तो कसला सुखी आहे राव…त्यांच्या जीवावर मी शिकतोय वाढतोय जेव्हा की ते सगळं माझंच असायला हवंय…
आम्ही दोघे दिसतो सारखेच मग नशीब का वेगळी वेगळी?? सगळीकडे त्या विश्वासच्याच नावाचा बोलबाला आणि मी काय?
तो घरी जाऊन उमाला पण बोलायचा काय ग तुमच्या घरी कशाला जन्म दिलात मला ?का त्या विश्वासच्या घरून उचलून तर नाहीना आणलं मला आम्ही दोघे इतके सारखे कसे दिसतो?
आता बिचारी उमा काय बोलणार त्याला ती बोलायची अरे नशिबाच्या गोष्टी असतात या आणि या जगात एक सारखे दिसणारे 7 जण असतात आता त्यातले तुम्ही दोघे एकाच गावात जन्माला आला त्याला कोण काय करणार ?
जसजसा मोठा होऊ लागला तस तशी उमकांतची गुंडप्रवृत्ती वाढू लागली होती..चोऱ्या कर.. कुठे मुलींची छेड काढ..कुणाशीतरी बाळेच भांडण कर …उमा आणि अंकुशला तर नको नको झालं होतं अक्षरशः ..काय पाप केलं म्हणून अस पोरग नशिबाला आलय काही कळेना असच दोघे नेहमी बोलत …अशातच एका किरकोळ आजारात उमाच निधन झालं …अंकुशपण पार खचून गेला होता ..मी (मेघना) उमकांतच्या बाजूच्याच घरात रहात होते..त्यांची घरात होणारी रोजची भांडण मला ऐकू यायची …
आम्ही सगळे एकाच कॉलेज मध्ये होतो …मला विश्वास खुप आवडायचे आधीपासूनच …पण त्यांना तुझी आई अर्चना आवडायची..ते सतत तिच्या मागे मागे फिरायचे…होतीच तशी ती …गोरी गोरीपान …घारे घारे डोळे…कुरळे लांब आणि पिंगट केस…एखादी राजकुमारीच वाटायची ती …तुझे पप्पाच काय पूर्णकॉलेजची मुलंच माग होती तिच्या….प्रत्येकाला ती आपली व्हावी अस वाटत होतं…ती अगदी तुझ्यासारखीच होती …आणि मला नेहमी तुझ्या चेहऱ्यात तिचा चेहरा दिसतो …म्हणूनच तुझ्याशी वाईट वागायचे मी …बर असो ….तर त्या मुलांमध्ये उमाकांत पण होताच …तो रोज येताजाता तिला छेडायचा…कधी तिची वेणीच ओढ .. कधी ओढणी …कधी कधी बळेच एखादा रुमाल पुढे नेऊन अग हा तुझा रुमाल पडला बघ …तिने नकार दिला तर आग राणी माझ्याकडून गिफ्ट समजून घे ग…अस खूप काही रोजच चालू होतं…एक दिवसतर कहरच केला त्याने …सगळ्या कॉलेज समोर किस केलं त्याने तिला …
झालेला हा अपमान तिला सहन झाला नाही ती रडत रडत पळत सुटली…तेव्हा विश्वास तिथे नव्हते कोणीतरी त्यांना निरोप दिला आणि ते गाडीवर तिच्या मगोमाग गेले…ती टेकडीकडे चालली होती…हो बरोबर जीव द्यायला चालली होती ती …काय तोंड दाखवायचं घरी? काय बोलू आई बाबांना? जग माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघेल आता ..कशी नजरेला नजर देऊ …अस खूप काही तिच्या मनात येत होतं निम्म्या रस्त्यातच विश्वासने तिला गाठलं …थांब अर्चना अग असा टोकाचा निर्णय घेऊ नकोस …मला समजतंय तुझ्या मनात काय चालू आहे …अग तू मला लहानपणापासूनच खूप आवडतेस मी तुला इथून पुढे कुठलाही त्रास होऊ देणार नाही ..आज जे झालं ते तू विसरू शकत नाहीस समजतंय पण अग…बर ते सगळं जाऊदेत मी आजच तुझ्या घरी तुला मागणी घालायला येतो… मग कोण काही बोलणार नाही तुला…फक्त मला एक सांग हा वेडा नवरा चालेल ना तुला ….
अर्चना तर नुसती वेड्यासारखीच बघत बसली विश्वासकडे…एखाद्याने येऊन चिडवलं असत ..डिवचले असत आणि हा तर …ती झालेल्या प्रसंगामुळे खूपच वाईट मानस्थिती मध्ये होती पण अचानक येऊन विश्वासने तिच्या दुःखावर फुंकर घातली होती…तिने लाजत त्याला हो म्हटलं …बर मॅडम धन्यवाद आता आमच्या गाडीवर बसून तिला पण धन्य करा…ती अजूनच जास्त लाजली आणि गाडीवर बसायचा प्रयत्न करू लागली पण तिला काही बसताच येत नव्हतं…
विश्वास : मॅडम मी काही खाणार नाही तुम्हाला माझा खांदा आता तुमचाच आहे ठेवा हात आणि बसा नीट ….तिने लाजत घाबरत त्याच्या खंद्याचा आधार घेतला आणि गाडीवर बसली…
विश्वास : ए घट्ट धरून बस बाई मला…. नाहीतर मागच्या मागे पडून जाशील आणि मी असाच एकटा बडबडत पोहोचायचं घरी…
आता मात्र अर्चनाला हसू आवरलं नाही …ती पण मनापासून हसली आणि खरच त्याला घट्ट पकडून बसली..
त्याने तिला तिच्या घरी नेऊन सोडले…तोपर्यन्त घडला प्रकार तिच्या घरी समजला होताच …पण तिला हसत हसत घरी येताना पाहून तिच्या वडिलांचा पारा चढला …काय ग ए कारटे काही लाज… शरम …आहे का तुला ?..इतका मोठा प्रसंग घडूनपण तू हसत हसत घरी येतेस …जीव का नाही दिलास ग विहिरीत … बाईच्या जातील कशाला हवेत हे असले नखरे? रोज काय ते नटून थटून जायचं कॉलेजात ?आजपासून तुझं कॉलेज बंद …घरीच बसा …जरा घरातली काम शिका नीट…इतक्यात तिची आई आली
आई : काय हो …कधी नटली माझी पोरगी??त्या मेल्याची नजरच खराब …गावातल्या सगळ्या पोरींना त्रास देतो तो हैवान …आज आपल्या पोरीला त्रास दिला …काय ती गेली होती का त्याच्याकडे? ये आणि मला….जाऊदेत काही बोलायचं नाही माझ्या पोरीला…आता बायकांपुढे नवऱ्याचं काही चालतय होय…गप्प बसले …पण ती कॉलेजला जाणार नाही हा त्यांचा निर्णय मात्र पक्का आहे हे त्यांनी तिच्या आईला मोठ्या आवाजात सांगितलं ….
इकडे तिला घरी सोडल्यावर विश्वास तडक घरी गेला …आई बाबा मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचंय .. मला माहित आहे असा निर्णय मी स्वतः घेणं योग्य नाही …पण प्रसंगच असा होता की मला या वचनात अडकाव लागल …माझं शिक्षण आजून व्हायचंय ..मी पण ठरवलं होतं की शिक्षण पूर्ण झाल्यावरच मी लग्न करेन पण मला उद्याच त्या भट काकांच्या मुलीशी अर्चनाशी लग्न करायचे आहे..
आनंदराव आणि रुपमती एकदम शांतच झाले ..मग रुपमती : अरे पण असा अचानक का निर्णय …मला माहित आहे ती मुलगी खूप सुंदर आणि सुशील आहे ..आमची लग्नाला ना नाही …पण बाळा आधी तुझं शिक्षण तर पूर्ण कर
विश्वासने आज घडलेला सगळा प्रसंग सांगितला…अनंतराव आणि रुपमती लग्नाला तयार झाले ..पण अस लगेच उद्या वैगरे नाही ..तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस ..लग्न अगदी मोठं आणि रीतसर पद्धतीनेच होईल ..हा आज आपण जाऊन मागणी घालायचा कार्यक्रम उरकून घेऊन
विश्वासला तर सगळ स्वप्नच वाटत होतं …खरच किती भाग्यवान आहोत आपण …
रात्री सगळेजण रीतसर पणे अर्चनाच्या घरी गेले …अर्चनाने आधीच तिच्या आईला घडलेला सगळा प्रसंग सांगितला होताच …त्यामुळे ती तयारीतच होती अप
लाP..भटकाकाना मात्र हा मोठा सुखदायक धक्का होता …माझी मुलगी इतक्या मोठ्या घरची सून होणार ….सगळं काही छान छान होत होत …आता तिला कॉलेज साठी पण परवानगी मिळाली होती … लग्नाचा मुहूर्त काढण्यात आला तो 2 महिन्या नंतरचा होता …सगळी जोरदार तयारी चालू होती …इकडे उमाकांत संतापाणे नुसता पेटून उठला होता…नाही मी अर्चना त्याची होऊ देणार नाही …सगळंच कस त्याच ?ती फक्त माझीच होणार ..मी हे लग्न पण होऊ देणार नाही …
काही शेतीच्या कामासाठी विश्वासराव बाहेरगावी गेले होते त्यांना 2-3 दिवस लागणार होते … याची खबर उमकांतला मिळाली …त्या रात्री तो गुपचूप अर्चनाच्या घरी गेला त्याने तिला जागे केले ..आणि बोलला हे बघ अर्चना तुला माझीच व्हाव लागलं नाहीतर तुला दुसऱ्याची पण कोणाचीच होऊ देणार नाही …आज तू माझी होणार ती ओरडू लागली तर त्याने तिचीच चादर तिच्या तोंडावर बांधली …तरीपण ती जोरजोरत ओरडायचा प्रयत्न करू लागली …भटकाकाना काहीतरी आवाज जाणवला म्हणून त्यांनी येऊन पाहिलं…ते जोरजोरात ओरडू लागले अरे नाराधमा सोड माझ्या पोरीला …लाज नाही वाटत तुला …त्यांनी त्याला मागे ओढायला सुरवात केली …त्याने उठून रागाच्या भरात बाजूला पडलेले लाकूड त्यांच्या डोक्यात 2-3वेळा जोरजोरात मारले …रक्ताच्या चिरकांडया उडून ते जागेवरच मृत्यू पडले…तिची आई मध्ये आली त्याने तिला पण तसेच मारले …आणि कसलीशी गोळी अर्चनाच्या तोंडात कोंबली त्याने तिला थोड्याच वेळात ग्लानी आली …त्याने तिच्यावर रात्रभर जबरदस्ती केली …ती तर बिचारी शुद्धीत पण नव्हती …गावात कोणालाच काहीच खबर नव्हती ..इकडे काय घडलंय ते…सकाळी सकाळी विश्वास गावात आला …त्याला वाटलं जात जाता अर्चनाला भेटून जावं …उमाकांत तर सगळं उरकून पहाटेच पळून गेला होता….
विश्वासराव त्यांच्या घरी आले पाहतात तर दरवाजा उघडाच …आत जाऊन आवाज देऊ लागले पण काहीच प्रतिसाद नाहीं…त्यांना दोन देह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले …अर्चना अस्तव्यस्त पडली होती त्याने तिच्या अंगावर चादर टाकली …तिच्या आईची थोडीशी हालचाल विश्वासला जाणवली ….त्याने तत्काळ पोलीस आणि अँबुलन्स ला कॉल केला …

©पूनम पिंगळे

क्रमशः

Article Categories:
रोमांचक

Comments are closed.