धोका भाग 12

Written by

#धोका
भाग 12
झालेला प्रकार बघून विश्वासला खूप धक्का बसला होता …त्यात अर्चानाची अशी अवस्था बघून तर तो आतून पूर्ण कोलमडला होता …तो तिथेच डोक्याला हात लावून बसला होता …थोड्या वेळात तिथे पोलिस आणि अँबुलन्स दोन्ही पण आले ..पोलिसांनी तर विश्वासलाच हातकड्या घातल्या…तो कीती समजावून सांगत होता पण पोलीस ऐकायलाच तयार नव्हते …त्याने खूप विनंती करून घरी फोन केला …आनंतरावना सगळं काही सांगितलं थोडयाच वेळात अनंतराव वकिलांसोबत तिथे आले…त्यांनी जमानतीवर त्याला सोडवलं…
इकडे दवाखाण्यात अर्चना चे वडील तर लगेचच मृत्युमुखी पडले होते …पण तिची आई जिवंत होती ….परंतु बेशुद्ध होती …अर्चना तर खूप घाबरलेली होती …तिला दिलेल्या झोपेच्या औषधांचा असर उतरायला बराच वेळ लागला..ती जेव्हा शुद्धीवर आली तिला झालेला प्रसंग आठवला ..ती जोरजोरात ओरडू लागली बाबांना वाचवा माझ्या …आईग ..तो आलाय इथे पकडा त्याला …जेव्हा ती उठू लागली तेव्हा तिला जाणवलं की आपल्या शरीरासोबत काहीतरी भयानक प्रसंग घडला आहे …ती जोरजोरात रडू लागली …डॉक्टरांनी तिच्यावर उपाय चालू केले होते …पोलिसांना कळवण्यात आले की अर्चना आता शुद्धीवर आली आहे मनस्थिती खूप खराब आहे तिची …सांगता येत नाही ती जबानी देऊ शकेल की नाही…आणि तिची आई आजून शुद्धीवर आली नाहीये ….
थोड्याच वेळात तिथे पोलीस आले ..त्यांनी अर्चनाला विचारायला सुरवात केली
बोला ताई कोणी केलं हे सगळं …कस झालं …अर्चना फक्त बाबा माझ्या बाबांना वाचवा इतकच ओरडत होती
पोलिसांनी तिला पुन्हा पुन्हा विचारलं कदाचित ती थोडीशी सावरली असावी तिने अचानक उमाकांत …त्या उमकांतला सोडू नका .. माझं आयुष्य खराब केलं सगळं त्यांनी …मी आता कशी जगू??मी माझ्या विश्वासला कस तोंड दाखवू??
पोलीस : म्हणजे हे सगळं विश्वासनि नाही केलं??
अर्चना : वेड लागल का तुम्हाला?? माझा विश्वास कधीच अस वाईट काम करणार नाही ..ही सगळी करणी त्या उमाकांत ची आहे पकडा त्याला …
हे होत असतानाच तिथे आनंदराव आणि विश्वास आले ..अर्चना अस बोलताच विश्वास पळतच तिच्याजवळ पोहोचला तिला मिठीत घेतले …अग वेडे तू मनाला लावून घेऊ नकोस जे घडलं ते घडून गेलं ..तू माझ्यासाठी आजूनपन माझी आरचू आहेस आणि मी सतत तुझ्या सोबत आहे …फक्त आता जे घडलं ते सगळं पोलिसांना नीट सांग तिने ती बेशुद्ध होईपर्यंतच सगळं सांगितलं पण पुढे काय झालं ते मात्र तिला आठवत नव्हतं …चांगली गोष्ट् हीच होती की आता पोलिसांनी विश्वास अपराधी नाही हे मानलं होत.. पोलिस उमाकांतच्या घरी गेले पण तो तिथे नव्हता …पळून गेला होता तो …त्याला वाटलं होतं आपण 3 खून केलेत …
अर्चनाला आणि तिच्या आईला बर होण्यासाठी जवळ जवळ 3महिने लागले त्यामुळे त्यांचं लग्न पुढे ढकलल ..पण आजून ही उमाकांतचा तपासच नव्हता ..तो अधून मधून विश्वासला फोन करून धमकी द्यायचा अर्चना फक्त आणि फक्त माझी आहे तिला हात सुद्धा लावायचा नाहीस तू …नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही..
आज अर्चनाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार होता ..सगळे खुश होते की आता या दोघांचं लग्न करूया तिच्या आईला पण आता बर वाटत होतं …पण चालता चालताच अर्चनाला चक्कर आली आणि ती खाली पडली ..डॉक्टर पण चकित झाले सगळे रिपोर्ट तर नॉर्मल होते आता काय झालं हिला …त्यांनी चेक केलं …थोडा विचार करून त्यांनी स्त्रीरोग तज्ञा बोलवल्या आणि कन्फर्म झालं की ….डॉक्टरांना बरोबर वाटलं होतं…पण थोडं धक्कादायक होत ते…अर्चना आई होणार होती …उमाकांतच बाळ होत तिच्या पोटात…तिला वाटलं आता विश्वास आपल्याला सोडणार…पण नाही तरीपण विश्वासरावांनी तिच्याशी लग्न केलं …लग्नानंतर 7 महिन्यात तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला …आणि ही बातमी उमकांतला कुठून तरी मिळाली…तो त्याच रात्री हॉस्पिटलमध्ये आला माझं बाळ आणि माझी अर्चना याना मी घेऊन जाणार …अस बोलत तो तिच्या रूम मध्ये गेला तिथल्या नर्स ने त्याला ओळखले तिने पटकन विश्वासला फोन केला 10 मिनिटात तो तिथे पोहोचला पण जे नको ते झालं होतं …उमाकांत ने अर्चनाला तिथेच असणाऱ्या कात्रीने मारून टाकलं होतं आणि तो आता त्या बाळाला घेऊन पळून चालला होता ..विश्वासने येतानाच पोलिसांना फोन केला होताच..ते आणि विश्वास मागोमागच हॉस्पिटलमध्ये आले …विश्वासने अर्चनाला पहिला आणि त्याने मोठ्याने हंबरडाच फोडला …अरचु तू …त्याने डॉक्टरांना बोलावलं …पण नाही या वेळी ति त्याला कायमची सोडून गेली होती…
विश्वासने त्याला विचारले अरे का ?का ?अस का केलंस तू ?
उमाकांत : मग तिला चल म्हणत होतो तर ती पण येत नव्हती आणि माझ्या बाळाला मला घेऊन जाऊ देत नाही …पाठवली तिला पण तिच्या बापाकडे…हे माझं बाळ आहे मी घेऊन जाणार …आणि जर ती माझ्याकडे नाही तर कोणाकडेच राहू देणार नाही…ही माझी पोरगी आहे ..माझी ..काय?तुम्ही जर हिला माझ्याजवळ नाही राहू दिल तर हिलापण हिच्या आईकडे पाठवीन…
तो बोलण्यात गुंतला होता तेव्हाच काही पोलीस मागच्या खिडकीतून चलाखीने त्याच्या मागे आले आणि बाळाला काढून घेतल त्याच्या हातातून…दुसऱ्या पोलिसांनी त्याला हातकड्या घातल्या …बाळाची जबाबदारी विश्वासने घेतली…ते बाळ म्हणजेच तू ग …हो नूतन तू उमाकांत आणि अर्चनाची मुलगी आहेस मी तुझी आई नाही काकी आहे…तुला त्रास द्यायचं कारण फक्त तुझं अर्चना सारख दिसणं होत …
विश्वासराव त्यांची आई आणि वडील तुला लहानाची मोठी करत होते …माझा तर जीव अडकला होता ग विश्वरावांमध्ये …त्यानी त्यांच शिक्षण पूर्ण केलं …तेव्हा तू 5 वर्षाची झाली होतीस …एकीकडे उमाकांत ला वेडाचे झटके येत असल्यामुळे फाशी न देता वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ठेवले गेले …त्याच्या धक्क्याने त्याच्या आईला उमाला हार्ट अटॅक आला आणि त्यात त्या मरण पावल्या…
विश्वासरावांना आता आजिबात गावात राहावंसं वाटत नव्हतं पण त्यांना तुलाही अंतर द्यायचं नव्हतं …अनंतराव आणि रुपमती त्याच्या खूप मागे लागले होते दुसर लग्न कर …पण ते त्यासाठी पण तयार नव्हते …मग त्यांनी ते गाव सोडून लवकरच शहरात जायचा निर्णय घेतला पण अनंतराव आणि रुपमती काही गाव सोडायला तयार नव्हते ..मग नूतनची देखभाल कोण करणार …विश्वासराव खूप बेचैन झाले होते ..त्यांना काहीच मार्ग सापडत नव्हता

मला खूप वेळा वाटायचं ..त्यांच्या समोर जावं आणि सांगावं मला तुमच्या पायाशी स्थान द्या हो …मी सदैव तुमचीच आहे …इतर कोणाचा विचारही या मनात आजपर्यंत कधी आला नाही …पण कधी हिम्मतच झाली नाही
माझ्या वडीलांची परिस्थिती खूप वाईट होती …खूप प्रयत्न करून त्यांनी माझं लग्न ठरवलं होतं…तो मुलगा माझ्या पेक्षा 15 वर्षांनी मोठा होता …का तर मी गरीब घरची ना कोण करणार लग्न माझ्याशी ?अस माझ्या वडिलांना वाटत होतं ..हुंडा द्यायची किंवा लग्न करून द्यायची त्यांची ऐपतच नव्हती…मला काय करू काहीच समजत नव्हतं …कोणाकडे मदत मागू …आशा म्हाताऱ्या मानसासोबत लग्न करण्यापेक्षा मरण बर अस मला वाटू लागलं होतं …आणि मग माझ्या मनात काही आलं ….

© पूनम पिंगळे

क्रमशः

Article Categories:
रोमांचक

Comments are closed.