धोका भाग 16

Written by

#धोका
#भाग 16

विश्वास खूपच दुःखी झाले होते ..तुला आणि संजुला आम्ही घरीच ठेवलं होतं तस तुला आता चांगलं समजत होत …तुमची दोघांची देखभाल तिकडे भीमा करत होता ..अचानक एखादा करंट बसावा असे विश्वास उठले आणि भीमाला फोन केला …तो पुन्हा वेड्यांच्या हॉस्पिटलमधून पळाला आहे ..बाबांचा जीव गेलाय त्याच्यामुळे ..आई पण तीच भान हरपून बसलीये …ती मला उमाकांतचा भाऊ बोलतीये..काय झालंय आईला काही समजत नाही …
भीमा : साहेब आईसाहेब बराबर बोलतायेत तुम्ही अंकुशच पोर आहात ..जुळी पोर झालती त्यांना आणि त्यातलं येक त्यांनी आईसाहेबांच्या पदरात घातलं व्हत ..आणि तुमि पोरांची काळजी करू नका ..ह्यो वाघ इथं असताना त्याची काय बिशाद वो…समद उरकून या तुमि काय बी काळजी न्हाय..आन जर म्हणत असाल तर घिऊन येतो याना तिकडं..मला वाटतय म्या यायलाच पायजेल..सायेब येतू मी पोरासनी घेऊन..
विश्वास फक्त ऐकत होता …तो हो नाही काहीच बोलला नाही …मनस्थितीच नव्हती त्याची काही बोलायची ..भीमाने ड्राइवर सोबत घेऊन गाडीतून मुलांना घेऊन आला ..ते गावी येईपर्यंत आमचा जीवात जीव नव्हता …
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी भीमा पोहोचला …आईला पण शुद्ध आली होती …आता ती विश्वासलाच जवळ घेऊन बसली होती …माझ्या बाळा ..आता तूच रे माझा …त्या उमाकांत पासून जपून रहा रे बाबा …नुतनला पण जप ..ती तर त्याचीच मुलगी आहे तरी तिच्या जीवाच्या मागे लागलाय खविस …माझ्या नवऱ्याचा पण जीव घेतला त्यांनी …कधीही चांगल होणार नाही त्याच
विश्वासला आता बर वाटत होतं की निदान ती त्याला मुलगा मानून जवळ बसली होती ..पण मग काल जे घडलं ते काय होत ? कदाचित तो तिला आलेला पॅनिक अटॅक असावा …पण त्यात मला ती खर काय ते बोलून गेली …आता बाबा नाहीत मला तिची काळजी घ्यायला हवी …माझे आईवडील नसूनपन त्यांनी माझी किती काळजी घेतली …किती सुखात ठेवलं …मला कोणत्याही गोष्टीची कधीही कमतरता भासू दिली नाही …आता मला या उमाकांतला पण धडा शिकवायलाच पाहिजे …
आनंदरावानवर सगळे सोपस्कार झाले आज 13 वा होता त्यांचा रुपमती ला पुन्हा अटॅक आला होता …त्या ओरडू लागल्या माझा नवरा कुठे गेला ? कुठाय तो उमाकांत? आणि अचानक विश्वास च्या जवळ जाऊन त्यांचा गळा धरला …तुला नाही सोडणार आता उमाकांत …माझ्या नवऱ्याचा जीव घेतलास तू …,आता माझ्या विश्वास ला त्रास देतोस तू …आम्हाला सुखाने नाही जगू दिलस तू ..,ना तुझ्या आई बापाला सुख दिलस …आज सोडणार नाही तुला …जीवच घेते तुझा पण….सगळे जण धावत आले विश्वासला सोडवू लागले …मी तर खूप घाबरले होते …त्या काही विश्वासला सोडत नव्हत्या मग काय मी दिली श्रीमुखात भडकावून त्यांच्या …त्या बेशुद्ध झाल्या …अँबुलन्स बोलवले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवलं …इथे 13 व्याच बरंच काही व्हायचं होत त्यामुळे आम्हा दोघांना हॉस्पिटलमध्ये नाही जाता आलं
भीमा गेला त्यांच्या सोबत …,आणि त्यांना ऍडमिट करून लगेचच आला …सगळं आटोपून आम्ही हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत रुपमती देवाघरी गेल्या होत्या…पण त्या ज्या पद्धतीने गेल्या होत्या ते थोडं वेगळच वाटत होतं …चेहऱ्यावर खूप भीती होती त्यांच्या …डोळे खूप मोठे झाले होते …जीभ बाहेर आली होती …
इतक्यात तिथे डॉक्टर आले ते बोलले ,”अरे तुम्ही लगेच कपडेपन चेंज करून आलात ?वहिनी आत्ताच आल्या वाटत
विश्वास : काय ? अहो आम्ही आत्ताच तर येतोय
डॉक्टर : नाही हो मघाशी तुम्ही वेगळ्याच कापड्यामधे होतात…मी तुम्हाला सांगत होतो आता त्या बऱ्या आहेत ..पण तुम्ही माझ्याकडे पाहिलं पण नाही …मला वाटलं टेन्शन मध्ये आहात जाऊदेत …इतक्यात त्यांचं लक्ष रुपमती कडे गेलं …ते म्हणाले अहो हे काय ? यांचं अस काय झालंय ?अहो मघाशी एकदम ओके होत्या …काय केलं तुम्ही यांना …यांच्याकडे पाहून तर त्यांचा गळा दाबलाय अस दिसतंय …डॉक्टरांनी तपासलं ती या जगात नव्हती
डॉक्टरांना पूर्ण संशय विश्वासवरच होता ..त्यांच्या म्हणण्यानुसार तोच येऊन भेटून गेला आणि त्यांना मारून गेला …आता हे आजून नवीन संकट…आम्हाला समजलं हे काम उमाकांतचच …विश्वास डॉक्टरांना खूप समजावून सांगत होता …अहो आई आहे माझी ही ..मी का मारू तिला …आत्ताच वडिलांचा 13वा घालून आलोय आणि ..लगेच आईपण …माझी मनस्थिती समजून घ्या डॉक्टर मी खूप टेन्शन मध्ये आलोय …अचानक पोरका झालोय मी…मी का मारेल हो आईला माझ्या …डॉक्टरांनी काहीही ऐकलं नाही आणि पोलिसांना बोलावून घेतलं ….
तो आलेला पोलीस तुषार जाधव नेमका विश्वासचा वर्गमित्र निघाला … त्याला धक्काच बसला की विश्वासने अस काही केलं …तो उमाकांतला ही ओळखत होताच …तुषारने सर्व प्रकरण विचारले …आम्ही त्यांना सगळं सांगितलं …तुषार तिथे काही पुरावा मिळतोय का पाहत असतानाच त्यांचं लक्ष तिथे असणाऱ्या कॅमेऱ्याकडे गेलं …
इ.तुषार : डॉक्टर इथे हा जो कॅमेरा आहे तो चालू आहे का ?
डॉक्टर : अहो साहेब मोठं नावाजलेल हॉस्पिटल आहे आमचं ..बंद कॅमेरा का ठेऊ …
इ.तुषार : पण इथे असा का बसवला आहे
डॉक्टर : जेव्हा मेंटली डिस्टर्ब पेशंट्स येतात त्यांना आम्ही या रूम मध्ये ठेवतो observation साठी ठेवला आहे हा कॅमेरा
इ.तुषार : मला याच आजच रेकॉर्डिंग पाहायचं आहे …चला मला रेकॉर्डिंग रूम मध्ये घेऊन
डॉक्टर : ओहह येस…खरच की हे माझ्या डोक्यातच आलं नाही
इ.तुषार : म्हणूनच तर तुम्ही डॉक्टर आणि मी इन्स्पेक्टर आहे ना …
डॉक्टर तुषारला घेऊन रेकॉर्ड रूम मध्ये गेले तिथे ज्या वेळी उमाकांत आला होता त्यावेळी पासूनच रेकॉर्डिंग तुषारने चेक केलं ..जे पाहिलं ते पाहून तो सुन्न झाला ….

©पूनम पिंगळे
क्रमशः

Article Categories:
रोमांचक

Comments are closed.