धोका भाग 17

Written by

#धोका
#भाग 17
तुषारने रेकॉर्डिंग पाहायला सुरुवात केली …त्यामध्ये उमाकांतच होता भोवतेक …पण तो एकटा नव्हता त्याच्यासोबत आजून कोणीतरी होत …पण ती व्यक्ती पाठमोरी उभी होती रुपमती शुद्धीवर आली होती आणि जरा उठून बसली होती …उमाकांत ने गेल्या गेल्याच तिचा गळा पकडला आणि बोलला …बोल मी तुझाच मुलगा आहे ना का मला त्या भिकरड्यांच्या घरी पाठवलस ?बोल की ए म्हातारडे …
रुपमती हातवारे करत बोलू लागली …आधी गळा तर सोड बोलू कशी ?
उमकांतने तिचा गळा सोडला …मग रुपमती सांगू लागली तू आमचा मुलगा नाहीस आणि विश्वास पण नाही …पण तुम्ही दोघे भाऊ आहात आणि तुम्ही उमा आणि अंकुशची मूले आहात ..आम्हाला मुलबाळ नव्हतं म्हणून त्यांनी विश्वासला आम्हाला दत्तक दिला होतास …
उमाकांत : हो ना मग आजपासून मला पण घे दत्तक चल …आणि सगळी इस्टेट माझ्या नावावर कर आताच्या आत्ता …
रुपमती : ते मी नाही करू शकत ..
उमाकांत : का नाही करू शकत ? मग सगळ्यांच्या मैतीच बघ तू आता …एकतर सगळं माझ्या नावावर कर नाहीतर मी नूतनलाच काय कोणालाच जिवंत नाही सोडणार …आजपर्यंत सगळं माझ्या हक्काचं विश्वासलाच मिळत आलंय …त्यांनी बिझनेस चालू केला तर त्यात पण तो यशस्वी …तिथं पण आहेतच शत्रू त्याचे …हे बघ हे आहेत राजाराम भालेकर सर्वात मोठे शत्रू विश्वासचे …सगळ मार्केट तोडलं त्यांनी ह्यांच ..इतकंच नाही …त्यांचे जे काळे धंदे आहेत ते पण उघड केले …खुपसारा गैरकानुनी माल पकडून दिलाय यांचा त्यांनी …आणि राहील साहिल अस ते सोशल वर्क करतो ..काय ते आश्रम आन काय काय …त्यामुळे लोक त्याला निवडणुकीला उभं करणारेत …आता इतके वर्ष इथे रामरावांचं राज्य होत …आणि हा सगळ्याची वाट लावतोय.. मला त्यांनी आश्वासन दिलय जर मी त्यांना मदत केली तर सगळी तुमची इस्टेट माझी …बोल बाई मी आणलेल्या पेपर्स वर मुकाट्याने सही कर आणि सगळं माझ्या नावावर कर
रुपमती : अरे माझ्या सहीने काहीच होणार नाही …सर्व इस्टेट नूतन आणि विश्वासच्या नावावर आहे …आणि नूतन आजून सज्ञान नाही झाली त्यामुळे ती जबाबदारी पण विश्वासचीच …बघ मी तर काहीच नाही करू शकत ..हो पण तुझं आणि या रामरावच कारस्थान नक्कीच उघड पाडणार मी पोलिसांना आणि विश्वासला सगळं काही सांगणार
इतक्यात त्या बाजूच्या व्यक्तीचा आवाज …सोडू नकोस त्या बाईला ..वाट लावेल आपली आशिपन फिट्स येतात तिला ..अस कर गळा दाबून मार …फिटच येऊन मेलीये अस वाटेल …त्यांनी त्याच्याच गळ्यातला स्कार्फ काढून दिला तिला मारण्यासाठी … आणि उमाकांतने तो तिच्या गळ्याभोवती गुंडाळून फाशी दिली तिला ..जाताना दोघे वेगवेगळे गेले ..त्यामुळे बाहेर काहिच समजू शकलं नाही…
रिसेपशनच्या कॅमेऱ्यात बरोबर उमाकांत गेल्यानंतर10 मिनिटांनी विश्वास मझ्यासोबत आलेला दिसला
पण त्या व्यक्तीचा रामरावचा चेहरा काही दिसला नाही पूर्ण विडिओ मध्ये …
तुषारला आणि विश्वासला आत्ता समजलं की रामरावच्या साथिमुळे हा नेहमी हॉस्पिटलमधून पळून येतो तर …आणि इतका मोठा माणूस या प्रकरणात आहे ..तुषार तर सुन्नच झाला ..कारण आता हे प्रकरण थोड राजकीय वलयात पण येऊ लागलं होतं …लवकरच काही योग्य कारवाई नाही केली तर प्रकरण हाताबाहेर जाईल …आता या सगळ्यामागे कोण आहे हे तर समजलं होत पण त्यांचा चेहरा दिसत नसल्याने काहीच कारवाई करता येणार नव्हती ….
तुषार : विश्वास या विडिओ मधील उमकांतचा मस दिसत आहे तसाच तो बरच काही बोलला आहे त्यामुळे तू निर्दोष आहेस हे प्रुव होत ..त्यामुळे मी तुला अटक नाही करणार पण तुम्ही सगळे सांभाळून रहा …खूप पोहोचलेल्या माणसाची साथ आहे उमकांतला …
विश्वास : अरे तुषार thanku so much …,मला आता वेड लागेल असे वाटत आहे …,आत्ताच बाबा गेले त्यांचं दुःख पचवेपर्यंत आईपण गेली …आणि तिला मारणारा कोण तर माझा सख्खा जुळा भाऊ …आणि आता तोच भाऊ माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्यापण जीवावर उठला आहे..
त्याने सगळ्या फॉर्मालिटी पूर्ण करून आईची बॉडी ताब्यात घेतली …आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे अंत्यसंस्कार केले …तेरावा झल्याशिवाय तो तिथून निघू शकत नव्हता …
इकडे तुषारने त्या व्हिडिओच्या आधारावर उमाकांतला अटक केली …त्यातून हे पण सिद्ध झाले की तो वेडा नाही …त्यामुळे यावेळी त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये न ठेवता जेल मध्ये ठेवण्यात आले
13वा झाल्यावर तो सगळ्यांना घेऊन तिथून आपल्या घरी आला …यावेळी उमाकांतला जन्मठेपेची शिक्षा झाली खरतर फाशी व्हायला हवी होती पण भोवतेक त्या रामरावांमुळे वाचला असावा तो …रामराव आजकाल खूप त्रास देत होते आम्हाला …कधी तुला मधेच अडवून मारायचे …कधी आपल्या गाडीच्या काचा फोडायचे …खूपदा निनावी पत्र यायचे हे गाव सोडून जा नाहीतर परिणाम वाईट होतील …विश्वास बिचारा आधीच दोघांच्या जाण्याने खूप खचले होते ..शिवाय उमाकांत आपला भाऊ आहे ..आपण यांचे कोणीच लागत नाही या विचारांनी ते खूप वाईट हालात होते …मी तर रोज समजावत होतेच त्यांना पण काहीच उपयोग होत नव्हता …मी कितीदा सांगितलं त्या रामरावचा पण काटा काट्याने काढा …जर तो आपल्याला इतका त्रास देतो तर त्याच पण कुटुंब असेलच की त्यांना आपण त्रास देऊ …
ते काहीच करत नाहीत म्हटल्यावर मीच भीमाच्या मदतीने रामरावच्या कुटुंबाची माहिती काढली एक मुलगा एक मुलगी …आणि बायको नाही …कुठल्याश्या अपघातात गेली म्हणे ..पण लोक तर बोलतात या रामरावणेच मारलं तिला…सगळे नाद होते त्याला …बाईचा तर खूपच ..हे सगळं त्याच्या बायकोला समजलं तर त्याने तिलाच जगातून गायब केलं अस ऐकण्यात आलं ..शी कसला भयानक माणूस ना हा …आणि त्याचा मुलगा शिक्षणासाठी USA ला होता म्हणे …मुलीचं लग्न झालेले ते पण कोणत्यातरी मोठ्या मंत्र्यांच्या पोराबरोबर …काय कोणाला त्रास देणार राहून गेलं सगळं …
रामरावच खूप मोठं ऑफिस होत ..पण विश्वासरावांच्या हालचाली समजाव्या म्हणून मुद्दाम सेम कॉम्प्लेक्स मध्ये समोरच ऑफिस घेतल त्याने …कोण आलं कोण गेलं सगळं समजायचं त्याला …
बरेचदा दोघे समोरासमोर आले की वाद व्हायचे दोघांचे …विश्वास तसे शांतच असायचे पण रामराव खूप नडायचा उगाचच भांडायचा …म्हणतात ना उथळ पाण्याला खळखळाट फार ..,तसाच होता बघ तो …
विश्वास हळू हळू त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागले…लोकांनी खूप अग्रह केला त्यांना निवडणूक लढवण्याचा …रामरावच्या समोर उभं राहायचा …पण विश्वासला कधी इच्छाच नव्हती …ते नाही राहिले उभे …रामराव निवडून आले आणि त्यांनी जास्तच त्रास द्यायला सुरुवात केली ..ते एकदिवस एकटेच रामरावच्या घरी गेले …तिथे रामराव दारू पीत बसले होते …विश्वास : नमस्कार आमदार साहेब ..कसे आहात आपण …तुम्ही खूप चोरून चोरून वार करता आमच्यावर पण आम्हाला अस मागून त्रास देन जमत नाही …आम्ही दोस्ति आणि दुश्मनी दोन्हीपन समोरासमोर करतो …
रामराव : काय रे तुझी हिम्मत कशी झाली माझ्या घरी यायची ?तुला काय वाटतं मला धमकी देशील आणि इथून जिवंत जाशील ?? शक्य नाही रे ते …तुझ्यासारखा मूर्ख आजून पाहिला नाही बघ मी …स्वतःच आलोय एकटा वाघाच्या गुहेत…आता कसा वाचणार तू?…
विश्वास : हे बघा तुम्ही स्वतःची समजूत घालू नका …आणि हो मी काही दिसत असलो, तरी इतका पण वेडा नाही हो …येताना माझा मित्र इन्स्पेक्टर तुषारला सांगून आलोय ..जर मी 1 तासात परत आलो नाही तर समजून जा मला दगा झालाय आणि पोलिसांची टीम घेऊन ये बंगल्यात …मग तुमचं कस काय होईल ते तुम्हाला सांगायला नकोच …शिवाय हा माझ्या खिशाला जो पेन आहे ना हा फक्त पेन नाहींतर hidden कॅमेरा आहे यात …आणि तो पण लाईव्ह ..आत्ता आपण जे बोललो ना ते सगळं माझ्या लॅपटॉप वर save होतय आणि माझा पी ए ते बघतोय तिथे …आता पुढे काय करायचंय तुमची मर्जी …
पिलेला रामराव एकदम घाबरला …हे बघा अशीच मस्करी करायची सवय आहे माझी ….बोला काय घेणार चहा कॉफी का दूध …किंवा मग व्हिस्की च घ्या …द्या कंपनी आम्हाला …इंपोर्टेड आहे …आवडेल तुम्हाला …
खरतर विश्वासने अशी काहीही काळजी घेतली नव्हती …तो असाच रागात शिरला होता त्याच्या घरी …पण त्याच डोकं खरच अफलातून चालायचं …शेवटी काय उमाकांतचाच भाऊ ना तो …रामरावची यांना हात लावायची हिम्मतच झाली नाही …ते सुखरूप घरी आले …घरी आले तेव्हा रात्रीचे 12 वाजून गेले होते …पूर्ण घामाघूम झाले होते ते …आल्या आल्या
जवळ जवळ 2 बाटल्या पाणी पिले ते ..मी विचारलं काय झालंय ?काही त्रास होतोय का ?डॉक्टरांना बोलवू का ??
विश्वास : अग काहिनाही ग ..तू बस अशी जवळ …संगतो तुला …आज वाघाच्या जबड्यातून निसटून आलोय बघ
मी : ते कसं विश्वासने सगळा झालेला प्रकार सांगितला …मी इतकी घाबरले की त्यांना घट्ट मिठी मारली आणि पुन्हा असे मदारीचे खेळ करू नका ..नेहमीच खोट पचत अस नाही …ठीक आहे चला झोपा आता …आणि आम्ही झोपलो ..पण दुसऱ्या दिवशी काय मांडून ठेवलय आम्हाला दोघांनापण त्याची कल्पना नव्हती …

©पूनम पिंगळे

क्रमशः

Article Categories:
रोमांचक

Comments are closed.