धोका भाग 18

Written by

#धोका
#भाग 18
सकाळी रोजच्याप्रमाणे उठून विश्वासने पूजा केली …नाश्ता झाला ..तू शाळेत गेली …आणि विश्वास ऑफिस ला निघणार इतक्यात कोणीतरी जोरजोरात घराची बेल वाजवू लागलं …आम्ही दोघेपण घाबरलो ..भीमा पण घरी नव्हता ..तो तुला आणि संजुला शाळेत घेऊन गेला होता …तो तिथेच थांबायचा आजकाल ..तुमची शाळा सुटल्यावर तुम्हाला घेऊनच घरी यायचा ..भीती होतीच ना उमकांत आणि रामरावची…
आम्ही दोघेजण विचारत होतो कोण आहे ..शेवटी विश्वास सावधपणे गेले दरवाजा जवळ आणि आयहोल मधून बघितलं तर समोरचा चेहराच दिसत नव्हता ..आता काय करावं …विश्वासने तुषारला फोन केला आणि मदत मागितली पण तो तर तिकडे गावी ..तो बोलला काळजी नको तिथल्या माझ्या मित्राला पाठवतो मी …आणि गुड न्युज अशी आहे की पर्वा पासून मी पण तिकडेच असेल माझी पोस्टिंग झालीये तुमच्याकडेच …
आम्ही दोघे खूप प्रयत्न करत होतो त्या दोन व्यक्तींचा चेहरा बघायचा पण दिसतच नव्हता …इतक्यात बाहेर पोलीस गाडीचा सायरन वाजला आणि आमचा जीव भांड्यात पडला …तुषारने खरच त्याची जबाबदारी चोख बजावली होती …ते दोघे आवाज ऐकताच ताबडतोब पळून गेले ..मी विश्वासना ऑफिसला नाही जाऊ दिल त्या दिवशी …तुषार त्याच दिवशी रात्री आला ….आपल्याकडेच राहा असा आग्रह केला आम्ही दोघांनी त्याला …असपन त्याच आजून लग्न झालं नव्हतं… मग काय तिकडे एकट राहण्यापेक्षा आपल्या घरीच रहावं हे पटलं त्याला …
ती रात्र आम्हाला झोपच आली नाही …हे काम एकतर रामराव किंवा उमाकांत च होत हे मात्र नक्की
सकाळी विश्वास ऑफिसला गेले मी घरी एकटीच होते आणि अक्काबाई होत्या आपल्या कामवाल्या …मला तर खूप भीती वाटत होती ..तसं तुषारने एक शिपाई तैनात केला होता बंगल्याबाहेर पण तरी धडधड होत होती …तुषारने फोन करून सांगितलं …उमाकांत पळून गेला आहे जेल मधून सावध रहा वहिनी …आणि विश्वासला पण त्यानेच कॉल केला …आता तर काय विचारूच नको मला सगळ्यांचीच काळजी लागली होती …हा उमाकांत काय करेल याचा काहीच भरवसा नव्हता …
दुपारी मला जरा झोप लागली इतक्यात बेल वाजली ..तर तुम्ही तिघे घरी आलात …आता भीमा पण होता घरी …भीमा म्हणजे मला नेहमीच खूप मोठा आधार असल्यासारखं वाटायचं …जणूकाही माझा मोठा भाऊच …मग मी पुन्हा जाऊन झोपले …तुझा जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला मला आणि मी दचकून जागी झाले …बघते तर काय तू आणि संजू काहीतरी खेळत होते आणि तुम्ही ओरडत होतात …
खूप राग आला मला तुझा …अशीपन आता तू 16 वर्षाची झाली होतीस अगदी तुझी आईच दिसायचीस तू …मी धपाधाप दोन धपाटे घातले तुला आणि जा जाऊन अभ्यास कर किंवा झोप अस सांगितलं …तू रडतच तुझ्या रुम मध्ये गेलिस मला वाईट पण वाटलं… पण काय करू खूप जास्त टेन्शन होत ग मला …,
संध्याकाळी विश्वास जरा लवकरच घरी आले …बर वाटलं बघून त्यांना तुषार पण 9 पर्यंत आला ..आम्ही सगळ्यांनी मस्त हसत , मज्जा करत जेवण केलं ..जणूकाही काही झालाच नाही …
थोडक्यात काय तर आजचा दिवस शांतपणे गेला …अस वाटलं आणि मी झोपले ..झोप लागायलाच लागली होती तर मला दरवाजाचा आवाज आला ..मी हळूच विश्वास ला हलवलं ..इतक्यात दरवाजा उघडून तो समोर ..हातात एक सुरा…डोळे लाल लाल झालेले …आणि त्याच्या मागेपण कोणीतरी होत ..कोण होत … म्हणून वाकून पाहिलं जरा तर रामराव …मी जोरात ओरडले वाचवा वाचवा …उमाकांत …
तुषार माझा आवाज ऐकून त्याच पिस्तुल घेऊनच आला ..त्याने परिस्थिती पहिली …आणि ओरडला हँडसअप कोणीपण हालु नका उगाच मला गोळी मारावी लागेल …त्याला त्या दोघांचे चेहरे काही दिसले नव्हते ..फक्त दोघे उभे आहेत इतकंच ..आणि त्याच्या लक्षात आलं मागच्या व्यक्तीच्या हातात तर बंदूक आहे आणि तो ती काधिपन चालवेल…आणि तसच झालं त्याने त्याचा हात उचलाच विश्वासला गोळी मारण्यासाठी…. इतक्यात खूप चपळाईने तुषारने त्या इसमावर गोळी चालवली …खूप अंधार असल्यामुळे त्याला नीट दिसलं नाही गोळी पायावर न लागता डायरेक्ट पाठीमध्ये लागली …आणि रामराव तसेच खाली कोसळले …उमाकांत आजूनपन तसाच बेदारपणे उभा होता …अय चल तो गेला त्याच्या कर्मानी जाऊदेत …तू या पेपर्स वर सही कर चल …,
विश्वास : का अस करतोयस तू ..नको रे माझ्या भावा अस करुस ..अरे मी मोठा भाऊ आहे तुझा ..तुला काय हवं ते सगळं देतो पण आधी तो चाकू फेकून दे बर ..सगळी इस्टेट घेरे तुला ..कोणाला त्रास देऊ नकोस ..आणि विश्वास हळू हळू त्यांच्या जवळ जाऊ लागले त्याने त्यांच्या हातावर वार केला आणि त्या झटक्यात घाबरून तुषारकडून गोळी फायर झाली ती उमाकांतच्या डोक्याला घासून गेली…तो खाली पडला,तुषारने अँबुलन्स बोलावली त्यात ते दोन्ही देह नेण्यात आले …रामराव केव्हाच वर गेले होते ..पण उमाकांत जिवंत होता …,पण तो कोम्यात गेला होता आणि तो शुद्धी वर येन अवघडच होत …त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या जीवात जीव आला …

©पूनम पिंगळे

क्रमशः

Article Categories:
रोमांचक

Comments are closed.