धोका भाग 19

Written by

#धोका
#भाग 19
सगळं ऐकून नुतनला एक प्रश्न पडला रामराव गेले ..उमाकांत असून नसल्यासारखा मग त्यादिवशी पप्पा कोण आलं म्हणून गेले असावे ? तिने हा प्रश्न मेघनाला विचारलाच..
मेघना : अग हाच प्रश्न मलापण पडला होता …विश्वास इथून गेल्यानंतर 2 दिवसांनी मला त्यांचा कॉल आला की ….उमाकांत शुद्धीवर आलाय..
नूतन : व्हॉट???क क काय ??? त्याला आजून ठेवलं होतं हॉस्पिटल वाल्यानी इतके वर्ष ?how is it possible?? मी आता 23 वर्षाची आहे जेव्हा हे सगळं घडलं मी 16 वर्षाची होते correct? अग सात वर्ष??कस हॉस्पिटलमध्ये ठेवलं त्याला आणि कोणी ?कोणी केला खर्च त्याचा ?
मेघना : विश्वास नी
नूतन : काय बोलतीयेस तू आई ?कस possible आहे ?पप्पा का त्याला वाचवतील?
मेघना : अग उगाच नाही ग प्रेम केलं होतं मी विश्वासवर ..खूपच वेगळ्या काळजाचा माणूस बघ हा…काय तर म्हणे तो माझा जुळा भाऊ आहे ..मी असं कसं मरून देऊ त्याला ? त्यामुळे त्यांनी त्याला वाचवलं
तोच कॉल आला होता यांना …आणि शुध्दीवर आल्यानंतर फक्त एक तास तो हॉस्पिटलमध्ये होता ..नंतर त्याने तिथल्या एका नर्सला विचारलं मी कुठे आहे ?काय झालं होतं? तिने सर्व सांगीतल त्याला ..तर तो जोरात ओरडला त्या विश्वासला जिवंत सोडणार नाही …आणि हातातले सलाईन काढून टाकले ..बाजूच सामान तोडफोड केली ..त्याच नर्स कडून पैसे घेतले …तिचाच मोबाइल घेतला आणि तिथून पळून गेला…ती नर्स खूप घाबरली होती…तिने जाऊन डॉक्टरांना सर्व किस्सा सांगितला ..डॉक्टरांनी विश्वास ला फोन करून सांगितलं …आणि त्यामुळेच तर ते घाबरून गेले …त्यांना वाटल होत शुद्धीवर आल्यावर तो सगळं विसरून जाईल ..असपन सगळे छान सुखाने राहू ..पण छे ग सगळीच स्वप्न थोडीच पूर्ण होतात …तो तर इतक्या दिवसानंतर शुद्धीवर आला तरी त्याला विश्वासच आठवत होता …
हे ताबडतोब गेले गावाकडे ….जिथे त्याला ठेवलं होतं ….त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन नीट माहिती घेतली मग त्यांनी तुषारला फोन केला की हा पळून गेलाय त्याला शोधावं लागेल आपल्याला..अरे नूतनच्या , माझ्या मुलांच्या सगळ्यांच्याच जीवाला धोका आहे रे …खरच कस ना माझं नशीब माझा जुळा भाऊ ज्याने माझ्या सोबत मातेची कूस share केली होती …तोच माझ्या सुखांवर जळतोय …माझ्या आणि माझ्या कुटूंबाच्या मागे लागलाय …
ही सर्व घटना त्यांनी मला फोन करून सांगीतली होती …पण नंतर त्यांना कोणी मारलं काय झालं काहीच समजलं नाही …पण हे नक्की की आता आपल्या सगळ्यांच्याच जीवाला धोका आहे …नक्कीच उमाकांत ला कोणाची तरी साथ आहे ग…
मेघना : नूतन मला तुला काही सांगायचं …पण तू त्याचा चुकीचा अर्थ नाही काढायचास ..
नूतन : इतक्या धक्कादायक घटना सांगितल्यास तू मला आता आजून काय ग राहील ?सांगून टाक ते पण
मेघना : हा जो अविनाश आहे ना ..तो रामरावांचा मुलगा आहे ..जेव्हा तो बोलला तो तुझा होणारा नवरा आहे ..मला तर खूप धक्का बसला ग …खरतर हे मला माहित नव्हतं पण काल विश्वासचे P.A आहेत ना ते असीम त्यांनी सांगितलं मला …आणि आपल्यावर पाळत ठेवायला घेतलेलं ऑफिस आता तो संभाळतोय..इतकं मोठं ऑफिस सोडून जर तो त्या ऑफिसला येतो याचा अर्थ काय ग?मला वाटत आहे त्याचीच साथ आहे या उमाकांतला..
नूतन : तिला दोन क्षण काही सुचलच नाही की आता काय उत्तर द्याव ?काय बोलावे ..ती विचार करत होती स्वतःशीच बोलत होती ..म्हणजे अविनाश ?? अविनाशनेच पप्पांना मारलंय का ?? तो माझ्यापण जीवावर उठलाय काय ??तिला तो हॉटेल मधला त्यांचा प्रणय प्रसंग आठवत होता ..त्याचे नेहमी खूप प्रेमाने तिच्याकडे बघणारे डोळे…तिच्यासाठीची काळजी , प्रेम …म्हणजे …म्हणजे ते सगळं खोट होत ??मी अशी कशी फसले याला ..मग नूतन एकदम जोरात बोलली आग आई ज्या दिवशी आम्ही भेटलो त्याच तर दिवशी पापांचा पण खून झाला …मग यात पण काही कनेक्शन असेल काय ग ?
तीने मेघनाचे दोन्ही हात हातात घेतले ..खूप घट्ट पकडून त्यावर डोकं ठेवलं …आणि ती खूप जोर जोरात रडू लागली…आई मी चुकले ग …माझी पारख चुकली …घात झाला आपला ..धोका केला ग माझ्या कर्माने माझ्यासोबत …व्यवसायात मी बरोबर पारख करते ..कोणासोबत डील करायची कोणाशी नाही …पप्पांना खूप अभिमान वाटायचा माझा यामुळे …पण आज माझ्या आयुश्यातला महत्वाचा निर्णय मी चुकले ग …माझ्यामुळेच पप्पाचा पण जीव गेला ग …
इतक्यात मागे जोरजोरात टाळ्यांचा आवाज आला …नूतनने मागे दचकून पाहिले तर भीमा टाळ्या वाजवत होता …आणि तिने मेघनाकडे पाहिलं तर ती पण खूप विचित्र हसत होती …इतक्यात तिथे संजू आला तो पण हसू लागला …नूतन पुरती गोंधळली होती इतक्या टेन्शन मध्ये हे सगळे असे का हसतायेत?
नूतन : वेड लागलय काय तुम्हाला सगळ्यांना ?असे का मूर्खा सारखे हसता ? टाळ्या वाजवताय ? मी नक्कीच काही विनोद केला नाहीये …
इतक्यात संजू बोलला : अग ता___इ आता ते तुला जमणार पण नाही …कारण …कारण खरा जोक तुझा झालाय …आणि तो आजून जास्त जोरात हसू लागला
नूतन : काय चाललय हे सगळं मला कोणी नीट सांगेल का ?
मेघना : हो सांगते की ..सगळं अगदी नीट आणि सविस्तर …
नूतन : अग आई तू इतकावेळ मला इतकं काही सांगितलंस …बाबा गेलेत ..इतकं काही झालय ..तू ,संजू आणि भीमा कसे हसू शकतात ?आग काय प्रकार आहे हा ?
संजू : आग ताई सगळं नेहमी तुलाच कस ग मिळेल ? हा ?ऑफिस तुझं..पप्पा तुझे..हुशार तू..लाडकी तूच …आणि आम्ही कोण ग ? पप्पा नेहमी कोणाशी बोलणार? तुझ्याशी ..प्रथम काळजी कोणाची? तुझी …म्हणजे आम्ही कोणीच नाही काय ग ?अग लहान नाही मी आता …सगळं समजत मला …तू पप्पांची मुलगी नसून पण त्यांच्यासाठी तू त्यांची सर्वेसर्वा होतीस…आम्ही आजारी पडलो तर ते कधीच घरी धावत यायचे नाही ..पण तुला काही जरी झालं की लगेच धावत पळत घरी यायचे …कधी फोन जरी केला घरी… आम्ही कोणीही उचलला तर बोलावं ना आमच्याशी …पण नाही त्यांना आधी नूतन हवी असायची फोन वर
नूतन :अरे बाळा काय झालंय तुला आज ? तू का अस बोलतोय ..माझा जीव आहेस रे तू आणि पप्पांच पण सगळ्यांवरच खूप प्रेम होतं रे …मी तुमच्यात मोठी होते म्हणून जबाबदारी टाकायचे माझ्यावर इतकच …संजू कुठून आलं रे इतकं विष तुझ्या डोक्यात माझ्या बद्द्लच ? बोलना कुठून आलं ?मी तर खूप जीव लावलारे बाळा तुला …आज तुझं अस बोलणं सहन होत नाहीये रे मला ..आपल्याला पप्पांच्या खुन्याचा शोध लावायचाय बर झालं तू आता इतका मोठा झाला आहेस…आपण मिळुन शोधून काढुया त्याला …
संजू : अग अस कधी होत का ?चोरच चोराला पकडेल ??
नूतन : म्हणजे?मला नाही समजलं ?
संजू : बोला भीमा बाबा तुम्हीच बोला
नूतन : हे काय भीमा बाबा??हे काय नवीन …भीमा आहे तो आपल्या इथला नोकर
संजू : हो तुला काय ग… जमल तर सगळ्यांनाच नोकर बनवशील तू ..पण माझे वडील आहेत ते
नूतन : काय??अरे अस काहीही वेड्यासारखा बोलू नकोस ..आई काय बोलतोय हा ?
मेघना : हो बरोबर बोलतोय तो ..तुझा बाप कितीजरी चांगला माणूस होता तरीपण तसा तो मला पूर्ण सुख देण्यात समर्थ नव्हता ..त्यांना वाटायचं ते मला सगळं सुख देतायेत …मला त्यांना हे दाखवून नव्हतं द्यायचं की ते मला पूर्ण सुख देत नाहीये …मग मी खूप समाधानी आहे असच दाखवत होते …पण मी खूप बैचेन व्हायचे ..अस वाटायचं का मी याच्याशी लग्न केलं?स्वतःचं पायावर धोंडा पाडून घेतला एक फायदा होता फक्त। तो म्हणजे खूप धनाढ्य आहे हा ..बघू यावर पण उपाय मिळेलच असा मी विचार केला …खूप मन मारत जगत होते मी ..अशातच आनंदराव भीमाला घेऊन आले आपल्या घरी ..त्याच पिळदार शरीर पाहून मी वेडीच झाले …तो पण माझ्याकडे एकटक बघत होता …त्याच्या डोळ्यात मला माझ्या बद्दल तेच दिसलं जे मला अपेक्षित होत …मी खूप खुश झाले होते त्याला पाहून….

©पूनम पिंगळे

क्रमशः

Article Categories:
रोमांचक

Comments are closed.