धोका भाग 2

Written by

#धोका
# भाग 2
नूतन गाडीतून उतरली आणि आतमध्ये निघाली इतक्यात साहेब समोर जाऊन उभे राहिले ना तिच्या.
ति : कोण आपण ??काही काम होत का माझ्याकडे?मी ओळखते का तुम्हाला?
तो: हो थोड़ काम होत महत्वाच्…
(त्याला बघुन खुप हसु आल नुतनला तो इतका घाबरुण बोलत होता की जसकाय् त्याच्या समोर वाघच उभा होता…)
ति: कसल महत्वाच् काम? तुम्ही आमचे न्यू क्लाइंट आहात काय? मला तर काहीच माहित नाही तुमच्या प्रोजेक्ट बद्दल ..अस करा तुम्ही माझ्या पप्पां सोबत बोला तेच तुम्हाला हेल्प करू शकतील …if you don’t mind can I go to my office now? Bye…आणि निघाली की ही…तो तर बघतच बसला तिला नेहमीप्रमाणे….
पण आज तो आजुनच जास्त प्रेमात पडला तिच्या…का??? अहो आज तो बोलला न तिच्याशी…तिचा तो मंजुळ आवाज..बोलण्यातला कॉन्फिडेन्स.साहेब पुरता कामतुनच गेला की …पहिलाच घायाळ आजुनच घायाळ झाला बिचारा…
ती ऑफिस मध्ये गेली आणि कामाला लागली..हे साहेब तिथेच् उभे होते अजुन…नुतनच्या डेस्क वरचा फ़ोन वाजला..तिने तो काम करता करताच उचलला..हॅलो नूतन हियर..पण नो answer तिने फ़ोन ठेऊन दिला .अस 2-3वेळ झाल..मग तिचे patience संपले तिने बडबड करत रिसीवरच काढून ठेवला…आणि पुन्हा आपल्या कामाला लागली..तिला काम करता करता मधेच अविनाश चा तो घबरलेला चेहरा आठवत होता. पण त्याचे डोळे तिला वेगळच् काही सांगत होते..ती एकटिच हसत होती..त्याच वेळी तिचे वडील तिथे आले.तिला अस हसताना पाहून ते चकित झाले..
नुतनचे वडील म्हणजे गावातल मोठ प्रस्थ..खुप पैसा पण त्याचा माज जरापण नाही..गावात त्यांचे कारखाने,दुकान, अनाथ आश्रम, सामाजिक संस्था अस बरच काही होत..नूतनला इतक्या मनापासून हसताना पाहून त्याना खुप बर वाटल..ते किती सांगायाचे तिला अग मैत्रिणींसोबत फिरायला जा मजा कर अत्ता तुझ वय मजा करायच् आहे..नंतर जबाबदाऱ्या आहेतच की..
पण तिची आजी गेल्यापासून ती खुप बदलली होती..तीच हसण खिदळण् विसरून गेली होती ती…आई ने पण आजी गेल्यापासून तिचे सावत्रपणाचे गुण दाखवायला सुरुवात केली होती..
नुतनला तिची आई अभ्यास पण नीट करू देत नसे..कुठल्या न कुठल्या प्रकारे तिने तिला त्रास द्यायला सुरुवात केली होती..तीच जवळच अस कोणीच नव्हतं..या सगळ्या प्रकारामुळे ती एकदम एकटी पडली होती…कोणाशिच् जास्त बोलत नसे…सतत आपल्याच विश्वात…असच तिने आपल् कॉलेज पूर्ण केल तेहि फर्स्ट क्लास मध्ये …घरात तीच आणि आईच् अजिबात जमतच नव्हतं त्यामुळे नुतनने विश्वासरावाचं ऑफिस जॉइन केल…तिच्यामुळे त्यांच्या व्यवसायात खुप जास्त भरभराट झाली..विश्वासराव खुप खुश होते तिच्या कामावर ..पण त्याचसोबत इतक्या लहान वयात तीच इतक पोक्तपणे वागण त्यांना खटकत होत…त्यांना पण वाटायच् नुतनने मस्त हसाव,फिराव, मजा करावी…
बर असो… ती गलातल्या गालात अशी हसत असतानाच विश्वासराव तिच्या जवळ गेले ..आणि असच खोट खोकले…ती एकदम दचकलि आणि बोलली…
नूतन:अरे पप्पा तुम्ही कधी आलात? आणि आज काय खोकला येतोय का ?मेडिसिन घेतल का?
पप्पा: अग हो हो …एकाच दमात् किती प्रश्न विचारशील..मी एकदम ठंणठणित बरा आहे पण आज आमच्या राजकुमारीला काय झालय?? एकट्याच् हसताय??हम्म काही स्पेशल घटना घडली वाटत आज??एकदम मिश्किलपने बोलत होते ते…
नूतन: (स्वतःला सावरत) काही नाही कुठे काय झाल तेव्हा ?? छे हो पप्पा..पण तुम्हाला अस का वाटल बर?
पप्पा : अग पोरी आज खुप वर्षानी तुला अस मनापासून हसताना पहिलग मन एकदम भरून आल बघ तुला अस खुश बघुन…आज तू ज्याकुणामुळे हसलीस ना त्याचे पाय धुवून पाणी पिईंन बघ् मी..(आणि त्यांच्या डोळ्यात अलगद अश्रु तरळलेच्)
वडिलांचे अश्रु पाहून नूतन पण खुप भाउक झाली आणि तिने त्याना प्रेमाने मीठी मारली…आणि बोलली पप्पा आई गेली तेव्हा आजी माझी आई झाली..आजी गेली आणि मला एकदम पोरक झाल्यासारख वाटायला लागल होत…माझ कशातच लक्ष लागत नव्हतं…पण आज तुम्ही माझ्या आईची जागा घेतलीत…सॉरी पप्पा मला कधी तुमच प्रेम समजलच नाही हो..पण आता मी रोज हसतना दिसणार तुम्हाला…आणि तुम्हालापण हसायला लावणार…नंतर थोड़ावेळ कोणीच काही बोलल नाही…इतक्यात एक स्टाफ आला आणि काही कामासाठी विश्वासरावांना घेऊन गेला….

©पूनम पिंगळे

क्रमशः

Article Categories:
रोमांचक

प्रतिक्रिया व्यक्त करा