धोका भाग 20

Written by

#धोका
#भाग 20
भीमा आपल्या घरीच राहू लागला…,घरातली काम करू लागला …तो खूपच हुशार होता त्यामुळे सगळी काम पटपट शिकला ..त्याने घरात सर्वांचा विश्वास जिंकला ..नंतर अस झालं की त्याच्याशिवाय कोणाचं पान पण हलत नसे …आधी तर आमची दोघांची पण हिम्मत झाली नाही जवळ येण्याची …पण एक दिवस घरी कोणीच नव्हतं आणि भीमा माझ्या खोलीत आला …
भीमा : नमस्ते
मेघना : एकदम दचकून ..अरे तू होय ..काय भीमा काही काम होत का ?
भीमा : काय काम आहे ते तुम्हास्नी बी ठाव हाय
मेघना : वेड्याच सोंग घेऊन – म्हणजे मला नाही माहीत
भीमा : मी जवा पहिल्या दिशी आलो तव्हांच तुमच्या डोळ्यांनी मला समद सांगितलं व्हत आता कशापायी लाजताय ?
तो एकदम डोळे रोखून पाहत होता ..अस वाटत होतं कोणत्याही क्षणी झपटेल माझ्यावर …तशी मी खूशच होते …कस असत लेडीजने पुढाकार घेण बरोबर नाही दिसत ना
मेघना : भीमा काय बडबडतोय…समजतंय का तुझं तुला तरी …जा माझ्या खोलीतून बाहेर चालता हो
भीमा : हे बघा घरी कुणिबी न्हाई ..आणि आजून 3-4,तास तरी येत न्हाई …का उगाच वेळ दवडताय ?या की जवळ ..याच मोक्याची वाट बघित होतो आल्यापासन …आज 3 महिन झालं बघा येऊन ..आज जर न्हाई बोललात तर परत कधी बी जवळ येणार न्हाई मी …तसा लई मानाचा हाय …एकदा हो तर हो ..आणि न्हाय तर न्हाय …बघा आता काय ते तुमीच ठरवा…
मी खूप चक्रावले होते ..एक तर ते विश्वासचा फिलिंगस नसणारा स्पर्श..त्यात कधीच सुख नाही मिळालेलं …आणि आज हा इतका दमदार पुरुष मला जवळ ये बोलत आहे ..नाही कस बोलावं ?एक मूलपण होऊ शकलं नव्हतं आम्हाला आजून 7 महिने होऊन गेले होते लग्नाला…मला नाही राहवलं ..मी पळतच जाऊन त्याला घट्ट मिठी मारली …त्या दिवसपासून जेव्हा मोका मिळे आम्ही सोडत नव्हतो . थोड्याच दिवसात मी गरोदर आहे हे समजलं..घरी सगळे खुश झाले…विश्वासपण खूप खुश होता …,आणि संजू छोट्याशा पावलांनी आपल्या घरी आला …मला आणि भीमाला एकमेकांशिवाय करमत नव्हतं मग मी विश्वासना उकसावल की आपण दुसरा business करू दुसरीकडे जाऊ ..पण घरच्यांनी नाही म्हटलं आणि आमचा प्लॅन फसला ..खुप चिडचिड होत होती आम्हा दोघांची ..बघता बघता संजू 4 वर्षांचा झाला मी मध्ये मधे विश्वसला बोलतच होते तुम्ही इतके शिकलात काय या गावात राहण्यासाठी ?काय उपयोग तरी आहे का या शिक्षणाचा ?तुम्ही खूप हुशार आहात ..कोणताही बिसनेस तुम्ही तुमच्या हिंमतीवर सुरू कराल ..मला तर खूप विश्वास आहे तुमच्या कर्तबगारीवर ..तसा तर तो हुशार होताच याच तर हुषारीवर भाळले होते ना मी…खरतर माझं खुप प्रेम होतं विश्वास वर ..फक्त या एका सुखासाठी भीमाला जवळ केलं होतं मी ..
शेवटी तो दिवस आला आणि एकदिवस रागाच्या भरात मी,तू , विश्वास ,संजू आणि भीमा निघालो..,आता दिवसभर मी आणि भीमा घरीच असायचो …विश्वासने खूप कष्टाने पूर्ण व्यवसायाची घडी बसवली …खरतर मी तयार नव्हते तुला आणायला …पण तू आली तरच रुपमती आणि अनंतराव भीमाला सोडतील हे माहीत होतं ..म्हणून घेऊन आले तुला … मला आता मुलगीच हवी होती ..बरेच वेळा मला दिवस राहिले आणि मी भीमासोबत जाऊन चेक करायचे मुलगा असेल तर गर्भ पडायचे.. असेच बरेच वर्ष चालले होते सगळं …भीमा खूप चिडत होता आग तू वेडी हाय का ?कशापायी जीव घेतीस ग या बारक्या जीवाचा ? आणि मला पुन्हा दिवस राहिले यावेळी मुलगी होती मी खूप खुश होते खरतर यावेळी मुलगा असता तरी डॉक्टरांनीच माझं अबोरशन केलं नसत ..सतत गर्भ पडल्याने पिशवी खूप खराब झाली होती माझी …हे बाळ पण होऊ देऊ नका असच बोलत होते ते ..पण मला मुलगी हवीच होती …नाहीतर विश्वासने सगळं तुझ्याच नारड्यात घातलं असत …खूप जास्त जीवावर खेळून मी राजुल ला जन्म दिला …तरीपण विश्वासला तूच दिसायचीस …मी हळू हळू संजुला भडकवू लागले ..बघ त्यांना नुसती नूतनच लागते..तुम्ही पण मूलना त्यांची …संजू पण आता तुझ्या विरोधात जात होता पण तुला दाखवून न देता..शेवटी तो मुलगा माझाच होता ना ..एक दिवस भीमा आला आणि मला बोलला मी गावाकडे जातोय मला 5-6 महिन्यांची सुट्टी हवीय…मी खूप चिडले त्याच्यावर ..
मेघना :का हवी आहे इतकी मोठी सुट्टी तुला ?जाऊन नेहमी सारखा एक दोन आठवड्यात ये
भीमा : नाही यावेळी न्हाय जमायचं लगीच यायला
मेघना ; का ?
भीमा : लागिन हाय माझं ..घरच्यांनी पोरगी बघितलीये …
मेघना : काय ? तुला मला असं सांगताना काही वाटत नाही का?
भीमा : आवो तुम्ही लई मोठ्या हायेत माझ्यापेक्षा ..वयान ..मानानं..तुमचं माझं कास हुनार …आयुषभर तर आपण सोबत न्हाई ना राहू शकत
मेघना : आता तुला माझं वय दिसतंय ? आणि का नाही राहू शकत ?
भीमा : माझा वंश चालवाया माझं पोर नको का ?
मेघना : अरे संजू आणि राजुल आहेत की ..
भीमा : पर त्यांना संमदे तुमचं आन साहेबांचं पोर बोलत्यात ..म्या तर तिथं कुठबी न्हाई इतके वरीस हायच की मी तुमच्या संग …माझं नाव सावताच्या नावाम्होर लावणार माझं पोर ..माझी बायकू पायजे ना वो मला ..
मेघना : अरे तू असा विचार का करतोयस आज? मी पण तुझीच आहे रे ..ठीक आहे थांब तुला विश्वास नाही ना माझ्यावर ?संजू ए संजू इकडे ये बाळ …हे बघ तुला मला काही महत्वाचं आणि सिक्रेट सांगायचं आहे ..पण मला प्रॉमिस कर तू कोणाला सांगणार नाहीस …तुला विश्वास पप्पा नाहीच आवडत खरंय ना ?
संजू : हो पण त्याच काय झालं ?आणि कसलं सीक्रेट?बोल काय ते
मेघना : तुझा खरा बाप भीमा आहे..तुझा बाबा आहे हा
संजू : काय ?काहीही नको बोलुस आई
मेघना : अरे खरच ..तुझा बाप तुमच्यासमोर माझ्याशी छान वागतो…पण एकांतात खूप त्रास देतो ..मारतो …आणि मला खूप वेळा यातून भीमाने वाचवलं …त्यामुळे मी त्याचा प्रेमात पडले आणि तुझा जन्म झाला.आणि आता ते परत खूप त्रास देतायेत मला …मी त्यांना या जगातून कायमचंच वर पाठवणार आहे ..त्यात मला तुझी सोबत हवी आहे ..देशील ना
संजू : थोडा घाबरला …गोंधळला आणि हो बोलला
मेघना : बर जा बाळा संजू झोप तू आता …भीमा ..तुला आजूनपन गावाला जायचं आहे का लग्न करण्यासाठी .???
भीमा : माझ्या जवळ आला आणि अत्यंत आवेगाने मिठी मारली मला …नाही ग कधीच न्हाई जाणार आता …पर हे समद करायचं कस?
मेघना : अरे वाह आज पहिल्यांदाच तुम्ही च तू ?छान वाटलं …हे बघ तसापन तो उमाकांत त्यांच्या मागे लागलाय ..सध्या कोम्यात आहे …पण तो कधीपण शुद्धीत येऊ शकतो ..तू गावाला जातोय सांगून त्या हॉस्पिटलमध्ये जा ..तिथे काही आपली माणस तयार कर..तो कोम्यातून बाहेर यायचे किती चान्स आहेत ते बघ …आणि तो शुद्धीवर आला की प्रथम आपल्यालाच बातमी मिळायला हवी याची व्यवस्था कर
भीमा : आग काय चालू हाय ग डोसक्यात तुझ्या ?तो शुद्धीवर येण्याचा आणि साहेबांच्या मरणाचा काय संबंध?
मेघना : हे बघ एक तर तो मारेल यांना …आणि जर त्याच मन बदललं तर आपण मारू आणि त्याच नाव पुढं करू ..काय बोलतोस
भीमा :बापरे लाईच भारी डोकं चलतया तुमचं …हा पर हे समद व्हायला लई येळ लागलं ना ?तव्हर म्या असाच का ?
मेघना :असाच का रे ?आहे ना मी इथे तुझ्यासाठी …फक्त नावासाठी थांब जरा
दुसऱ्या दिवशीच भीमा सुट्टी काढून तिकडे गेला ..त्याने काही नर्स ,डॉक्टर्स गाठले आणि त्यांना पैसे देऊन आमच्या बाजूने केलं …डॉक्टरांनी सांगितल की होईल तो बरा …चांगली improvement आहे …
त्यादिवशी त्यांना जो फोन आला तो आमच्या माणसाने केला ..त्या आधी 2 दिवस तो शुध्दीवर आला होता …मी त्याला फोन केला आणि माझा प्लॅन सांगितला…तो तयार झाला …

©पूनम पिंगळे

क्रमशः

Article Categories:
रोमांचक

Comments are closed.