धोका भाग 21

Written by

#धोका
#भाग 21
नूतन :म्हणजे तुम्हीच मारल ना पप्पांना ?का ?आग तुला नव्हतं राहायचं त्यांच्या सोबत तर तू वेगळं व्हायचं होतंस ना ग ..
मेघना : हो म्हणजे सगळी इस्टेट तुला हो ना ?
नूतन : शी ..किती ग वाईट विचार आहेत तुझे आई …आता आई म्हणायची पण लाज वाटायला लागलीये तुला …आग तू जर पप्पांना बोलली असतीस ना तू सुखी नाहीस ..संतुष्ट नाहीस त्यांच्यासोबत तर तुला लगेच डीवोर्स देऊन मोकळं केलं असत पप्पांनी ..आणि तुझ्या या लवर भीमाला पण मार्गाला लावलं असत …इतक्या लोकांचं भलं केलय त्यांनी …तुझ्यावर पण उपकार केले असते …बर आता बाबांना कस मारलस ते पण सांगून टाक..आणि हा उमाकांत कुठे आहे ..माझे बाबा मला हेच सांगत असावे तुझ्यापासून मला धोका आहे …बोल की बाई सांग आता कस मारलस पप्पांना?
मेघना : ए जीभ आवर तुझी … जास्त चरचर करू नकोस ..तुझ्या बापाला मी नाही मारलं ..आजून आमचा प्लॅन रेडी नव्हता …आधी फक्त त्यांना तिकडे पाठवायचं ठरलं त्यासाठी त्यांना कॉल करून सांगितलं की उमाकांत शुद्धीत आलाय आणि तुम्हाला आणि नुतनला जीवाला धोका आहे …
आता ते तिकडे पोहोचले आणि आमची पुढची हालचाल होण्यापूर्वीच ते गायब झाले ..त्या दिवशी रात्री खूप पाऊस पडला ..खरतर त्याच दिवशी आम्ही विश्वासला मारायचा प्लॅन केला होता ..पण आम्ही पावसामुळे जाऊ शकलो नाही …आम्ही काही करायच्या आधीच मेला तो आणि मेघना वेड्यासारखी जोर जोरात हसू लागली …नंतर आम्ही उमाकांतला शोधायचा खूप प्रयत्न केला पण तो नाही सापडला …
नूतन :तुम्ही उमाकांतला सांगितलं होतं ना त्याला मारायला मग त्यानेच मारलं असणार ….
मेघना :नाही आम्ही गेल्यावर मग उमाकांत मारणार होता ..पण सगळा प्लॅन फसला बघ
इकडे सर्व बोलत असतानाच नूतनने कोणाला तरी text केला होता …शिवाय आईच सगळं बोलणं रेकॉर्ड केलं होतं मोबाइल मध्ये ..कोणाला आणि काय मेसेज केला तिने ??
पण ते कोणाच्याच लक्षात आलं नाही …
मेघना बोलत असतानाच जोर जोरात टाळ्या ऐकू आल्या ..तिने मागे पाहिलं तर विश्वास ???नाही नाही उमाकांत??कोण होता हा ?..ती व्यक्ती :वाह वाह खूप छान . मस्त मस्त ..अग खूपच छान प्लॅन होता तुमचा …
मेघना : उमाकांत ?उमाकांतच ना तू ? का आलास ?बोल ?तू काम मस्त केलंस पण …शिवाय कोणाचं नाव पण नाही आलं मध्ये …welldone …
ती व्यक्ती : जोर जोरात हसत …वाह आता नवऱ्याला पण नाही ओळखत का ग तू ?आग तुझा भीमा तुझ्यासोबत होता ते ठीक पण माझा पण कुश माझ्या सोबत होता आणि त्याच्यामुळेच वाचलो मी..
मेघना : म्हणजे तुम्ही ?तुम्ही उमाकांत नाही ??आणि तुम्ही विश्वास आहात? हे बघ उमाकांत असले नसते उद्योग करू नकोस ..काय ते नीट सांग …उगाच मोहाला बळी पडू नकोस …हे बघ तुला तुझा ठरलेला हिस्सा मिळेलच तेव्हा तू त्याची काळजी करू नकोस …उगीच माझा नवरा बनू नको…बस झालं बाई…,झाली एकदाची सुटका ..आता मी भीमा माझी पोर सुखाने राहू इथे…भीमा याला याचा हिस्सा दे बर
भीमा पुढे आला हातात सुरा घेऊन
विश्वास :काय रे लाज नाही वाटली तुला …मालकाशी गद्दारी केलीस तू? माझ्या बायको सोबत ?कुठे फेडशील ही पाप
भीमाच्या हातून सुरा गळून पडला …तो त्याच्या पाय पकडून रडू लागला …माफ करा साहेब …खूप मोठी चूक झाली हो आमची …क्षमा करा…आणि तो बाजूला जाऊन डोक्याला हात लावून बसला …
मेघना :अरे भीमा तुला कसा विश्वास बसला की हा विश्वास आहे ..अरे वेड्या उठ घाबरू नकोस …
भीमा : हे मालकच आहेत ..तुम्ही त्यांची बायको असून बी वळखना ?नीट बघा मालकच हायेत …,तिने जवळ जाऊन पाहिलं तर …खरच तो विश्वासच होता …
मेघना एकदम घाबरली ..कस शक्य आहे हे?नाही तुमची तर बॉडी पण जाळली आम्ही ..अंत्यसंस्कार केले तुंमचे …मग आम्ही चिता कोणाची जाळली?उमाकांतची??पण तो कसा मेला ?विश्वास झाली चूक माझी …,पण आता मला वेड लागेल माझी..खूप मोठी चूक झाली..मला माफ करा…झालं ते विसरून जा या सगळ्यात तुम्ही वाचलात हे महत्त्वाचं …पण मग उमाकांतच मेला बरोबर ना?
इतक्यात मागून आवाज आला तिला …माझ्या सो कॉल वहिनी …मला इतक्या easily मारणं सोपं नाही …
या धक्क्याने मात्र ती हादरली आणि बेशुद्ध पडली

© पूनम पिंगळे

क्रमशः

Article Categories:
रोमांचक

Comments are closed.