धोका भाग 22

Written by

धोका
#भाग 22
संजू चांगलाच घाबरला होता विश्वासला समोर जिवंत पाहून …त्यात मेघना बेशुद्ध झाल्यावर तर खूपच घाबरला …त्याने पळत जाऊन पाणी आणलं आणि तिच्या तोंडावर मारलं .. मेघना शुध्दीवर आली ..तिला हाताला धरून संजूने खुर्चीवर बसवलं …तिला आता शांत बसलेलं पाहून उमाकांत पुढे आला …काय ग बाई आता बरी आहेस ना तू ? नाही म्हणजे पुढ्चा धक्का बसणार आहे तुला तो सहन करता आला पाहिजे ना …ऐक आता
उमाकांत : तू या शहाण्या भीमाला पाठवलस हॉस्पिटलमध्ये माझी परिस्थिती काय आहे ते बघण्यासाठी …तुझी मोठी चूक झाली …तू माझ्या भावाला इतकी वर्ष सोबत राहूनपन नाही ओळ्खलस ग..अग ते हॉस्पिटल त्याच्याच ट्रस्ट च आहे …तू जी नर्स ,डॉक्टर हाताशी धरले ना ते सगळे विश्वासच्या जिवाभावाचे …अग हे सगळे जण आज त्याच्याच जीवावर जगतायेत ..ती जी नर्स आहे ना तिच्या वडिलांना हार्ट अटॅक आला होता ..बिचारीची परिस्थिती खूप खराब होती तीच शिक्षण चालू होतं …विश्वासराव तिला ओळखत पण नव्हते ..पण जेव्हा तिच्या वडिलांना तीने इलाजासाठी आणलं तेव्हा ती विश्वासला भेटली …आणि सर्व परिस्थिती सांगितली …माझ्या या भोळ्या भावाने तिला नर्सिंग साठी फ्री मध्ये ऍडमिशन दिली …तिच्या वडिलांचा पूर्ण ईलाज एक रुपया न घेता केला …आता तूच सांग तुझ्या एक लाख रूपड्यांसाठी ती याला मरू देईल का ग ?माझ्यासारखा दगड जर त्याच्यापुढे नमूं शकतो तर ती काय ग?तिने ते पैसे घेतले आणि जाऊन सिनियर डॉक्टर अबनावे कडे गेली ..तिला समजलं त्याला पण पैसे दिलेत या कामासाठी…त्यांनी पैसे फक्त यासाठी घेतले की जर आपण पैसे घेतले नाही तरी ते दुसऱ्याला पकडतील…आणि त्याने साहेबांचा घात केला तर …आता त्यांना अस वाटेल की आपण करतोय काम …मग ते इतर कोणाला नाही भेटणार …
संध्याकाळी त्यांच्या लक्षात आलं की आपणच नाही आजून खूप जणांना पैसे दिलेत …मग मात्र त्यांना राहवलं नाही आणि त्यांनी विश्वास ला फोन केला..बिचारा विश्वास एकदम तुटला आतून …त्याला सहनच झालं नाही …आपली बायको आपल्याला मारणार आहे …विश्वासने त्यांना सांगितले जेव्हा उमाकांत शुध्दीवर येईल तेव्हा पाहिलं मला कळवा मग बघू आपण काय ते …
थोडक्यात काय तर तुम्ही चुकीच्या जागी शेण खाल्लत…त्यानंतर दोनच दिवसात मी शुद्धीवर आलो …तीच नर्स माझ्याजवळ उभी होती…मला काहीच समजत नव्हतं ना आठवत होत …मी शांत पडून होतो …नर्स ने मला पाहिलं आणि पळत जाऊन डॉक्टरांना बोलावलं …डॉक्टर पण शॉक होते …अस कस होऊ शकत ??पण हा एक चमत्कार होता म्हणायला हरकत नाही ..मी.. मला वाटत 7-8 वर्ष तरी कोम्यात होतो आणि मी अचानक शुद्धीवर आलो जेव्हा माझ्या भावाला दगा फटका होणार होता …हीच तर माझ्या भावाची पुण्याई ग…या देवमाणसाला तू ओळखलं नाहीस…
बर मी शुद्धीवर आलो तेव्हा मला काही आठवत नव्हतं …त्या नर्सने मला सर्व घटना सांगितली …शिवाय विश्वास किती मनलाऊन माझी काळजी घेतो हे पण सांगितल…मला हळू हळू सगळं आठवू लागलं ..पण मला बोलता येत नव्हतं नीट …म्हणून मी शांत होतो..अंगात खूप अशक्तपणा होता ..दोन दिवसात मला बर वाटू लागलं …थोडं त्राण आल…तोपर्यंत मी शुध्दीवर आलोय हे विश्वास ला सांगितलं गेलं होतं…मग तिथेच त्यांचा प्लॅन तयार झाला …मला यातलं काहीही माहिती नव्हत ..आज माझं मन मला खुप शिव्या देऊ लागला …अरे किती मोठा गुन्हा करत होतो मी ..माझ्या भावाला मारायला निघालो होतो आणि तेव्हाच मरणाच्या दारात पोहोचलो होतो …तरीपण त्याने मला वाचवण्यासाठी इतके वर्ष प्रयत्न केले …शिवाय मला जीव पण लावतो इतका …आता मला त्याला भेटून माफी मागायलाच हवी..
मी त्या नर्स जवळ गेलो आणि तिला माझी मनोकामना बोलून दाखवली …ती खूप खुश झाली …तिने विश्वास ला फोन केला .. मी प्रथमच त्याच्याशी नीट बोलणार होतो ..थोडा संकोच करत मी फोन घेतला …
उमाकांत: विश्वास..माफ कर मला …तुला ओळखू नाही शकलो.. प्लीज जे झालं ते सगळं विसरून जा … मला माफ कर रे .. मी तुझ्या जीवावर उठलो होतो आणि तूच माझा जीव वाचवलास…आणि हो मला भेटायच आहे तुला …please नाही बोलू नकोस .. माझ्या भावा please नाही नको बोलुस …तुझ्यावर ती मेघना कट रचतीये अस समजलं मला इथे ..याना मी अस काही करू नाही देणार ..पण साल्याना जन्माची अद्दल घडवूया आपण विश्वास बिचारा ढसाढसा रडला फोन वर …त्याने नर्सला फोन दयायला सांगितला…
विश्वास:आता तुम्ही कळवा उमाकांत शुध्दीवर आलाय …आणि जेव्हा ते त्याच्याशी बोलायचं बोलतील तेव्हा बोलुद्या …बघू काय आहे डोक्यात त्यांच्या …आणि उमाकांत तुझं माझ्यावरच प्रेम त्यांना जरापन समजता कामा नये …ते जे बोलतील त्यासाठी तयार हो …पुढे बघू काय करायचं ते …
विश्वास खूप दुःखी झाला होता ..पण त्याच बरोबर त्याला आनंद होता की मी त्याच्यासोबत होतो…जस विश्वासला अपेक्षित होत तुमचा फोन आलाच …आणि तुम्हाला मदत करायला मी तयार झालो …तुमच्या बोलण्याप्रमाणे आम्ही विश्वासला फोन केला…तेव्हा तो ऑफिस मध्ये होता …तो तडक ऑफिस मधून निघाला …त्याला बीपी चा त्रास चालू झाला …आणि तो लिफ्ट मध्येच चक्कर येऊन पडला ..त्याच लिफ्टमध्ये अविनाश एकटाच होता …त्याने त्याला उचललं स्वतःच्या गाडीतून डॉक्टरांकडे घेऊन गेला …डॉक्टरांनी औषध दिल …पण खूप काळजी घ्या असे सांगितले …विश्वासला घेऊन तो त्याच्या घरी गेला …औषधे दिली …विश्वास उठला की त्याला चक्कर येत होती …अविनाशने त्यांना आराम कारायला सांगितले …विश्वास जवळजवळ 3 तासांनी शुद्धीवर आला …
विश्वास : कोण तुम्ही?मी कुठे आहे?हो तुम्ही लिफ्ट मधे होता ना माझ्यासोबत ?कुठे आणलंय तुम्ही मला ?मी ओळखत नाही तुम्हाला …
अविनाश : अहो काका दमाने जरा …अहो मी अविनाश भालेकर ..माझं ऑफिस तुमच्या समोरच आहे.
विश्वास : म्हणजे रामरावचा ..???
अविनाश : हो मी मुलगा त्यांचा
विश्वास : मी आत्ता कुठे आहे?आणि इथे कसा आलो?
अविनाश : तुम्ही लिफ्टमध्ये चककर येऊन पडले होतात …मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो …तुमचं बीपी खूप हाय आहे …काही टेन्शन आहे का काका ?मी काही करू शकतो का?
विश्वास : अरे तू मला ओळ्खतोस का?
अविनाश : हो काका
विश्वास : अरे तू नक्कीच ओळखत नाही मला ..मी आणि रामराव एजमेकांचे शत्रू होतो …अरे त्या चकमकीतच त्याचा मृत्यू झाला …
अविनाश : हो माहीत आहे काका मला
विश्वास :अरे ..तरी तू माझा जीव वाचवलास ?कस शक्य आहे ?आणि हे तुझं घर आहे का ?आता काय तू इथे मला दगा फटका करणार आहेस का ?कर बाबा कर ..जेव्हा आपलेच सोडत नाहीत ..तुला तर हक्क आहे …तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला माझ्यामुळे …उगाच आपल्याच माणसाच्या हातून मारण्यापेक्षा तुझ्यासारख्या शत्रूकडून मरण परवडल …
अविनाश : अहो काका ..काहीपण काय बोलताय …ते जे झालं त्यात माझ्या वडिलांचीच चूक होती …मी भारतात नव्हतोच ..माझं सगळं शिक्षण बाहेर देशात झालय काका …पण माझी ताई इथेच होती ना ..तिने मला सगळ काही सांगितलं …आणि यात you are not guilty at all…I respect you uncle …रिअली प्लीज misunderstood नका करू …
मी भारतात आल्यावर प्रथम आमच्या मुख्य ऑफिसात गेलो ..तिथे गेल्यावर लक्षात आलं आमचे आबा खूप वाईट धंदे करत होते …मला हे सहन नाही झालं …मग मी ते सगळे उद्योग बंद केले …काही दिवसांनी मला तुमच्या जवळच ऑफिस पण समजलं ..सहज म्हणून मी त्या ऑफिसला आलो …आणि ऑफिसच्या पार्किंगमध्ये तुम्ही आणि नुतनला पाहिलं …काका राग नका मानू …पण तिला प्रथम पाहताच तिच्या प्रेमात पडलो हो मी …लव ऍट फर्स्ट साईट काय असत ते अनुभवलं मी त्या दिवशी …आणि मग फक्त तिला पाहता यावं म्हणून रोज या ऑफिसला येऊन बसतो …मला ती मनापासून आवडते काका …
विश्वास ला तर स्वप्नात असल्यासारखं वाटत होतं ..जे चालल होत ते अगदीच अनपेक्षित होत …इतका स्मार्ट ,उच्च शिक्षित मुलगा ,सगळी दुष्मनी विसरला आहे …नुतनला हा अगदी साजेसा आहे …अगदी लक्ष्मी नारायणाची जोडीच …ते डोळ्यासमोर त्यांना दोघांना एकत्र पाहू लागले मनातल्या मनात…
विश्वास : चला खूप काही वाईट वाईट ऐकत होतो …आज एक छान बातमी मिळाली मला …पोरा सुखी राहा रे …माझ्या पोरीची काळजी घे रे …माझं काही खर नाही बघ …
अविनाश :का ..काका अस वाईट बोलताय ?
विश्वास :काय सांगू तुला बाळा …खूप वाईट असतो बघ हा पैसा …चांगली चांगली घर,नाती मोडतो बघ
मी पण सध्या अशाच परिस्थिती मध्ये आहे
अविनाश :म्हणजे मी नाही समजलो
विश्वास :अरे समजून तरी तू काय करणार ?
अविनाश :जर तुम्हाला मी खरच जावई म्हणून पसंत असेल आणि तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर प्लीज सांगा मला ..आपण यातून मार्ग काढू …
विश्वास ने सर्व घटना त्याला सांगितली…
अविनाश :ओहह nooo …किती भयंकर आहे हे सगळं …काळजी करू नका ..मी आहे तुमच्या सोबत
आणि मग हा सगळा प्लॅन त्याचाच

©पूनम पिंगळे

क्रमशः

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.