धोका भाग 3

Written by

#धोका
# भाग 3
वडिलांच्या मनातील आपल्यासाठीच अव्यक्त प्रेम समजल्यावर नूतन खुप खुश झाली होती .तिला पुन्हा हसावेसे बागडावेसे वाटू लागले…ती खुश रहात असल्यामुळे आजुनच सुन्दर दिसू लागली होती;आणि त्यामुळे इकडे अविनाश खुपच जास्त बैचेन होउ लागला होता.त्याच न जेवणात, न घरात ,न कामात कशातच लक्ष लागेना झाल होत…थोडक्यात काय तर साहेबाना लवेरिया झाला होता….तो फ़क्त एक मोका शोधत होता तिला प्रपोज़ करण्याचा…
विश्वासराव एक महिन्यासाठी दिल्ली ला गेले होते नूतन एकटीच सगळा कारभार संभाळत होती त्यामुळे घरी जायला खुप उशीर होत असे..त्यांच्या ड्राईवरला ती घरी पाठवून देत असे कारण तिला अस कोणाच् पर्सनल आयुष्य हिरावुन घेणे कधीच मान्य नव्हते.
त्या दिवशी तिला असाच खुप उशीर झाला ऑफिस मधून निघायला…पाऊस जोर जोरात पडत होता ..रास्त्यांमधे खुप पाणी भरले होते त्यामुळे घरी जाणे अगदीच अशक्य होते …तरी नशीब तासापूर्वीच तिला भूक लगल्यामुळे तिने जेवण मागवुन जेवली होती ती..तिला तर अस वाटल पण नव्हतं की तासभरात पाऊस अस रौद्र रूप धारण करेल आणि आपण बाहेर पडूच शकणार नाही.. तिने मनातल्या मनात विचार केला बर झाल बाई मी कोणालाच् थांबवल नव्हतं कामासाठी नाहीतर ते पण बिचारे अडकले असते इथेच…आणि रामु काकांना पण मी रोज सारखच बळेच घरी पाठवल..
नूतन विचार करत होती की हा तर बकीच्यांचा विचार झाला पण आता माझ काय? मी काय करू? आपल्या मतोश्रीना तर काहीच फरक पडणार नाही आपण घरी गेलो तरी आणि नाही तरी पण संजू आणि राजुल बैचेन होणार ..घाबरूण जातील बिचारे चला त्यांना तरी कॉल करुण सांगते मी ऑफिस मधे अडकले आहे ते…नाही अडकले नको …मग हं मी कामात आहे आज ..सकाळपर्यंत येईल अस… सांगते..नाहीतर परत यायचे इथे इतक्या पावसात….मनाशीच् ठरवून तिने तसेच सांगितले …
संजू: अग ताई कशाला थांबते ??नको तू घरी येऊन बस करत काम तुझी…काहीपण काय आजपर्यंत पप्पा पण कधी रात्रभर असे थांबले नाहीत ऑफिस मधे…नको ग ताई प्लीज़ ये तू घरी…मी येऊ का तुला घ्यायला??खुप पाऊस आहेन कदाचित तू ड्राइव नाही करू शकणार..मी आलोच आपण घरी येऊ मग…
नूतन : अरे बाळा नको येउस तू..ऐक माझ…जर काम लवकर झाल तर येईन मी घरी …
दोघांच् बोलण राजुल ने ऐकल तिने संजूच्या हतातील फ़ोन जवळ जवळ ओढूनच घेतला
राजुल :काय झाल ग ताई तु ये घरी आता खुप उशीर झालाय न…मग ??अग तुला जेवायचेय आजून…तू ये मगच मी जेवणार…नाहीतर मी पण उपाशीच झोपणार…
नूतनचे डोळे पाण्याने डबडबले होते …त्यातच ती बोलली अग माझी छोटी परी..मी जेवले ग …आणि तू जरका उपाशी राहीलीस ना ते पण मझ्यामुळे तर आईना माझ घर उन्हात बांधेल …बांधुदेका ??बोल…
राजुल ला आता मात्र राडुच् आल …नको नको मी जेवते…तू कर तुझ काम ताई …..पण नक्की जेव हा …माझी शप्पथ आहे बघ तुला…
नूतन : हो ग चिमाणे …चल मी आता फ़ोन ठेवते हं खुप काम करायचय न मला…
नूतनचे हे दोन डोळेच होते …आणि ही त्याचं ह्रदय होती…एक डोळ्याला जरी त्रास झाला तर आपण कसे बैचेन होतो तशी नूतन होत असे या दोघांसाठी….आणि हृदयाचे ठोके कसे अचानक बंद झाले….त्याची जाणीव होन बंद झाल तर आपण कावरे बावरे होतो…तसेच हे दोघे नूतन नाही भेटलि , बोलली किवा दिसली नाही की… त्याचा जसकाय प्रणवायुच संपलाय की काय अस होत…
इतकावेळ नूतन ऑफिस बाहेर पैसेज मध्ये येऊन एका बेंचवर बसली होती…. पाऊस थांबून पाणी कधी कमी होतय याची वाट बघत..तिथुनच तिने घरी फोन केला…थोड़िशी रड़ली ..थोडिशि हसली…तिला अस वाटलच नव्हतं की कोणी जवळपास असेल …इतक्या लेट कोण थांबणार होत ??माझ्यासरख्या मुर्खाशिवय…आणि कधी नव्हे ते जोरात हसली होती ती…एकटेपनातला बालीशपना एन्जॉय करत होती ती…यालाच म्हणतात न दुःख मै भी ढूंढो तो खुशी मिलही जाती है…
तिचा हा सगळा वेडेपना तिच्यासाठी वेडा झालेला अविनाश एका कोपऱ्यात बसून बघत होता…आजपर्यंत त्याने तिला अस कधी पाहिलच नव्हतं…नेहमी फ़क्त एक जबरदस्त अशी बिज़नेस वुमनच् पहिली होती त्याने…तिच्या त्या रूपावर तर तो इम्प्रेस होताच पण हे रूप त्याहिपेक्षा जास्त लाघवी होत….
©पूनम पिंगळे
क्रमशः

Article Categories:
रोमांचक

प्रतिक्रिया व्यक्त करा