धोका भाग 5

Written by

# धोका
# भाग 5
ती रात्र दोघांना ही झोप लागली नाही ..सकाळी नूतन खूपच खुश होती तिच्यामधील बदल तिच्या आईलाही जाणवत होता..अस म्हणतात प्रेमात पडला की माणूस खूप सुंदर दिसतो..तशीच ती पण खूपच सुंदर दिसू लागली होती..तिला अस झालं होतं की कधी मी ऑफिस ला जाते आणि अविनाशला बघते..तिने भराभर सगळ आवरलं नास्ता केला आणि आज चक्क राजुल आणि संजूला न भेटताच गेली…कस वेड असत ना हे प्रेम माणसाला पार बदलून टाकत बघा…..
नूतन ऑफिस मध्ये आली सगळे तिच्याकडेच पहात होते ..तिला समजत नव्हतं काय झालंय अस सगळे माझ्याकडे का बघत आहेत..ती केबिन मध्ये गेली तर एक अनोळखी माणूस येऊन बसला होता ..त्याने एक मोबाईल तिच्या हातात दिला आणि तुम्ही या फोटोतल्या माणसाला ओळखता का विचारलं…तिने पाहिलं तर ते तिचे पप्पा होते…
नूतन : हो ओळखते की वडील आहेत हे माझे ..काहो तुमचं काही काम आहे का? ते दिल्लीला गेलेत काही कामासाठी ..मला सांगा तुमचं काय काम आहे ते.
.व्यक्ती : अहो ताई ऐकातर माझं ..खूप वाईट झालाय काल..हा माणूस मला जख्मि अवस्थेत माझ्या रानात सापडला काल.त्याला खूप लोक मिळून मारत होते .करण काही समजलं नाही मला ..अर्धमेल्या अवस्थेत तिथेच सोडून ते गेले …मी त्यांच्या जवळ गेलो तेव्हा त्यांनी हा मोबाईल माझ्या हातात दिला आणि मला तुटक तुटक हा पत्ता सांगितला..खूप रडत होते ..आणि म्हणाले माझी नूतन धोक्यात ..वाचवा..हा मोबाईल दाखवा तिला..आणि एक मोठं नोटांचा बंडल माझ्या हातात ठेवलं त्यांनी हेबघा…अस बोलून ते पैसे त्यांनी तिच्या हातात ठेवले…
नूतन : ते पैसे तुम्हालाच ठेवा …तुम्हालाच दिलेत ते त्यांनी..पण पप्पा आता कुठे आहेत? तुम्ही त्यांना कोणत्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलंय?चला आपण जाऊ तिथे..आता बरे आहेत का ते?
व्यक्ती : नाही ताईसाहेब मी त्यांना नाही वाचवू शकलो .सिटी हॉस्पिटल मध्ये नेलं मी त्यांना पण ते नाही वाचले..त्याची बॉडी हॉस्पिटलमध्ये आहे ..चला ताई ते तुम्हाला ओळख पटवून मगच हातात देतील…हा फोन तेवढा तुमच्या ताब्यात घ्या…आणि चला लगेच…तिने तो फोन घेतला आणि स्वतःच्या टेबलच्या ड्रॉवर मध्ये ठेवला..तिला काही समजतच नव्हतं तिने तो फोन आल्यावर बघू आधी मला बाबांना बघायचंय
नेहमीप्रमाणे अविनाश त्याच्या ऑफिस माध्ये जात होता ..जाता जाता नूतन ला शोधत होता ..पण आजच वातावरण काही त्याला नेहमीप्रमाणे दिसलं नाही..तो ऑफिस मध्ये आला तर नूतन कोणा इसमासोबत बोलत होती आणि रडत होती..अस वाटत होतं कोणत्याही क्षणाला ती खाली कोसळेल..आतामात्र त्याला तिला जाऊन भेटणं खूप म्हत्वाच वाटल..तो डायरेक्ट तिच्या केबिन मध्ये जाऊ लागला ऑफिस बॉय ने अडवलं त्याला ……इतक्यात नूतनच लक्ष बाहेर गेलं तिने त्याला हातानेच आत ये अस खुनवल …आता खरतर तिला एका भक्कम आधाराची गरज होती ..आणि तो आधार तिला अविनाशच दिसत होता…
कालच इतकी खुश असणारी नूतन आणि आज …खरच कसली असते हो ही नियती..एक जवळच माणूस भेटलं की दुसर आपलं ओढून न्यायचं ..कसला रे हा न्याय तुझा देवा…
अविनाश केबिन मधे गेला त्याने नूतनला आधी चेअर मध्ये बसवलं, पाणी दिल , आणि आता मला शांतपणे सांग काय झालंय ?हे सद्गृहस्थ कोण आहेत?तू यांच्यासमोर इतकी हतबल होऊन का राडतीयेस? काय झालंय तुला ? तुला मी अस कधीच नाही पाहिलंय आणि बघायचं पण नाहीये…,
व्यक्ती : साहेब आपण यांचे कोण?
अविनाश : का? त्याशिवाय मला समजणार नाही का काय झालंय ते?
व्यक्ती : तस नाही हो साहेब, ताईसाहेबांना सांभाळायला हवं …त्यांच्या वडिलांनीपण शेवटच्या क्षणी हेच सांगितलं की धोका आहे यांना…तुम्ही कोण आहात त्यासाठीच विचारल..
अविनाश : जवळ जवळ ओरडलाच …काय?? विश्वासराव गेले???असे कसे ???तुम्ही कोण??तुम्हाला काय माहीत??कुठे झालं सगळं???हे बोलत बोलता त्याने नूतनचा हात हातात घेतला ती त्याच्या कुशीत शिरून रडू लागली..
त्या व्यक्तीने तो सर्व प्रसंग अविनाशला सांगितला
अविनाश : चल आपण जाऊ या हॉस्पिटलमध्ये ..नूतन आपण शोधू नक्की काय झालंय ते..घाबरू नकोस ग मी सदैव तुझ्या सोबत आहे..तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही मी..चल उठ ..संभाळ ग राणी स्वतःला …
बाहेर सगळा स्टाफ अचंबित झाला होता सगळा प्रकार पाहून. सगळे धक्के आजच एकावर एक मिळणार आहेत की काय आपल्याला…साहेब गेले ..आणि त्यांच्या दुष्मणासोबत त्यांची मुलगी??हे कधी आणि कस?? काय होणार आहे देवच जाणे
अविनाशने तिला खांद्याला पकडून गाडीत बसवलं मागे त्या व्यक्ती बसल्या आणि ते सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचले..तिथे ओळखपत्र दाखवणं वैगरे सगळे सोपस्कार त्यानेच पूर्ण केले …मग त्यांना शवागारात नेण्यात आले..त्यांनी ड्रॉवर मधून विश्वासरावांचे शव बाहेर काढले आणि हेच का तुमचे वडील ?नूतन त्यांना पाहून तिथेच बेशुद्ध झाली ..अविनाश ने तिच्या वतीने ओळख पटवून दिली आणि शव ताब्यात घेतले
डॉक्टर नूतनला तपासत होते तेव्हा अविनाश विश्वासरावांचे शव अँबुलन्स मध्ये ठेऊन आला …त्याने डॉक्टरांना विचारले ,”काशी आहे आता ही? मी नेऊ शकतो ना सोबत तिला?”
डॉक्टर : हो पण त्या कोणत्यातरी धक्क्यामध्ये दिसतायेत ..ब्लड प्रेशर खूपच जास्त आहे त्यांचं ..सो प्ली take care,
अविनाश : हो ..तिचे वडील अचानकच गेले त्यांचीच बॉडी घेण्यासाठी आम्ही आलो होतो ..त्यांना पाहिल्याबरोबर ही बेशुद्ध पडली…
डॉक्टर : ohh , त्यांना मेडिसिन्स दया पण वेळेवर ..काळजी घ्या पण त्यांची.. बाय द वे आपण यांचे कोण??
क्षणाचाही विलंब न करता अविनाश बोलला हिचा भावी पती…
डॉक्टर : ओके ओके …गुड..काळजी घ्या
अविनाश : येस..thanks डॉक्टर …
थोड्यावेळात नूतनला शुद्ध आली अविनाश तिची शिद्धीवर येण्याची वाटच पाहत होता
अविनाश : आता कस वाटत आहे तुला ? तू चालू शकतेस ना? आणि हो तुझ्या घरी कोणी कळवलं का ?आपण कळवायला हवं ना??बाबांना अँबुलन्स मध्ये ठेवलंय चल आपल्याला निघायला हवं ..तू कॉल कर घरी .. किंवा तू कॉल कर मी सांगतो…
नूतन : हो ठीक आहे मी…हो मी लावते कॉल तूच सांग मी नाही सांगू शकत …
तिने कॉल लावला कॉल वर संजू होता तो नेहमीप्रमाणे बोल ना ताई आज आम्हाला न भेटताच गेलास ना तू ?? विसरलीस ना आम्हाला ?? हम्म म्हणूनच कॉल केलास न ? ते ऐकून नूतनला जास्तच रडू येऊ लागले तिने फोन अविनाशला दिला
अविनाश : हॅलो कोण बोलताय?
संजू : ताईच्या फोन वर हा दुसऱ्याच कोणाचा आवाज ऐकून तो जरा गडबडला …कोण तुम्ही ते आधी सांगा ? हा आमच्या ताईचा फोन आहे . तुमच्याकडे कसा?
अविनाश : तिची तब्येत ठीक नाहीये म्हणून मी बोलतोय आपण कोण?
संजू : का? काय झालाय ताईला ? कुठे ती?
अविनाश : अच्छा तुम्ही तिचे छोटे भाऊ न ? तुमच्या आईला दे बर फोन बाळ काही महत्वाचं बोलायचं आहे
संजू : मला सांगा मी तिला सांगतो..,
आविनाश : प्लीज बोलावं बाळ आईला कॉल वर..नंतर तुला पण सांगतो
संजू : बर ठीक आहे बोलावतो ..आई ए आई कोणाचातरी महत्वाचा फोन आहे ग लवकर ये
आई : कोणे ? बर आले थांब.. फोनवर ..हम्म कोण बोलताय आपण ?काय काम होत?
अविनाश : मॅडम मी जे सांगतोय त्यासाठी प्लीज तुमच्या मनाची तयारी करा ..खबर चांगली नाहीये..आणि आत्ता तुमच्या जवळ तुम्हाला सांभाळायला कोणीच नाहीये ..तुम्हाला सांभाळणारी व्यक्ती आता या जगात नाहीये मॅडम..
आई : काहीपण पण काय बोलताय ?? कोण बोलताय तुम्ही? काय झालंय कोणाला?कोणा बद्दल बोलताय तुम्ही??
अविनाश : मी अविनाश बोलतोय तुमचा होणारा जावई…तुमच्या ऑफिस समोरच माझं ऑफिस आहे..आम्ही आत्ता हॉस्पिटलमध्ये आहोत death बॉडी घेऊन येत आहोत ..कोणा कोणाला काळवायच आहे ते मला सांगा किंवा तुम्ही कळवा …आम्ही अर्ध्या तासात पोहीचतोच..
हे ऐकून मेघना म्हणजे नूतनची आई मटकन खालीच बसली… संजू धावतच आईजवळ आला जोरजोरात तिला हलवून विचारू लागला आई ..ए आई काय झालं तुला??आई अग बोलना…
ती काहीच बोलत नाही बघून काहीतरी वाईट बातमी आहे नक्की हे संजुला समजलं त्याने धावत जाऊन पाणी आणलं आणि मेघनाला पाजलं तिच्या तोंडावर पण पाणी शिंपडले…
संजू : आई थांब मी डॉक्टरांना बोलावतो…तुला काय होतंय ग आई ?
मेघना : नाही नको बोलाऊस डॉक्टरांना बाळा …आता कोणीच आपली काहीच मदत नाही करू शकत …आपल्यालाच सावरायला हवं
संजू : त्याला काहीच समजत नव्हतं आई काय बोलतीये..तो फक्त वेड्यासारखा तिच्याकडे बघत बसला..
मेघना मनाची तयारी करून उठली.. तिने नातलगांना फोन केले आणि बोलवून घेतलं इकडे नूतनने
अविनाशला मिठीच मारली आणि बोलली thank you so much dear ..आज तू नसतास तर मी काय केलं असत
अविनाश : थँक्स बोलून मला परकं करू नकोस ग …मी तुझाच आहे ..आणि कायम तुझ्या जवळच राहीन ..चल आता आपल्याला निघायला हवं..आणि दोघे निघाले…

©पूनम पिंगळे

क्रमशः

Article Categories:
रोमांचक

Comments are closed.