धोका भाग 6

Written by

# धोका
# भाग 6
दोघेजण अँबुलन्स पाठोपाठ घरी गेले..
विश्वासरावांचं समाजकार्य , सामाजिक ओळखी इतक्या जास्त होत्या की अँबुलन्स येईपर्यंत त्यांच्या बंगल्यासमोर लोकांचा समुद्रच पसरला होता ..त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी ते खूप अस्वस्थ झाले होते…त्यांच्या देवाचं दर्शन आता त्यांना परत कधीच होणार नव्हतं..प्रत्येकाच्या तोंडावर एकच प्रश्नचिन्ह होत कोण असेल तो राक्षस ज्याने आपल्या देवाला मारलं??? आजपर्यंत कधी कोणालाच न दुखवणारा हा सगळयांनाचा लाडका जीव …कोणाला खुपला डोळ्यात ??अस बेदारपणे जीव घेतला त्यांचा?
अँबुलन्स घराजवल आल्याबरोबर प्रेस वाले , पोलीस, आणि तो समुद्रा सारखा जनसमुदाय त्यांच्या स्वागतासाठी हजर होता…नाही स्वागत कसलं …त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी …
इतक्या लोकांमध्ये सुध्दा आज नुतनला एकट एकट वाटत होतं..सगळं जग खोट फक्त आणि फक्त माझा अविनाशच माझा आहे असाच तिच्या मनात विचार चालू होता…त्यामुळेच सगळ्यांच्यासमोर कोणाचाही विचार न करता ती अविनाशच्या हातात हात देऊन त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडत रडत निघाली होती…कारण आता तिचा फक्त तोच होता…
थोड्याच वेळात पोलीस बंदोबस्तात सगळ्या जनतेने दर्शन घेतले ..अस वाटत होतं कोणीतरी मोठा नेताच गेलाय की काय? प्रत्येकजण त्यांचं गुणगान गात होता …त्यानी आपली कशी मदत केली होती हे रडून रडून बोलत होते …का गेलात सोडून आम्हाला …या परत साहेब …
थोड्याच वेळात मेघना पण खूप जोरात रडू लागली. इतकावेळ तिने स्वतःला सावरलं होत पण तो बांध आता फुटला होता…ती बोलली,”साहेब तुम्ही होतात म्हणून मी होते…एका गरीबाची मुलगी इतक्या मोठ्या घरी आणली तुम्ही..मला कधीच त्याची जाणीव सुद्धा करून नाही दिली तुम्ही..नवीन नवीन मला अचानक सगळी सुख समोर दिसल्याने खूप मजोरडी झाले होते मी नको नको ते बोलत होते आपल्या नोकरांना ..तरीपण तुम्ही एक शब्दाने बोलला नाहीत मला .उलट त्या नोकरांनाच समजून सांगायचात. आणि हो आज काबुल करते सगळ्यांच्यासमोर मला नूतन नको होती घरात ..टोचायची ती मला..सतत आमच्या मधे मधे..खूप त्रास दिला मी तिला. पण ती तुमचीच मुलगी ना आजपर्यंत तिने कोणालाच माझ्याबद्दल वाईट सांगितलं नाही ना मला कधी वाईट बोलली.. आता तीच माझं सर्वस्व.. अचानक स्वतःला जोर जोरात थोबाडीत मारत ती चक्क नूतनच्या पायावर पडली ..पोरी माफ कर ग मला खुप वाईट वागले तुझ्याशी ..आता इथून पुढे मी कोणाकडे बघणार ग ?तूच ग आता माझी ,सगळकाही मला अंतर देऊ नकोस पोरी ..तुझी भावंड बघ ग पोरी आज पोरकी झाली..
नूतन आधीच पूर्णपणे बधिर झाली होती..जे घडलंय ते समजून घेणं तिला जड झालं होतं…आणि त्यात आज अचानक आईच हे असं वागणं …ती पटकन खाली वाकली आईला जवळ घेतलं …आग आई मी का तुला अंतर देऊ ??आजपर्यंत कधीच तुला मी वाईट म्हटलं नाही ग.तू जे केलंस ते कदाचित चुकीच होत पण मी ते कधी मनावर नाही घेतलं ग…उठ बर असा वेडेपणा नको करुस बघ तुला अस बघून संजू आणि राजुल किती घाबरलेत..या बाळांनो इकडे …दोघे पळत पळत तिच्याजवळ आले राजुल ने तर घट्ट मिठीच मारली नुतनला…
अंत्यसंस्कारासाठी शवाची मिरवणूक काढण्यात आली..नूतन ओढणीने वडिलांना वार घालत होती आणि कस काय झालं समजायच्या आतच नूतनच्या मागचा खांब पडला ..अविनाश तिच्याजवळच होता तो घाबरला त्याने खांबाजावळ जाऊन पाहिले तर त्यात एक बंदुकीची गोळी अडकलेली होती आणि त्यातून धूर निघत होता …
अविनाश : अरे इथे नूतनवर नक्कीच हल्ला झालाय आणि त्या शूटर चा नेम चुकला आहे कदाचित..या बंदूकीला साईलेन्सर असणार नक्कीच म्हणूनच आवाज आला नाही ..त्याने पोलिसांना तिची security वाढवायला सांगितली..
त्यानंतर विश्वासरावांवर रीतसर अंत्यसंस्कार झाले..नूतन घरी आली आणि सरळ तिच्या बेडरूम मध्ये गेली..अविनाशला तिने बळेच घरी पाठवलं तो बिचारा सकाळपासून तिच्या मागे मागे फिरत होता.तिची मदत करत होता काळजी घेत होता..
दमला तर असणारच ना तो..मग आराम तर हवाच ना??
तिने आंघोळ केली ..देवाला नमस्कार केला. नोकरांना स्वयंपाक बनवायला सांगितलं नोकर बोलले ताई आज कडू घास खायला हवा पण तो पण नाही खावंसं वाटत ..आमचे राजे गेले हो..खूप केलं त्यांनी आमच्यासाठी..
नूतन : अहो माझे वडिल होते ते .तुम्हाला इतकं दुःख होत आहे मला किती होत असेल पण तुमची मूल आहेत लहान त्यांना का उपाशी ठेवताय??संजू राजुल आहेत त्यांना पण भूक लागली असेल..जा बनवा तुम्ही स्वयंपाक…आणि जेऊन घ्या
पुन्हा आपल्या बेडरूम ला लॉक करून ती रडत बसली. तिला आज Ac नको वाटत होता अस वाटत होतं मोकळ्या हवेत माझे पप्पा मला त्यांचे आशीर्वाद देतील ..माझ्या कानात काहीतरी बोलतील जे त्यांना मला कधीच सांगता आलं नव्हतं..याच विचारात ती खिडकीमध्ये बसली होती आणि खरच खूप छान हवेची झुळूक ये जा करत होती ..जणूकाही तिचे पप्पाच तिला गोंजारत होते..
आणि अचानक तिला कसलीतरी चाहूल लागली..कोणीतरी तिला बघत आहे ..अस तिला वाटलं हो बागेत कोणीतरी लपून बसलं आहे ..तिने security ला कॉल केला आणि गार्डन चेक करायला सांगितलं ..पण नाही काहीच नव्हात तिथे..तिला वाटलं हा आपला भास असावा..आणि ती जाऊन बेडवर पडली..
10 मिनिटांसाठी तिचा डोळा लागला …तिला जाग आली ..आणि बघते तर काय समोर तो उभा……..

©पूनम पिंगळे

क्रमशः

Article Categories:
रोमांचक

Comments are closed.