नखरे क्योंं करती है यार…..??

Written by

अरे तू अजून इथंच?? घर सोडून जाणार होतीस ना?? – 🤵

तू तरी घरी कसा आलास? सकाळी तर म्हटलेलास ना, आता ऑफिसमधून घरी येतच नाही बस वाजवत!! -🙎

मला वाटलं, एवीतेवी तू गेली असशील, कधी नव्हे ती स्वर्गीय शांतता मिळेल आता घरात – 🤵

ओssह, मलाही वाटलं, एवढा तोऱ्यात बोलून गेलास, तर नक्की कुठे तरी गाडूनच घेशील, मग आपण कशाला उगाच घरातून निघा – 🙎

कशाला आलास ?? – 🙎

तू का नाही गेलीस घर सोडून ?? – 🤵

मूर्ख आहे ना मी म्हणून बसले इथेच – 🙎

मी पण मूर्खच ना म्हणून आलो परत – 🤵

😏 – 🙎

बरं मग आता एक मूर्ख दुसऱ्या मूर्खाशी बोलणार आहे की नाही – 🤵

अजिबाssत नाही – 🙎

ठिक आहे, तशी मी उद्या रजा काढलेली; म्हटलं फॅमिलीला कुठेतरी फिरवून येऊ, सिनेमा दाखवू, शॉपिंगला नेऊ – 🤵

फॅमिलीला अजिबात इंटरेस्ट नाही, जा तुझा तूच – 🙎

नक्की ना?? – 🤵

हो, नक्की – 🙎

चला मग बरं झालं, माझ्या कॉलेजच्या व्हाट्सप ग्रुपवर बघतो, खूप दिवस झाले जुन्या मित्र मैत्रिणींना भेटून, कोणी फ्री असेल तर भेटून घेतो, तेवढाच वेळेचा सदुपयोग – 🤵

🙄 – 🙎

मी आपला फर्स्ट प्रिफरन्स तुला देऊन पहिला – 🤵

गरज नाही – 🙎

बरं, काय जेवायला वगैरे मिळणार का?  – 🤵

नाssही – 🙎

नाही?? मग आताही कोणीतरी कंपनी शोधली पाहिजे डिनर डेटसाठी – 🤵

जा बस शोधत – 🙎

अर्ध्या तासानंतर……

अगं, तू कुठे चालली एवढी नटून थटून ? – 🤵

चालले डिनर डेटला, कॉलेजच्या जुन्या मित्राबरोबर – 🙎

कुठे ”फुलोरा” मधेच ना, माझी मैत्रीण पण तिथेच येणार आहे, मी सोडतो तुला – 🤵

दोघेही हॉटेल बाहेर येतात, दहा मिनिटं थांबतात.

काय गं, कुठाय तुझा टवळा ?? – 🤵

तुझी भवानी तरी कुठं आलीये अजून ?? – 🙎

मग आता निघायचं की ……? – 🤵

तुझी मर्जी !! – 🙎

व्वा!! ती कधीपासून चालायला लागली?? – 🤵

😡 – 🙎

ए, आता बस कर हा तुझे नखरे, दिलमे हाँ और जुबा पे ना – 🤵

😏 – 🙎

तुझा टवळाही मीच आणि माझी भवानीही तूच, कितीही भांडलो तरी, ना तू मला भवानी बदलू देणार ना मी तुला टवळा – 🤵

😍 – 🙎

ते बघ, आपलं आवडतं टेबल वाट बघतय, बुक करून ठेवलय मी केव्हाचं, माझ्या लाडक्या भवानीसाठी – 🤵

तू म्हणतोयस म्हणून हं – 🙎

हो, बाई मी म्हणतो म्हणून, तुला तर अजिबात इच्छाच नव्हती  माझ्याबरोबर डेटला यायची, हो ना?? – 🤵

होच्च् मुळी- 🙎

मग उद्या घरी राहू की जाऊ -🤵

आता एवढा प्लॅन करून ठेवलायस फॅमिलीला हिंडवण्या- फिरवण्याचा तो मोडला तर बरं नाही ना दिसणार – 🙎

अस्सं का?? – 🤵

अस्सच 😘  – 🙍

आता काही दिवसांसाठी तरी यांचं हे अस्सं 👉( 💏 ), आणि काही दिवसांनी परत (🤜🤛) 👈 हे अस्सच !!

चक्र काही थांबणार नाही, ना तुमचं, ना आमचं, ना ह्यांचं!!

हो ना??😅

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार : गुगल

लेख आवडल्यास लाईक, कमेंट नक्की करा आणि शेअर करताना नावासकटच करा.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा