“नवरा-बायकोत भांडण हे झालचं पाहिजे”

Written by

 

“अग निशा तुला कितीवेळा सांगितल काम झाल्यावर बाथरूमची लाईट बंद करत जा” समीर जरा ओरडतच बोलतो….अजून निशा बाथरूम मधून बाहेर बाहेर पडतच असते तोच समीर सुरू करतो…तशी निशा गडबडून जाते व “हो” म्हणून लाईट बंद करते….”माझा टाॅवेल दे ग निशा” परत समीरची हाक ऐकून निशा लागलीच टाॅवेल आणते….तसा समीर “अग हाजूना टाॅवेल कशाला आणलास, माझा रोजचा टाॅवेल कुठेय?” निशा “तो धुवायला टाकला आहे….” समीर “कशाला टाकायचा धुवायला?” म्हणून निशा काही बोलणार तोच तिच्या हातातला टाॅवेल घेऊन अंघोळीला जातो….”हूश्श” करत निशा किचनमध्ये निघून जाते….
तोच सानवी रडल्याचा आवाज येतो….सानवी समीर आणि निशाची एक वर्षाची मुलगी असते…..निशा सानवीला घेऊन तिला गरम-नरम खीर चारते….तोपर्यंत समीर आवरून बाहेर येतो….निशा सानवीला समीर कडे देते आणि समीरचा टिफीन व चहा,नाश्ता डायनिंग टेबलवर ठेवते….तोच समीर एकदा “निशू राणी चहात दूध जरा कमी घालत जा, माझी तब्येत लगेच वाढते अशा चहाने…” त्यावर जरा खट्टू च होते पण वरून न दाखवता नुसत हो म्हणते व सानूच आवरायला घेते. समीर सानू आणि निशाला हग करून बाय करतो व आॅफिसला निघून जातो….
निशा ही सानूच आवरून तिला खाऊ घालते आणि जोपवते…एव्हाना सकाळचे अकरा वाजलेले असतात….निशा स्वत:ची पोह्यांंची डीश घेऊन बाल्कनीत बसणार तोच फोनची रींग वाजते..समीरचा फोन असतो,ती हॅलो म्हणणार तोच तीकडून ” निशा तुला आईने दोनवेळा फोन केला तरी तु उचलत नाहीस, काय काम करत असतेस एवढ, कधीही वेळळेवर फोन उचलत नाहीस. तुझी असली नाटक जरा बंद कर…” निशा “अरे समीर” म्हणेपर्यंंत  समीर  फोन ठेवून देतो….आतामाञ निशाला रडूच कोसळत……
ती पोह्यांची डीश बाजूला ठेवून एकटक बाहेर बघत बसते….तिला हेच समजत नसत की आपली काही चूक नसताना आपण समीरच एवढ ऐकून का घेतो….त्याला प्रतित्तुर का नाही देत.तो बडबड करून गेलाही आॅफिसला आणि मी इथ विचार करत बसलेय…का तर दोघांच्यात भांडण, वाद नकोत म्हणून ! तस पाहिल तर समीर आणि निशाच एकमेकांवर खूप प्रेम होत…..फरक एवढाच की समीर त्याला जे वाटल ते फाडफाड बोलून रिकामा व्हायचा आणि निशा आपली भांडण नको म्हणून शांत बसायची पण नंतर तिला या सर्वाचा ञास व्हायचा…..मग तिचेच मन तिला प्रश्न विचारायच, का मला भिती वाटते एवढी दोघांमध्ये भांडण व्हायची?
तेव्हड्यात दाराची बेल वाजते, पाहते तर तिची शेजारची मैञीण रेवा असते….ती रेवाला घरात घेते पण तिच्या मनात विचार येतात, काल तर रेवा आणि तिच्या नवर्‍याच जोरदार भांडण चालू होत,अख्खी सोसायटी ऐकत होती आणि आज ही एवढी खूष,कस काय? रेवा “मॅडम कसल्या विचारात हरवलात एवढं आणि तोंड का पाडल आहे ?” रेवाच्या आवाजाने निशा जागेवर येते. निशा “काही नाही ग रोजचच आहे म्हणून निशा सकाळपासून घडलेल्या एक-एक गोष्टी सांगते….तु बोल काल भावजींबरोबर भांडण आणि आज एवढी खूष कशी?”….
रेवा “अग आमचं कालच भांडण मिटल कालच. नवरा-बायकोच भांडण असतच अस, ‘तुज माझ जमेना आणि तुझ्यावाचून करमेना….’ भारी असत !”  निशा “भारी काय मला तर आवडत नाही अजिबात भांडण करायला…ऊगीच कशाला वाद घालायचा”
रेवा “हो निशा भांडण नाही आवडत आणि मग असा विचार करत बसण स्वत:ला ञास करून घेण हे आवडत वाटत तूला?”  निशा जरा नाराज होऊनच नाही ग याचा पण ञास होतोच पण अस वाटत भांडण तेवढ नको……
निशा “तस पाहिल तर सकाळी माझ्या अगोदर समीरच बाथरुम मध्ये गेलेला, मी बाथरूम मध्ये जाते वेळी लाईट चालूच होती. म्हणजे त्याच्याकडूनच चालू राहिली होती लाईट…..आणि टाॅवेल पण आदल्यादिवशी धूवायला टाक अस त्यानेच सांगितलेल….चहात जास्त दूध म्हणशील तर एरवी तो रोज संध्याकाळी दूध-चपाती खातो मग एकदिवस माझ्याकडून जास्त दूध पडल तर काय बिघडल?……आणि सासूबाईंचा फोन आलेला तेव्हा मी सानूला झोपवत होते, मिस्काॅल पाहून केलाही काॅल पण त्यांचा फोन off आला…..तर समीर मलाच बोलला…..”
रेवा ” निशा तूज कस झालय ‘सगळ कळतय पण वळत नाही’ तुला माहीत आहे तुझी चूक नाही तरीपण तू बोलत नाहीस केवळ का तर दोघांच्यात भांडणाला पाया नको म्हणून? अग बाई झाल तर होऊ दे ना भांडण…..
नवरा-बायकोच नातच अस असत की, कितीही भांडण झाल तरी ते एकमेकांना सोडत नाहीत…उलट भांडणामूळे एकमेकांना एकमेकांच्या चूका कळतात, एकमेकांची गरज जाणवते…..अबोला धरला तरी आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही याची जाणीव होते…..एकमेकांच्या चूका सुधारल्या जातात त्यामूळे नातं आणखी घट्ट होत…..समीरची चूक आहे पण त्याही पेक्षा तु जास्त चूक करतेय त्याला प्रतित्तर न देता नुसतच मनाला ञास करून घेतेयस……अग संसार दोघांच्यावर चालत असतो, जेव्हा त्यातली एक व्यक्ती शांत बसते तेव्हा दुसरी व्यक्ती त्याला गृहीत धरते आणि आपलच बरोबर आहे असा त्या दुसर्‍या व्यक्तीचा समज होवून जातो…..तेव्हा निशा तु ज्या-त्यावेळी प्रत्तित्तर देत जा ऊगीच मनात कशाला ठेवायच काही…..बर आपण आपल्या आयुष्यभराच्या जोडीदाराला नाही बोलणार तर मग कोणाला बोलणार?…..मग थोडेफार वाद झाले वा थोडीफार भांडण झाली तरी। काय हरकत आहे…….”
रेवाने बोललेली प्रत्येक गोष्ट पटते निशाला……आणि निशाही “हो गं रेवा खरच तू खूप छान पटवून दिलस मला…..मी किती विचार करत बसायचे या गोष्टींवर……थॅंक्यू सो मच ! ”
तर पाहूयात पुढच्या भागात निशा कशाप्रकारे समीरला उत्तर देतेय की परत भांडण नको म्हणून शांत बसतेय…..प्रिय वाचक मिञांनो लाईक, शेअर, कमेंन्ट करून तुमच्या प्रतिक्रीया नक्की कळवा म्हणजे नेक्स्ट पार्ट लिहायला मला प्रोत्साहन मिळेल……धन्यवाद !

 

Comments