नवरा बायको एक घट्ट नात…

Written by

कालच्या विनाकारण झालेल्या छोट्याशा भांडणामुळे सकाळी पायल आणि पुनीत जरा गप्प गप्पच होते… दोघांना बोलायचे तर होते… पण मी का आधी बोलू यापासूनच सुरूवात होती…
पुनीत ऑफिसला जायला निघतो… त्याला वाटते बोलू की नको… बोलावे तर खुप वाटते… पायल शेवटी पुढाकार घेऊन बोलते… थांब चहा बनवते…
Already खुप late झालोय मी…मला नको चहा अस बोलून पुनीत ऑफिसला निघून जातो… पायल लगेच नेहमीप्रमाणे गॅलरीत जाऊन उभी राहते पण पुनीत रोज सारखे बाय न करता फक्त तिच्याकडे पाहून जातो…पायल आत येऊन तिच्या कामाला लागते… पण राहून राहून तिला पुनीतची आठवण येते…
तिकडे ऑफिसला गेल्यावर पुनीत थोडा विचार करत ‘मी पण जरा रूढच वागलो’ असे बोलत मोबाईल हातात घेऊन तिला कॅाल करायला घेतो.. पण तेव्हड्यात त्याचा मित्र त्याला हाक मारतो… आणि तिला कॅाल करायचे राहून जाते…
हॅलो… पुनीत… डबा खाल्लास का.??? पायल विचारते… पायल आज तु डब्बा दिला नाहीस… विसरलीस का…? पायल डोक्याला हात लावत… दाताखाली जीभ आणत… हो… नाही दिला… उशीर झाला होता… लक्षात नाही राहिल माझ्या… एव्हडे बोलून फोन ठेवते… इकडे ऑफिसमधे पुनीत ला पण राहून राहून पायल ची आठवण येत होती… कामात त्याचे जास्त लक्ष लागत नव्हते…
ऑफिस सुटल्यावर पुनीत त्याची कार काढून निघाला… जाता जाता त्याने FM रेडिओ सुरू केला… आणि मस्त गाणी ऐकू लागला… मधेच रेडिओवर एक कार्यक्रम येतो… “हॅलो… मी…आपला…RJ राहुल… होस्ट करतो… आपल्या कार्यक्रमाचे… ‘ तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना… ‘ चला तर मग उचला फोन आणि ज्यांना आपण दुखावलय…त्या आपल्या प्रियजणांना Sorry बोला… त्यासाठी कॅाल करा… ०२२××××× या नंबरवर… ”
लगेच क्षणाचाही विचार न करता पुनीत लगेच फोन लावतो… कारण त्याला माहित असते की पायल या वेळेस रेडिओ ऐकत असते… “हॅलो RJ… मला माझ्या बायकोला Sorry बोलायचे आहे… RJ लगेच रेडिओवर connect करतो…’ हॅलो… पायल… I Am So Sorry… मला माफ कर… Please… मी काल आणि आज तुझ्याशी खुपच रूढ़ वागलो… ‘ असं बोलून पुनीत RJ ला एक song लावायला सांगतो…. ‘हमे तुमसे प्यार कितना… ये हम नही जानते…'” आणि जाताना एक गुलाब घेऊन जातो…
इकडे पायल ऐकत असल्याने तिचा राग एकदम जातो… आणि त्याची वाट पाहते… त्याला जशी आवडते तशी कॉफी करुन ठेवते… तेव्हढ्यात बेल वाजते… पुनीत आणलेल गुलाब दारातूनच तिला देतो… आणि sorry बोलतो… ती त्याला रेडिओ सगळ ऐकत असल्याचे बोलत हिंट देत म्हणते… “तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना…” त्याला पण समजते हिने ऐकल म्हणून… आणि दोघे मस्त कॉफी घेतात…

(नवरा बायकोच नात हे असच असत… “तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना…” घट्ट विणलेलं… लोण्यापेक्षा मऊ… ते जास्त न ताणता एकाने तरी माघार घ्यावी… असे केल्यानेच संसाराचे दोन्ही चाक नीट चालतील… )

Article Categories:
प्रेम

Comments are closed.