नवा गडी… नवा राज्य – २

Written by

नवा गडी… नवा राज्य भाग – २

मंदारच्या आईची तब्येत आता बरी होत होती. हाॅस्पिटमधन सुट्टि झाली. तेजसही त्यांच्या सोबत घरी गेली. घरी येवुन सगळयांनी मोकळा श्वास घेतला. आता वेळ होती तेज़सची निरोप घ्यायची.
ती आई जवळ गेली,” चला काकु आला निरोप घ्यायची वेळ आली. मी निघते. तुम्ही आता काळजी घ्या. काही लागल तर नक्कीच कळवा”.
“अग राणी कुठे निघतेस एवढ्या घाईत जरा क्षण भर विश्रांती घे. जरा फ़्रेश हो पोटात दोन घास घाल आणि मग जा घरी. तशीही तू फ़ार वर्षानंतर आली आहेस. आम्हाला ही संधी दे तुझी सरवराई करायची.”
“ अग थांब ना तेजू मी तुझे फेवरेट बटाटे वडे आणतो लागलीच”, मंदार म्हणाला
“अरे वाऽऽऽऽ, जा तेजू मंदारच्या खोलीत जरा फ़्रेश हो”.
सगळयांच्या आग्रहास्त ती थांबलीच शेवट. मंदार बटाटे वडे आणायला गेला आणि ती त्याच्या खोलीत फ़्रेश व्हायला. तो परत आला तेव्हा ती त्याच्या बेडवर झोपुन होती. अगदी निवांत डोळे टिपले होते त्याने हळूच दार टेकवल आणि हरवला तिच्या चेहऱ्यात. एवढ्या दिवसांची तिने केलेली धावपळ तिच्या चेहऱ्यावर झळकत होती. खरच हे अस कस झाल त्याला कळलच नाही. सगळ क्षणातच घडल. पण आता पुढे काय?
असंख्य प्रश्नांचा मारा त्याच्या डोक्यात सुरु झाला. आता परत त्यांच तेच रूटीन सुरू होणार होत. ज्यात ती बाॅस आणि तो एक साधारण कर्मचारी असणार होता. त्याच खरच प्रेम जडल होत तिच्यावर. मनात भिती होती ती राहील काय आपल्या घरी? तिच घर केवढ मोठ आहे? आपल्या घरी adjust होईल काय? आज विचारुनच टाकतो. कल किसने देखा… म्हणून त्याने दाराची कडी लोटली आणि तिच्याजवळ गेला. तिच्या कमरेला विळखा देवुन अलगद बाहुत घेतल. तो स्पर्श दोघांसाठी स्वर्ग अनुभूती देणारा होता.
तिच्या कपाळावर आपले ओठ माखवत ,”तेज़ू….
या घरची राणी बनशील?”
तिने चटकण डोळे घडले व गालातच लाजली. त्याच्या बाहुला आणखीनच घट्ट विळखा देत म्हणाली,”या दिवसाची वाट तर मी काॅलेजमध्ये असल्यापासन बघत होती.”
“काय?? खरच”.
“ह्म्म्म्म्म्म्म, पण भिती वाटायची. तू मला स्वीकारशील की नाही याची”.
“मी तर कधीचाच तुझा होऊन बसलोय”

“हृदयात वाजे something…
सारे जग वाटे happening…
असते सदा मी Dreaming…”

जणु Background मध्ये हे गाण सुरु होत आणि ते दोघ एकामेकाच्या कुशीत हरवायच्या येण क्षणातच बाबांनी दार ठक ठकवल. तस त्याने तेजुला धपकण खाली पाडल आणि धावत बाथरुममध्ये पळाला. तेजुला हसू अावरेना.
कसबस स्वतःला आवरुन तिने दार उघडले.
“अग हा आलाच नाही काय अजुन?”
“माहिती नाही बाबा. बघते फोन करुन”.
“बघ जरा. पोटात कावळयांनी थैमान घातला आहे”.
तेज़ू ने दार टेकवले व आत गेली. मागण मंदार आला आणि तिला घट्ट विळखा देत मानेवर चावु लागला.
“ऐ सोड ना रे”.
“नको थांबवु ना.”
“अरे पण बाबा वाट बघताय ना”.
“ह्म्म्म्म्म”…
त्याचा झरकण हात झटकुन हसत हसत ती बाहेर पळाली. स्वादिष्ट बटाटे वडे सहकुटूंब खातांनी त्याला अजुनच चव आली होती. एकत्र बसुन खायचा हा तिचा पहिलाच अनुभव. सगळयांचा निरोप घेवुन ती घरी गेली. वाटेभर विचार,” मी निभवु शकेल ना हे नात? सगळेच किती निरागस आहेत. माझ्या स्वभावामुळे कुणी दुखी तर नाही होणार? बाबांचा काय? मी गेल्यानंतर ते घरात परत एकटे होतील?” असे असंख्य प्रश्न तिच्या मनावर मारा करू लागले.
गेल्या गेल्या ती बाबांच्या खोलीत गेली अन त्यांच्या मांडिवर डोक ठेवुन मंदार बद्दल सांगीतले. बाबा ऎकुन अवाकच झाले. एवढी हुशार आणि अनुभवी मुलगी अश्या साधारण मुलाच्या प्रेमात कशी काय अड़कली.
त्यांच्या पाहाण्या देखतचाच होता तो. पण देव जाने अस का होत त्यांना त्याच्या नियतवर शक होता. भावनेच्या आवेशात वाहलेल्या तेज़ुला त्या वेळी ते काहीच बोलले नाही शिवाय ती ऎकायच्या अवस्थेत ही नव्हती. पण काही तरी गडबड नक्कीच आहे हे मात्र त्यांच्या निदर्शनात नक्कीच आल होत. तिला विरोध करुनही काहीच फायदा नव्हता. त्यांना माहिती होत ती त्यांना ज़ुमानणार नाही. शिवाय ज़िद्दी जे म्हंटल तेच करणार. म्हणून त्यांनी तिच्या गोष्टीला नकार दिला नाही पण होकार हि दिला नव्हता. फक्त सावधगीरी राखायची पुर्ण तयारी केली होती.
ईकडे दोघांच्याही मनात लग्नाचे लाडु फुटत होते. आॅफिसच्या हि वातावरणात बऱ्यापैकी बदल झाले होते. एक साधारण कर्मचारी असणारा मंदार हळुहळु आपल्या डेस्कची जागा बदलवुन सी॰ई॰ओ॰ च्या कॅबिनमध्ये डेरा जमवु लागला होता. दिवसेंदिवस त्याची हिम्मत वाढत चालली होती. कधी वर मान करुन न बोलणारा आज ईतर कर्मचाऱ्यांवर आपला धाक जमवु लागला. दिवस दिवस भर तिच्या जवळ बसुन राहाणे, विणाकारण बाहेरचे टुर काढणे, कंपनीचे पैसे वैयक्तिक कामाकरीता ख़र्च करणे हे सगळे प्रकार हळुहळु जोमाने वाढु लागले होते. भावनेच्या आहारी गेलेल्या तेजुला काहीच आवेग नव्हाता पण तिच्या बाबांच त्यांच्या एका एका पावलाकडे निरखुन लक्ष होत. आजपर्यन्त मंदारच्या वागण्यातन कोणालाच काही कळल नव्हत पण तिच्या बाबांनी त्याची एक एक नस ओळखली होती.
ते मुद्दामच लग्नाची बोलणी लांबणीवर टाकत होते पण तेजुच्या हट्टापायी त्यांना वारंवार घुटने टेकावे लागायचे शेवटी तिच्या हट्टापुढ़े नमुन त्यांनी शेवटी बोलणीची तारीख ठरवीली. ठरल्याप्रमाणे सगळे जमले. एकुलती एक मुलगी त्यातल्या त्यात नामांकित कंपणीची
सी॰ई॰ओ॰ लग्न तर थाटामाटात होणारच होत. आंदनाच काय अक्ख स्वर्गाच वैभव ती सोबत मिरवणारच होती. मुलांकडन जेवढ जमेल तेवढ तेही करणारच होते. काही न बोलता त्यांना सगळच मिळणार होत. महिन्याच्या शेवटी शेवटीची लग्नाची तारीख ही ठरली. मोठया थाटामाटात राजकुमारी राजकुमाराच लग्न झाला. हृदयावर दगड ठेवुन बापाने लेकिला विदा केल. मन आतल्या आत घुसमळत होत पण तिच्या आनंदापेक्षा मोठ या जगात त्यांच्यासाठी काहीच नव्हत. मंदार घेवुन घेवुन काय घेईल पैस्या पाण्याची तर कमीच नव्हती पण त्यांना भिती होती तिच्या भावनांच्या रखडणाची. त्यांनी हव नको ते सगळच तिला दिल जेणे करून तिला त्रास नको.
सोन्या, हिऱ्या, चांदी, मोत्यात लादुन साता पिरतीच वैभव ती त्याच्या घरात घेवुन आली. घर हिरया सारख चकाचौंद लखलखुन टाकल. तिच्या येण्याने घराला घरपण मिळाल होत.
सगळ “पेहला नशा पेहला खुमार वाली” फिलींग होती. नया नया प्यार खुमार चढत होता. तिने फ़रमाइश केली आणि ते तिच्या डोळयांसमोर आल सगळ असच सुरु होत. सासुबाई तिचे भरभरून लाड पुरवित होत्या. तिच्या आवड़ी निवडीची सम्पूर्ण काळजी घ्यायच्या. तिला काहिही अडचण आली तर त्या लगेच असायच्या तिला मदतीला. नवीन घर, नवीन नाती या सगळयांमध्ये ती ताळमेळ घालायचा प्रयत्न करीत होती. शिवाय सगळे तिच्या मदतीला तत्पर होते.
एका महिन्याच्या सुट्टी नंतर ती ऑफिसला गेली. आॅफिसचा चेहरामोहराच बदलला होता. पंधरा दिवसात त्याने त्याच कॅबिन त्याचा डेस्क तिच्या बाजुला शिफ़्ट केला होता. जवळपास सगळेच डेस्क बदलवलेले होते. भिंती, परदे, सोफ़े, टेबल सगळयांचे रंग बदललेले होते. तिला हलके आणि नाजुक रंग आवडायचे आणि ऑफिस गडद रंगाने कजबजलेल होत. Even तिच्या कॅबिनचाही नक़्शा बदललेला होता अगदी सगळच तिला न आवडणार होत बघुन तिला चिडचिड होत होत.
ती disappointed झाली आणि खूप चिडली.तिला वाटल बाबांनी केले आसावेत हे सगळे बदल. आल्या आल्या मोठया आवाजात चिडक्या स्वराने तिने मॅनेजरला आवाज दिला. पुर्ण ऑफिस दणानुण गेल. मंदारला याची कल्पना नव्हती तो बाहेर गाडी पार्क करित होता आणि तिथेच एक क्लाइंट भेटला तर त्याच्याशी बोलत बसला.
“ मला न विचारता हे सगळे बदल कोणी केले”, मोठया आवाज ती मॅनेज़रवर भडकली.
मॅनेज़र मान खाली करून उभे होते.
“उत्तर हव आहे मला. बाबांनी मला न विचारता हे सगळे बदल कसे केलेत? I need answer now bloody damit ?”
“मॅडम हे सगळ मोठया सरांनी नाही केल?”
“What?”
“Yes ma’am”
“Then who has done this?”
“मंदार सरांनी केलय?”
What the hell are you talking?”
“हो मॅडम even सरांना ही हे अजिबातच आवडलेल नाही आहे. त्यांनी बघीतल्यानंतर ते पण खूप चिडले पण मंदार सरांच नाव सांगीतल्यानंतर ते काहीच बोलले नाही”.
“How dare him to do such things in my absence?”
तेवढ्यात मंदात तिथे आला…

क्रमशः

ससपेंस जरा वाढलेला आहे.. पुढे काय होईल? तेजुला आलेल्या रागाच काय होईल? ती त्याच्यावर चिडेल? काय दोघांच भांडण होईल? मंदारने तेजुला न सांगता अस का केल असेल? या सगळयांमागे मंदारच काही षड्यंत्र तर नाही ना? बघुया पुढील भागात..
तब तक Stay tune… वाचत राहा… आणि हो लेख आवडल्यास लाईक व कमेंट करायला विसरु नका.

धन्यवाद!
©️अश्विनी दुरगकर

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.