नवी ओळख

Written by

#नवी_ओळख

#१००शब्दांचीगोष्ट

माझ्यामूळे घराला वंशाचा दिवा मिळाला परंतु माझे स्त्रीमन पुरुषी शरीराची साथ देईना. लोक मला ‘ हिजडा’ म्हणून हिनवू लागले. घरच्यांनी माझ्या ‘लक्ष्मण’ या नावाला लावलेलं आडनावही काढून घेतलं. जळत्या निखाऱ्याप्रमाणे बोचनाऱ्या नजरा, विषारी शब्दांचे बाण पचवतच छोटीमोठी नोकरी करत L.L.M.चे शिक्षण पूर्ण केले. काही लोकं अंगचटीला यायचे. हिजड्यांनाही ‘नाही’ म्हणण्याचा अधिकार आहे याची जाणीव त्यांना करून दिली . माझ्यासारख्यांनाही सामान्यआयुष्य जगता यावे यासाठी संघर्ष केला.

वेश्याव्यवसाय करणाऱ्यांच्या ५० मुलांचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला. तृतीय पंथीयांना सन्मानाने करता येतील अशा नोकऱ्या मिळवून दिल्या.

त्यांनी मला त्यांच्या जीवनातील अंध:कार दूर करणारी एक ‘पणती’ मानलं. त्यांनीच मला ‘अॅडोव्हकेट लक्ष्मीताई’ ही नवी ओळख दिली.

©️अंजली मीनानाथ धस्के

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा