नवी गगनभरारी

Written by

#100शब्दांची गोष्ट

अचानक झालेल्या पावसाने रखमा आणि किसनचा संसारच उधळून लावला…डोक्यावर कर्जाचं ओझ , खाणारी चार तोंड आणि दोन महिन्यावर येऊन ठेपलेलं लेकीचं लगीन…पावसानं तोंडचा घास हिरावून नेला होता …एकच विचार त्याच्या मनात घोळत असायचा…आत्महत्येचा!!!

क्रूरकर्म्या पावसाने केला नाही न्याय ।
आत्महत्येशिवाय दुसरा उरला नाही पर्याय।।
मान्य नाही मला असं भेकडासारखं मरण ।
आत्महत्येच्या आगीत माझं जळणार नाही सरण।।
घालून बांध आसवांना पुन्हा एकदा हसायचे आहे।
छाटलेल्या पंखांना नवी उभारी द्यायची आहे।।
पुन्हा एकदा शिवार माझं मला नव्यानं फुलवायच आहे।
उंच उंच आकाशात नवी गगनभरारी घ्यायची आहे।।

किसन च्या डोळ्यात रखमाला वेगळीच चमक, एक आग दिसली…आणि मग तिला वाटलं आता दिवाळी आली…😊

 

©® सुनीता पाटील

Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा