नाती जपलीच पाहिजेत

Written by

तुम्ही नाती जपताय ना?

बाकी काही नाही जपलं तरी चालेल पण नाती मात्र जरूर जपा.

कारण नाती म्हणजे आयुष्याची life line ती जपायलाच हवी

आयुष्यात कधी कुठली नाती उपयोगाला येतील माहीत नाही

मित्र असूदेत भाऊ असूदेत आई वडील कुठलही नातं असूदेत पण ते जपा.

कारण नाती जपली नाहीत तर आयुष्याचा आनंद तुम्ही हरवून बसाल.

जेंव्हा आनंद होतो तेंव्हा नाती हवीत ,जेंव्हा दुःख वाट्याला येत तेंव्हाही नाती हवीतच कि,

आपल्या मनात जे काही चालू आहे ते बोलणार तरी कोणाकडे ?एकट्याशीच बडबड करणार ?

आणि ती पण किती दिवस.

आपला इगो आपण बाजूला ठेवला तर नाती सहसा तुटत नाहीत .कारण नाती तुटण्यामागे

सर्वात मोठं कारण असत मी पणा .पहिल्यांदा भारी वाटत आपल्याला दुसऱ्याला तूच कसा चुकीचा

आहेस आणि मी कसा बरोबर आहे ते दाखवायला पण एकदा राग गेला आणि ती व्यक्ती आपल्याशी

आता बोलताच नाही केल्यावर आपलाही माज उतारतोच नही का?आपल्याला आतून वाटत असत

समोरील व्यक्तीनेही आपल्याशी बोलावं पण परत इगो तो मध्ये येतो आणि त्याच कारणाने आपण त्या व्यक्तीशी बोलत नाही आणि मग आपला राग शांत झाला की आपल्याला आपली चूक जाणवते, आणि स्वतःचा राग येतो . अरे कशाला मी एवढं भांडलो खरंच गरज होती का ? तर उत्तर असत नाही .खर सांगायचं झालं तर अहंकार ही एकमेव गोष आहे जी कुठ्ल्याही नात्यांमध्ये दुरावा निर्माण करते .

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत