नात्यांची गुंफण…

Written by

नात्यांची गुंफण…!

काही दिवसांपूर्वी माझ्या मामेबहिणीला सहजच फोन लावला.जेव्हा “पळती झाडे पाहूया ….” हा लेख मी लिहण्याचा प्रयत्न केला तेव्हा मामाच्या गावाच्या खूप आठवणी जाग्या झाल्या होत्या … तिला तिचा business मध्ये उदंड यश मिळाले म्हणून तिचे सुद्धा खूप कौतुक केले . मामा, मामी भाऊ बहिणीची सुद्धा आठवण काढली. तिला मात्र माझा फोन आश्चर्यजनक होता. त्यावेळी फोनवर बऱ्याच आठवणीचा उजाळा केला. खूप कामात असते गं दिवसभर..! घर सांभाळून, दुकानात नवऱ्याला मदद हे सगळं करत असतांना फोन करणं नाही ग जमतं तुला …म्हणून खंत व्यक्त केली… सोबतच तिचे मी कौतुक केल्याने खूप आनंद झाला असं सुद्धा म्हणाली…क्षणात मन भरुन आलं…

असं वाटत का व्हाव असे..? कारण आपल्या बोलण्याचा समोरच्याला खूप आनंद वाटणं आणि त्याबद्दल क्रुतज्ञता व्यक्त करणं,हे खूप काही मिळवल्याचं मनाला समाधान देणारं असतं… नाही तर हल्ली दोन शब्द कौतुकाने बोलणे म्हणजे त्यात काहीतरी दुसराच हेतू असतो हा गोड गैरसमज लोकांना होतो. आजकाल लोकांना एकमेकांचे प्रोत्साहन पर शब्द देणे-घेणे नकोसे असतात.

जगात अनेक प्रकारचे माणसं असतात. प्रत्येकाला आपापलं विश्व वेगळं हवं असत. स्वतः च्या मनाप्रमाणे जगण्याची मुभा हवी असते. पण हे सगळं उपभोगण्याचा नादात तो “नाती ” ह्या शब्दाच अपभृशं रुप आपल्याला मिळत… जिथे रक्ताचं,मायेच, विश्वासच, आदरच, पावित्र्याच नातं असतं ते एका विशिष्ट काळानंतर निभवंतांना
एक पुसटशी रेष ओढली जाते…नातं संकुचित होऊ लागतं, आणि हळूहळू त्या नात्यातला गोडवा संपुष्टात येतो….काय कारण असावं..?

खरंतर इथेच सगळी गफलत होते. एकमेकांशी समजून घेवून समोरच्याला आपल्यातल्या सुंदर नात्याविषयीचा विश्वास देण्याची खूप गरज असते…पण त्यात खरेपणा असणं तितकंच महत्वाचे असते… मनात एक आणि ओठात दुसरे अशी कळा असता कामा नये.मग तुम्ही स्वतःच्या बोलण्यावर प्रामाणिक नसाल तर नातं प्रमाणिक राहील ,अशी अपेक्षांचे वारुळ दुसऱ्यांच्या माथी फोडणे व्यर्थच …!

नाती जपणे यासाठी दोन्ही बाजूंनी खूप समंजसपणा लागतो. एकतर्फी नाते अशोभनीय आणि मनाला ओझे म्हणून आपण स्वीकारतो. काही अपरिहार्य वेळा आपण अशी ओझी वाहतोच पण त्यात कसलाच आनंदाची सर नसते…!

आता थोडसं, मागे जायची म्हणजेच आपल्या पूर्वजांच्या वागण्यावर लक्ष देण्याची गरज आहे… या आभासी , चकमकी दुनीयेतून बाहेर पडून खरी नाती, आपली खरी माणसे जोडायची आणि ती टिकवून ठेवण्याची गरज आहे आता…आपला अमूल्य ठेवा आपण जपलेली “नाती” च आहे.. आपल्या आधीच्या पिढीला हे सहज जमले होते कारण नाते बहरायला, जोपासायला त्यांनी वेळ दिला होता. घरात येणारा जाणारा होता, एकमेकांविषयी जिव्हाळा होता…त्यांनी नात्याला पैशात कधीच तोलले नाही…आत्मियतेने प्रत्येक “नाती” निभावली…

म्हणून असं वाटतं नव्या पिढीच्या भाषेत त्यांची ‘वयक्तिक स्पेस’ देऊन वेळ देत नशिबाने मिळालेली आहेत तेवढी नाती मनोभावे जपू या!!

इच्छा तिथे मार्ग असतोच… तसच नात्याचं असतं.. आपण ठरवले तर नातं टिकून राहत आणि तिरस्कार केला तर तुटूनही जातं…कोणतही नातं टिकवायला संवाद हा हवाच… संवाद संपणे म्हणजे नाती खुंटण्याची निशाणी असते. आता ते कसं तोलायच ,कस सांभाळून घ्यायचं हे प्रत्येकाच्या इच्छेवर अवलंबून असतं….

ही नात्याची गुंफण कशी वाटली ,हे आवडल्यास सांगायला विसरु नका… तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा….

धन्यवाद…

नेहा खेडकर✍❤

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत