नात्याची गुंतागुंत….. भाऊबीज

Written by

(अनुजा व राधिका मधलं संभाषण…
लेक अनुजा आपल्या आईला राधिकाला विचारते )

अनुजा :- आई, sorry म्हणजे खूप मोठा शब्द आहे न ग..

आई :- का ग.. असं का विचारतेस?

अनुजा :– काल माझ व रियाचं भांडण झालं. चूक कुणाची होती माहिती नाही. आम्ही बोलण मात्र  बंद केल.
ती माझी बेस्ट फ्रेंड आहे न..

म्हणून मला न तिच्याशी न बोलता राहवलंच नाही आणि माहिती आहे का तिची पण सेम कंडिशन होती..
मग काय आज जेंव्हा शाळेत गेलो तेंव्हा… मनात जरा कसतरी होत होत.. आम्ही एकमेकींकडे बघितलं व एकसाथ दोघीनींही एकमेकींना sorry म्हंटल.😊😊😊आणि काय मॅजिक न आई.. आमचा राग कुठच्या कुठे पळून गेला व आमची गट्टी झाली पुन्हा.
म्हणून विचारतेय तुला.. सॉरी म्हणजे खूप मोठा मॅजिक वर्ड आहे न “

आई :-हो ग.. आपल काही चुकलं आणि ते आपल्याला कळलं तर लगेच सॉरी म्हणून द्यायचं.. त्यामुळे आपली मैत्री तुटत नाही..
आपल्या नकळत कधी -कधी समोरचा व्यक्ती हर्ट (दुखावल्याजातो ) होतो.. आणि मीच का sorry म्हणू.. असा ऍटिट्यूड (पवित्रा )आपण ठेवला तर मग नात किंवा मैत्री तुटत जाते..
तू व रिया दोघीही good girls आहात.. त्यामुळे तुम्ही दोघीनींही एकमेकींना sorry म्हंटल.. आणि तुमची friendship तुटण्यापासून वाचली.. माझ शहाणं पिल्लू ते 😘😘😘

अनुजा :- आई.. एक विचारू..

आई :-विचारण.. काय विचारायचं आहे..

अनुजा :- आई.. आत्या आहे न मला..?

आई:- हो आहे न.
अनुजा :-आई दिवाळी येतेय मग भाऊबीज येईल. . सगळ्या बहिणी आपल्या भावाला ओवाळतात,.. मला तर भाऊच नाही.. मग आत्या येईल का आपल्याकडे भाऊबीजेला.. की बाबा जाईल आत्याकडे??
पण
आत्या का नाही येत ग आपल्याकडे …?

आई :-ते कळायला तू छोटी आहेस बेटा अजून…. थोडी मोठी झाली की सगळं कळेल तुला... तुझ्या प्रश्नाचं उत्तर पण मिळेल.. आता काहीं विचारू नकोस..

अनुजा :- सांग न ग आई…  मी मोठी झाली बघ आता.. सॉरी म्हणायचं पण शिकले मी…

आई :-हो मोठी झालीस पण अजून तेव्हडी मोठी नाही न झालीस.. नात्यांची गुंतागुंत समजायला..

अनुजा :- म्हणजे ग आई? 🤔🤔🤔

आई :-काही नाही.. लक्ष नको देऊस त्याकडे.. तू अजून लहान आहेस.. अभ्यासावर लक्ष दे..

अनुजा :- आई.. आत्या व बाबांचं भांडण झालं का?

आई :-तुला सांगितलं न.. लक्ष नको देऊस म्हणून.. नाहीतर रागवेल ह… मी आता तुला.. 😡😡😡

अनुजा :- आई.. रागावू नको.. जर  माझ व रियाचं भांडण sorry मुळे मिटू शकते… आमची गट्टी होऊ शकते..
…तशीच बाबा व आत्याची गट्टी नाही का होणार?
तू बाबांना सांग न आत्याला sorry म्हणायला.
मग आत्या पण आपल्याकडे येईल.. बाबाला ओवाळायला.  ..मला पण तिच्याकडे जावस वाटत..
आई तू बाबांना सांग न sorry म्हणायला आत्याला.. प्लिज…

(आई निशब्द झाली लेकीच्या या बोलण्यामुळे… )

   बाळा तुला कस सांगू.. मोठ्यांच्या चुका sorry म्हणून सुधारल्या नाही जाऊ शकत ग.. नात्यांची गुंतागुंत इतकी वाढत जाते.. आणि त्यातून निर्माण होतो इगो.. तो इगो इतका फोफावतो की कित्येक नाते गिळंकृत करतो..
बोलताना जर भान ठेवलं तर एकमेकांच मन नाही दुखावल्या जात..
राग येतो..आणि रागाच्या भरात असं काही तोंडातून निघून जात… की नात कायमच दुरावल्या जाते..

अशा वेळी एक आशा असते.. “ज्याचं चुकलं त्याने माफी मागावी.. लहान.. मोठ याचा विचार न करता.. ”
पण मोठे लोक.. बोलताना चूक करतात व मग मी मोठा आहे मी का त्याला sorry म्हणू?  असा आव आणतात.. लहान असला तरी समोरच्या व्यक्तीला पण मान, व इज्जत असतेच न.. प्रत्येक वेळी आपण लहान आहोत म्हणून मोठ्यांच्या चुका नजरेआड नाही न करता येत..
अशा वेळी मोठ्यांनी देखील आपला मोठेपणा दाखवून आपली चूक मान्य करावी व लहान्यांची माफी मागावी.. तुटत असलेलं नात पुन्हा एकदा जोडाव..
पण.. नाही 😞😞
नात्यात “मी मोठा.. मी केल तेच योग्य “ असं असत मोठ्यांच.. मग लहाना देखील याला प्रतिकार करेलच न..
बाळा हे सगळं तुला नाही सांगू शकत .. तुझं इवलसं मन..  आता कुठे तुला नातेवाईक व नात कळायला लागल.. त्यात तुझं वय किती लहान व मन इतकं निरागस..
नको…. हे नाही सांगू शकत तुला मी . तुझ्या या प्रश्नांनी निरुत्तर झाले मी..
(निरागस प्रश्नांना उत्तर न देता एक आई मनातल्या मनात बोलत होती)

अनुजा :- आई… अग… आई कुठे हरवलीस.. मी काय म्हणतेय इतक्या वेळची आणि तू कुठे एकसारखी त्या खिडकी बाहेर बघतेस..
(लेकीच्या हाकेने भानावर आलेली आई.. ओले झालेले डोळे लेकीपासून लपवत.. ) काही नाही ग विचार करत होते माझ पिल्लू खूप मोठ झालं..😘😘😘

पण बाळा.. मोठ्यांच्या गोष्टी या तुम्हा लहान मुलांसारख्या sorry म्हणून नाही न ग सुटत… आणि त्या कळायला तुला माझ्याएव्हड व्हावं लागेल.. मग समजेल तुला..

अनुजा :- आई तू सांगणार नसशील बाबांना तर मीच  sorry म्हणायला सांगते त्यांना…. मीच सांगू का?

आई :-नाही बाळा.. बाबाला दुःखी बघायचं आहे का तुला..?

अनुजा :- नाही ग आई.

आई :-मग… आत्या हा विषयच काढू नकोस त्यांच्यासमोर.. बहीण या एका शब्दाने.. त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या होतात.. आणि तुझे बाबा हर्ट होतात.. आता तू बघ तुला काय करायच ते.

अनुजा :- आई मी मोठी झाली की या दोघांची गट्टी नक्की करेल.

आई :-हो ग.. माझ शहाणं बाळ ते..
समाप्त…. ©®जयश्री कन्हेरे -सातपुते

नात्यांची गुंतागुंत इतकी वाढत जाते की रक्ताच्या नात्यात देखील दरी पडते.. एखादा शब्द इतका मनाला लागतो की पुन्हा त्या बोलणाऱ्याचे तोंड देखील पाहावेसे वाटत नाही.. अशा वेळी… माफ करणे दूरच राहते.. बऱ्याच जागी बहीण -भावाचं असेच नाते झाले आहे..
सगळे.. बहीण भावाच्या नात्यातला गोडवा लिहीत आहेत.. आज मी त्याची दुखरी बाजू लिहिली.
एक सांगू इच्छिते.. लहान मुलांसारखं सॉरी म्हणून नात टिकलं/जुळलं असत तर फार छान झालं असत.. करून बघा.. प्रयत्न.. असा सॉरी म्हणण्याचा.. कदाचित तुमचं नात पुन्हा जुळेल..
आवडल्यास like, कॉमेंट करा व शेअर करायचा असेल तर नावासहित करा.. धन्यवाद 🙏©®जयश्री कन्हेरे -सातपुते
फोटो साभार गुगल

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा