नियतीचा खेळ -(भाग 1)

Written by

 

@अर्चना अनंत धवड

आज नाटकाच्या तालीमीचा शेवटचा दिवस होता. माधवी अनुप ची वाट पाहत होती. अनुप आला तशी माधवी त्याच्याशी जवळीक साधत म्हणाली, “अनुप, आज प्रॅक्टिस चा शेवटचा दिवस. उद्या नाटक आणि नंतर काय. कस भेटायचे रे आपण ”

अग, करू या काहीतरी………..

अनुप आणि माधवी एक वर्षापासून नाटकाच्या निमित्ताने एकत्र आले होते. नाटकात काम करता करता दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले हे कळलेच नाही. माधवी अणि अनुप वेगवेगळ्या समाजातील होते. माधवी दिसायला सुंदर,बडबडी, साधी भोळी, मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलगी होती. ती बी. ए. च्या दुसर्‍या वर्षाला होती. अनुप खेड्यातील, शिक्षणासाठी शहरात आलेला तरुण होता. शिक्षण पूर्ण करून एका नामवंत कंपनीत नोकरीवर लागला होता. अनुप थोडा निस्वार्थी अणि बिनधास्त स्वभावाचा तरुण होता. अनुप मागील दहा वर्षापासून एका कुटुंबाकडे किरायाने राहत होता. त्याच्या निस्वार्थी अणि प्रेमळ स्वभावामुळे तिथे त्याचे स्थान हे मुलासारखेच होते. अनुप चे आईवडील खेड्यात राहत होते.

त्याला नाटकात काम करण्याची हौस होती. नोकरी सांभाळून तो नाटकात काम करायचा… आताही दोघे एका नाटकात काम करीत होते… आणि आज नाटकाचा शो होता. अनुप अणि माधवी थोडे लवकरच आले. माधवी अनुप ला म्हणाली, नाटकानंतर थांबशील, मला तुझ्याशी बोलायचे आहे.

नाटकात दोघांनी नायक आणि नायिकेचे काम केले होते. प्रेम प्रसंग तर अगदी हूबेहूब झाले होते त्यामुळे नाटक अपेक्षेप्रमाणे छानच झाल होत. चेंज करून माधवी बाहेर आली.

हॉल च्या बाहेर तो वाटच पहात थांबला. ती आली. आज ती थोडी नर्वस दिसत होती कारण आपण याला रोज भेटू शकणार नाही याचे तीला वाईट वाटत होते.

आता आपण कस भेटायचे रे…माधवी रडवेली होऊन म्हणाली….

अग वेडाबाई….. काहीतरी मार्ग काढू की…. तीला धीर देत अनुप म्हणाला……

पण कस रे…… कारण घरून मला कॉलेज व्यतिरिक्त कुठे जाण्याची परवानगी नाही.

हे बघ, तू कॉलेज सुटल्यावर बाजूच्या गार्डन मध्ये थांबत जा. मी ऑफिस सुटल्यानंतर तिथे येत जाईल…….

ओके…. ठीक आहे मग उद्या पाच वाजता मी येते….

अशा प्रकारे रोज ते भेटत होते

घरी यायला उशीर होत होता. एक दिवस तिचा भाऊ ओरडला..

काय ग रोज रोज कुठे जातेस तू…….

दादा माझा एक्सट्रा क्लास असतो……

खोट बोलू नकोस….. खरं काय ते सांग… कारण आजकाल तू कोणत्या नाटकात पण काम करीत नाही…. ऋचा भेटली मला रस्त्यात.. ती म्हणाली एक्सट्रा क्लास वगैरे काही नसतो……

तशी ती भोळी अणि साधी मुलगी होती. खोट बोलण तिला जमत नव्हतं. ती प्रचंड घाबरली होती. तिनी सर्व सांगून टाकले.

तिचा भाऊ प्रचंड चिडला…. त्यांनी सांगितले, हे बघ माधवी आपल्या घराण्यात जातीबाहेर लग्न कधी झाले नाही. तेव्हा हे शक्य नाही. तू अनुप ला विसरलेले बरे.

माधवी ला माहिती होते आपला भाऊ जिद्दी आहे. तो काही ऐकणार नाही. तेव्हा शांत राहिलेले बरे.

दुसर्‍या दिवशी ती अनुप ला भेटली. त्याला सगळे सांगितले.

हेही सांगितले की माझ्या घरून लग्नाला परवानगी मिळणे अशक्य आहे…

अनुप म्हणाला, माझे आईवडील तर गावातील….. तेव्हा त्यांच्या कडून अपेक्षा न केलेली बरी…….

मग काय करायच रे….. मी तुझ्याशिवाय जीवनाची कल्पनाच करू शकत नाही…

“बघु या काय करता येते ते. मी माझ्या घरमालकीण आईला सांगून बघतो..मला वाटते ती आपल्याला काही मदत करू शकेल “अनुप

लवकर कर काही तरी…. माझ्या घरी माझ्या लग्नाची तयारी सुरू केली आहे. स्थळ शोधणे सुरु आहे….

लवकर घरी गेल पाहिजे.. उशिर झाला तर दादाला शंका येइल.. निघते मी…..

अनुप नी ही गोष्ट घरमालकीण आईला सांगितली.

आई म्हणाली, तुझी आई काय म्हणेल. ती नेहमी म्हणते तुझ्या भरवशावर मी मुलाला ठेवले. तू लक्ष्य ठेव. अरे तीला काय उत्तर देऊ.

मला माहिती आहे माझी आई या लग्नाला तयार होणार नाही अणि लग्न तर मी माधवीशीच करणार….. तेव्हा आईला कसं समजायचे हे तू ठरव.

हे पहा मी तुझ्या पाठीशी आहे परंतु मी उघडपणे तुझ्या लग्नाला पाठींबा देऊ शकत नाही. तुम्ही कोर्ट मैरिज करा…. नंतर मी तुझ्या आईला सांगते. तुझी आई तुझ्यावर खूप प्रेम करते त्यामुळे ती तुमच लग्न स्विकारेल…..

अगदी तसच घडल. अनुपच्या आई ला जेव्हा कळलं तेव्हा ती ताबडतोब आली… घरमालकीण आई ला खूप बोलली.मी तुझ्या भरवश्यावर ठेवले आणि तू विश्वासघात केला. खूप रडली… मग शांत झाली… माधवी ने नमस्कार केला तशी माधवी वर ओरडली. तू माझ्या मुलाला जाळ्यात अडकवले वगैरे वगैरे..

दुसर्‍या दिवशी आई जायला निघाली. माधवी ने नमस्कार केला. अनुपच्या आईनी तिला हातात पैसे दिले म्हणजे तिनी माफ केले.

माधवी चा संसार सुरू झाला. घर ची कामे आणि कॉलेज यात तिचा वेळ जाऊ लागला. अनुप नी तिला शिक्षण पूर्ण करायला लावले. ती घर सांभाळून कॉलेज ला जायची, अभ्यास करण्याची. अशाप्रकारे तिने आपल शिक्षण पूर्ण केले. तीच बी. ए. बी. एड. झाल होत. माधवी ला माहेरची दारे बंद होती. अणि सासर म्हंटल तर खेडेगावात. कधीकधी ती अनुप च्या मागे लागून आपल्या सासरी जाई तिच्या प्रेमळ स्वभावामुळे ती सासू सासर्‍यांच्या लाडकी झाली होती. दोघांचे अगदी छान सुरु होते. तीच नाटकात काम करने आता बंद झाले होते. तो मात्र आताही नाटकात काम करीत होता. दरम्यान तीन वर्षात ती दोन मुलाची आई झाली. मुलांचे संगोपन अणि घरची कामे यात तिचा कसा वेळ जात होता हे तिला कळत नव्हते. तो नाटकाची प्रैक्टिस करून रात्री बेरात्री घरी यायचा तोपर्यंत ती मुलांना जेऊ खाऊ घालून झोपून जायची. सकाळी पाच वाजता उठावे लागायचे. घरची कामे, अणि मुलांचे संगोपन यातच तिचा वेळ जात होता. अशा प्रकारे त्याचे कितीतरी दिवस कामाव्यतिरिक्त बोलणे होत नव्हते.

अनुपचा दिल्लीत नाटकाचा प्रयोग होता. त्याची हीरोइन त्याचाच कंपनीतील त्याची सहकारी सुषमा होती. सुषमा दिसायला सुंदर अणि स्वभावाने हसतमुख होती सुषमा ला अनुप आधी पासूनच आवडत होता. पण अनुपला माधवी पसंद पडली अणि अनुपने माधवीशी लग्न केले…..

आता अनायासे दोघे परत जवळ आले होते . सरावादरम्यान ते एकमेकांच्या खुप जवळ आले होते. सुषमा अनुप वर एकतर्फी प्रेम करू लागली होती.
पुढे काय होते जाणून घेण्यासाठी दुसरा भाग नक्की वाचा…..

©”अर्चना अनंत “✍️

धन्यवाद ??

Article Categories:
मनोरंजन

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत