नियतीचा खेळ -(भाग 2)

Written by

@अर्चना अनंत धवड 

 

आता अनायासे दोघे परत जवळ आले होते . सरावादरम्यान ते एकमेकांच्या खुप जवळ आले होते. सुषमा अनुप वर एकतर्फी प्रेम करू लागली होती.दिल्लीला  प्रयोग होता  आणि प्रायोजकांनी दोघांसाठी चुकून एकच रूम बूक केली होती.

अनुप ला प्रचंड टेंशन आले… तो म्हणाला, सुषमा आता काय करायचं…….

अरे त्यात काय….. दोन बेड आहेत ना.. तू एका बेड वर अणि मी एका बेड वर…. अनुप ला ते पटत नव्हतं पण नाईलाज होता.

दोघे रूम मध्ये झोपायला गेले. सुषमा नी छान गाऊन घातला होता . केस मोकळे सोडले. सुषमा खूप सुंदर दिसत होती. अणि तसही कित्तेक दिवसापासून माधवी चे त्याच्या कडे लक्ष्य नव्हते. तो सुषमा कडे पाहताच राहिला..

असा काय पाहतोस कधी न पाहिल्यासारखं……

अग आज तू काहीतरी वेगळीच दिसते.

हो का……. ती हसत  हसत  त्याचा जवळ आली अणि गमतीने त्याच्या पाठीवर थोपटले तिचा स्पर्श झाला तसा त्याचा स्वतःवर चा ताबा सुटला त्यानी तिला मिठीत घेतले ती पण त्याच्या स्वाधीन झाली. असं जे घडू नये ते घडून गेले.

अनुप ला दोषी वाटत होते. पण सुषमा ने त्याची समजूत काढली. हे पहा तू बळजबरी केली नाही जे काही झाले माझ्या संमतीने झाले. तेव्हा तू वाईट वाटून घेऊ नको.

आता वारंवार त्यांचा संबंध येत होता आणि अनुपला सुषमाचे आकर्षण वाटत होते… तो आता जास्तीतजास्त जास्त वेळ सुषमासोबत घालवीत होता.

इकडे माधवी मूलांमधे अणि घरकामात एवढी गुंतली की तिला अनुप चा साधा संशय ही आला नाही .

आता अनुप आणि  सुषमा एकमेकांवर  प्रेम करू लागले  होते . सुषमा त्याच्या वर लग्नासाठी दबाब आणत होती परंतू माधवी सोबत कोर्ट मैरिज असल्यामुळे तो घटस्फोट घेतल्याशिवाय दुसर लग्न करू शकत नव्हता. अणि निष्पाप, निरागस माधवी ला घटस्फोट देण्याची हिम्मत अनुप मध्ये नव्हती.

अनुप सुषमाला समजावीत होता….अग माझा प्लॉट आहे.. तिथे आपण घर बांधू….लग्न करून तिथेच राहायला जाऊ….. वर्षभरात घर बांधून झाले… त्यासाठी सुषमा नी पण भरपूर कर्ज घेतले.

माधवी ला वाटायच आपले घर बांधुन झाले की आपण राहायला जाऊ  . ती कधी कधी अनुप ला विचारायची की कधी जायचं आपल्या ला राहायला . तो म्हणायचा

अग मूल छोटी आहेत ना. येथून शाळा जवळ आहे . मूल मोठी झाल्यावर जाऊ. माधवी नवीन घर पाहायला जाण्यासाठी बरेचदा आग्रह करायची पण अनुप नी तिला कधीच नवीन घर दाखविले नाही.

अनुप नी नवीन घर खूप छान सजवले होते. किचन चे समान वगैरे  सर्व घेतले होते. दर शनिवार रविवार अनुप आणि सुषमा तिथे रहायला जात होते .  ते दोघे नवरा बायको सारखे राहत होते. आता सुषमा ला लग्नाची घाई झाली होती. कधी कधी तीला भीती वाटायची की हा आपला फक्त उपयोग तर घेत नाही ना…. ती आता लग्नासाठी दबाव आणत होती.

अरे किती दिवस वाट पाहायची मी. अनुप तू काहीतरी कर ना.

अग, काही दिवस थांब…. मी बोलतो माधवीशी… असं म्हणून तो सुषमाची समजूत घालीत होता.

बरेचदा तो माधवीशी या बाबतीत बोलायचं असा विचार करायचा परंतु त्याच्या डोळ्यासमोर माधवीचा भोळा चेहरा  अणि निरागस मूलं यायची. मूलं त्याची खूप लाडकी होती अणि नाही म्हंटल तरी माधवी बद्दल कुठेतरी मनाच्या कोपर्‍यात प्रेम होत. आता माधवी ला ही थोड थोड माहीती पडल होत. ती अनुप ला विचारायची, अरे लोक तुझ्या आणि सुषमाबद्दल हे काय बोलतात?

अनूप म्हणायचा, लोक काहीही बोलतात. तू लोकांवर विश्वास ठेवतेस?  मी अस करेल का?आम्ही नाटकात एकत्र काम करतो ना म्हणून संबंध येतो तिच्याशी…….  बिचारी भोळी माधवी, अनुप वर विश्वास ठेवायची. तीलाही नाटकाचा अनुभव होता…. संबंध तर येणारच हे तीला माहिती होते… परंतु थोडी भीती वाटायची….. आपणही तर त्याच्या प्रेमात नाटकात काम करता करताच पडलो…… मग मनाला समजवायची…. छे, माझा अनुप असं करणार नाही. किती प्रेम आहे त्याच माझ्यावर आणि मुलावर….

तिचा असलेला विश्वास बघून अनुपला भीती वाटायची….आपण  माधवीचा विश्वासघात करतोय असं त्याला वाटायचं….. परंतु सुषमासोबत असलेले त्याचे संबंध इतके पुढे गेले होते की तो आता त्यातून बाहेर पडू शकत नव्हता….. तो  सुषमाला म्हणायचा की आपण मंदिरात लग्न करू डिव्हर्स चे नंतर बघू…… पण सुषमा त्याला तयार नव्हती …. तीला त्याच्या आयुष्यात दुसरी बायको म्हणून स्थान नको होते….. त्यामुळे ती आता लग्नासाठी मागे लागली होती…. आणि तिनी त्याला दोन महिन्याचा  अवधी दिला होता.

त्याला प्रचंड मानसिक तनाव येत होता. त्यांनी ठरविले की आधी माधवी ला स्वतः च्या पायावर उभे करायचे नंतर सुषमा सोबत लग्न करू. त्यानी माधवीच्या नोकरीसाठी वशिला लावला. देणगी दिली. दोन महिन्यात तीला रुजू व्हायचे होते.

सुषमा ला सांगितले, दोन महिन्यात माधवी ला नोकरी लागेल नंतर आपण लग्न करू. सुषमा खुष होती. पण अनुप प्रचंड तनावग्रस्त होता. माधवी ला काय सांगायच अणि कस सांगायच याचा तो सारखा विचार करायचा

माधवी ला नोकरीची ऑर्डर आली होती. त्यांनी माधवी ला स्कूटी घेऊन दिली होती. छोटे मोठे बॅंकेचे व्यवहार शिकवले होते. माधवी ला एकटीने जीवन जगायला सक्षम केले होते.

त्याचा सुषमा सोबत लग्न करायचा अणि माधवी ला सोडायचा ताण वाढत होता. त्यांनी ठरविले आज माधवी शी बोलायचे.

रात्री माधवी झोपायला आली.. अनुप तिची वाट पहात होता. माधवी ला जवळ बसविल तिचा हात हातात घेत म्हणाला माधवी मला तुझ्याशी महत्वाचं  बोलायच आहे. माधवी, माझ तुझ्यावर खुप प्रेम आहे पण…………….. अणि अचानक त्याच्या छातीत दुखायला लागले तो तिच्या मांडीवर कोसळला. माधवी मोठ्याने रडायला लागली. सर्व घर गोळा झाले. दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सर्व प्रयत्न केले पण वर्थ. सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.

इकडे सुषमा ला तिच्या मैत्रिणीचा फोन आला.

सुषमा तुझा अनुप गेला ग…….

काय………

तिने सगळा घटनाक्रम सांगितला…….

ती मटकन खाली बसली. खूप रडली. शांत झाल्यावर ती फ्रेश झाली. घराबाहेर पडली. सरळ नवीन घराची रिक्षा केली. घरी गेली. बेडरूम मध्ये गेली सर्व आपले कपड़े गोळा केले. दोघांचे फोटो घेतले. ड्रेसिंग टेबल मधील सर्व सामान काढून बैग मध्ये भरले. एकवार सर्व घरावर नजर फिरवली आपली कुठलीही खून  तिला ठेवायची नव्हती.

ती पलंगावर बसली समोर अनुप चा मोठ पोर्ट्रेट होत. त्याच्या कडे पाहत बोलू लागली.

अनुप अस का झाल रे…… मी तुला माधवी कडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करीत होते पण देवानी तुला असा दूर केला की तूला माझा ही होऊ दिला नाही

. आज मी माधवी कडे बघते तर तिची झोळी भरलेली आहे. तुझी प्रेमाची प्रतीक दोन मुल आहेत. हे घर जे आपण दोघांनी मिळून बांधले ज्यात मी माझी आयुष्यभराची  कमाई ओतली तेही आज तीच आहे …… तिची नोकरी… अणि अनुप ची विधवा म्हणुन समाजात तिची ओळख. तिला जीवन जगायला हे पुरेसे आहे. माझी झोळी मात्र रिकामीच राहिली. तन मन धन सर्व मी तुला अर्पण केले पण तरीही.

अनुप, तुझा  मृत्यू माधवी आपले नशीब म्हणुन स्वीकार करू शकेल.  तू तीला  तिला सोडून माझ्याकडे आला असता तर हा धोका ती सहन करू शकली नसती.. म्हणुन कदाचित नियतीने हा खेळ खेळला असावा. नाहीतर चाळिसाव्या वर्षी  हा हार्ट अटॅक का यावा तुला.. …..

ती त्याच्या फोटो जवळ गेली म्हणाली, अनुप मी तुझ्यावर किती प्रेम केले रे कदाचित माधवी पेक्षा कणभर जास्तच…. पण आज मी तुझ अंतिम दर्शन सुद्धा घेऊ शकत नाही….

सुषमा दुरून अनुप च्या जळणाऱ्या चितेकडे पाहत होती…..

©”अर्चना अनंत “✍️

माझा लेख आवडल्यास लाईक, कॉमेंट आणि शेअर करा….

माझे आणखी लेख वाचण्यासाठी मला फालो करा…

लेख शेअर करायचा असल्यास नावासकट करण्यास हरकत नाही…

धन्यवाद ??

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत