निरोप…. गहिवरलेल्या मनाचा…!!

Written by
  • 5 महिने ago

लहानपणापासून ज्या शाळेत आपण शिकतो त्या शाळेचे नात अखंड जीवनाला प्रोत्साहित करते.शाळेचे सुंदर वातावरण मन मोहरुन टाकते, तिथल बागडण.. खेळण…हसण … खिदळण….सार कांही अप्रतिमच असत.गुरुजनांचा लागलेला लळा मन उल्हासीत करीत असतो.आनंदाचा क्षण हवाहवासा वाटत असतो.जसजसे आपले शिक्षण होईल तसे आपण पुढे जात असतो पण पुढील शिकणासाठी आपण शिकत असलेल्या शाळेचा जड अंतःकरणाणे निरोप घ्यावा लागतो.जीवन समृद्ध करणाऱ्या शाळेचा मनी दाटलेला कंठ काव्यमय शब्दांत व्यक्त केलेला आहे.

?

निरोप…. गहिवरलेल्या मनाचा…!!

शाळेत पाऊल हे पडले
आनंदाने मन सर्वांचे भरले

शाळेचे वातावरणच वेगळे
शिक्षणात रममाण झाले सगळे

शाळेत शिक्षण मिळाले चांगले
सर्वगुणसंपन्नतेने विद्यार्थी घडले

आठवण त्या प्रत्येक क्षणांची
हृदयात न मावे किर्ती त्या गुणांची

दिसते शाळेचे ते लोभस रुप
येता जाता मनी सलते खुप

आठवते ती गुरुजींची कौतुकाची थाप
आईवडिलानंतरचा दुसरा असतो शिक्षकच बाप

निरोप घेताना मन हे गहिवरले
नकळत अश्रू हे गालावर ओघळले

तुमच्या सुसंस्काराने आम्ही यशस्वी होवु
शाळेचे नाव कर्तबगारीने मिरवू

✍

नामदेव पाटील.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत