घरात सगळ्यांची लग्नाला जायची लगबग सुरू होती.घरातले सगळे पटापट तयारी करत होते.लग्न औरंगाबादला होत आणि पोहचायला 2 तास लागणार म्हणून सगळ्यांची धांदल सुरू होती…सोनालीने आपला नेकलेस जवळ खेळणाऱ्या मनुला तिच्या काकीला द्यायला सांगितला आणि सोनाली पुढच्या तयारीला लागली.
सोनालीच्या सासूबाई सगळ्यांना घाई करत होत्या,”आटपा ग मुलींनो लवकर लवकर” मग काय आईंचा आवाज आल्याबरोबर सगळे लगबगीने गाडीत जाऊन बसले..घरी फक्त लग्नासाठी आलेली मुलगी तब्येत बरी नसल्याने घरी राहणार होती…
यथावकाश लग्न वेळेत मिळालं मग सगळ्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या,गप्पांना उत आला…तेवढ्यात सासूबाई त्यांच्या मोठया सुनेला म्हणजे मंजिरीला म्हणाल्या,तुझा गळा का मोकळा ?नेकलेस कुठे आहे?, पडला की काय कुठे?
ह्यावर मंजरी म्हणाली नेकलेस घातलाच नव्हता.
तु सोनालीचा नेकलेस का नाही घातला, तुमचं ठरलं होतं ना तसं ”
मंजिरी काही बोलायच्या आतच त्यांनी “सोनालीला म्हंटल तिला नेकलेस का नाही दिला”
सोनाली म्हणाली की तिने मनुला दिला होता नेकलेस वहिनीला दयायला. म्हणजे नेकलेस मंजिरीपर्यंत पोहचलाच नाही,कुठे पडला असेल पोरींनी कुठे टाकला ,एक ना अनेक विचार ,….झालं सगळे घाबरले घरी फोन करून मुलीला शोधायला सागितलं बिचारीची तब्येत बरी नसताना सगळं घर शोधलं तिने,पण नेकलेस काही सापडला नाही.मनातून तीही घाबरली होती …
सगळ्यांना टेन्शन आलं …तेवढ्यात मनु तिथे आली ,आजीने मनु विचारला बाळा आईने तुला नेकलेस दिला होता ना काकीला द्यायला,
मनु–हो दिला होता
आजी–मग तु दिला का काकीला
मनु–नाही
आजी–मग कुठे ठेवला
मनु–ते ना मी माझ्या बहुलीला घातला ,सांगू आज्जी खुप सुंदर दिसत होती माझी बाहुली.मग मी तिला छान ओढणी घातली आणि कोणी बघू नये म्हणून तिच्यावर टॉवेल झाकून टाकला
आता आजीला हसावं की रडावं अस झालं😀😀
आजी–अग पण ती बाहुली कुठे आहे
मनु–डायनींग टेबलच्या खुर्चीवर…! 😊😊
घरी लगेच फोन लावून सांगितलं..
नशीब घरी मुलगी होती…
बाहुली नेकलेस घालुन मोठ्या दिमाखात खुर्चीवरच बसली होती….
आणि नेकलेस सापडला…
आतपर्यंत टेन्शन मद्ये असलेल्यांची हसून हसून पुरेवाट झाली.,😁😁😁😁
‘इति नेकलेस पुराण सम्पूर्णम’😊😊