नेत्रदान : कार्य महान….!!

Written by

?नेत्रदान : कार्य महान…!!

एका खेड्यात कुटुंब रहात होत…जेमतेम पाच माणसांच हे कुटुंब शेतीवच गुजरान करत होत.साधारण एकरभर असणाऱ्या जमिनीत पीक घेऊन आपल कसतरी पोटपाणी चालवत होत…कुटुंबाची प्रमुख कृण्णाई मोठ्या चपलखतेने संसाराचा गाडा हाकत होती.कृण्णाईच्या पोटाला तीन पोर …संसाराच रुप त्यांंच्यात दिसत होत..पोरांना मोठ करण्यासाठी कृण्णाईन हाडाची काड केली होती.घरच सारी शेती बघत कृण्णाई पोरांच्यासाठी मोलमजुरीसाठी जाई.पती श्रीपती कृण्णाईला हरतर्हेच्या कामात मदत करत असत , पण कृण्णाईचा तगडा अनुभव संसार पेलण्यास कामी आला होता.
बघता बघता कृण्णाईन पोर मोठी केली.थोरले पोरगं बाजीराव शाळत जरा हुशार निघाल…तेन शिक्षण चांगल घेतल..नशिबाने ते मास्तर झाल….दुसर मुलान आय टी आय करुन चांगल्या कंपनीत नोकरीला लागल…नक्षत्रासारख्या पोरीला कृण्णाईन शाळा शिकवून तिच लन्न लावून दिल.ही संसाराची घडी बसवताना कृण्णाईला नाकेनऊ झाल होत… पण आत्ता कृण्णाईच कुंटुब बर्यापैकी सेटल झाल होत.दोन्ही पोरांची लन्न करुन कृण्णाईन सुस्कारा सोडला होता ..चांगल्या सुना मिळाळ्याने सार कांही व्यवस्थित चालल होत.

कृण्णाई शेतात राबून राबून तिच्या शरीराची झीज झालीय होती त्यामुळे आता तिला चालताना त्रास होत होता.शरीरही मनाजोग साथ देईना …शुगर .बीपी..या आजारांनी कृण्णाईच्या शरीराची चाळण करण्यास सुरवात केली.कृण्णाई बोलण्यात फार तरबेज होती…मध्यंतरी तीने नेत्रदान देण्याविषयी ऐकले होते…आपले डोळे कुणाच्यातरी उपयोगी पडावे अशी ती कायम म्हणत असत.आपल्या मुलांनाही तीने बजावलं होत मी मेल्यावर माझ डोळे तेव्हड दान करा..

कृण्णाई नेहमीच्या कामात असताना तिच्या छातीत दुखू लागल.असह्य वेदना झाल्यामुळे कृण्णाईला दवाखान्यात दाखल केल…शुगर ..बीपी असल्यामुळे खाण्यापिण्यावर मर्यादा आल्या पोटात दुखत असल्याने तिला कळा फार सोसेना झाल्या ..अन्न कमी जाऊ लागल .पकृती एकदमच अशक्त झाली.रक्त कमी झाल…पोटात कायली वाढू लागली ..अशी अवस्था बरेच दिवस राहिली.डॉक्टरांच्या उपचाराला शरीर साथ देईना..अचानक कृण्णाईला हृदविकाराचा झटका आला आणि कृण्णाईन प्राण सोडला…एक लढवय्यी कृण्णाई आजारपणात हारली होती..पण ..तिचा दुरदृष्टीकोन मुलांच्या लक्षात आला…लगेच डॉक्टरांना बोलवून कृण्णाईचे डोळे दान करण्यात आले..मरणोत्तर नेत्रदान झाल्यामुळे आपल्या आईच्या सामाजिक जाणीवेचा विचार प्रत्येक्ष्यदर्शी अमलात आल्यामुळे मुलानांही बरे वाटले…

एक खेड्यात राहणारी स्री अवयवदानाचे महत्त्व जाणते..व नेत्रदान करते ..हे खरोखरच समाजप्रबोधनात्मक आहे….नेत्रदानामुळे आनेकांना नवे जग पहाण्याची संधी मिळते….तेंव्हा नेत्रदानाविषयी जागृती निर्माण करा…..कृण्णाईच्या कार्याला सलाम…

?नेत्रदान कार्य महान…!!

✍नामदेव पाटील.

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा