नेहमी हसत राहाव…

Written by

मैत्रीनींनो राहाव तर असच राहाव… 

       वयाची वर्षें न थांबता वाढत जावी पण चेहऱ्यावरील हास्य मात्र फुलत जाव.. वयाच बंधन आपल्या हसण्यात अनिवार्य नसावच.. चेहऱ्यावरील त्या हास्यात काहीही बदल होता कामा नये बर का…? जिवणात उतार चढाव… प्रत्येकाच्या येतात पण उतारातील गोड आणि चढावातील वाईट अनुभव घेवुन सदा हसत राहावे… उलट त्या हास्याला नवीन रूप देत जाव…  कधी जुन्या मैत्रींनी बरोबर दिल खुलास गप्पा करत हसाव… तर कधी लहान मुलांबरोबर लहान बनुन खळखळत हसाव… कधी नवऱ्याबरोबर गालातल्या गालात लाजत हसाव… तर कधी एखाद जोक वाचुन मन मोकळ करत हसाव….

      कधी पाणी पुरी… आईस गोला खावुन समाधानाने स्मित हास्य हसाव…. तर कधी नवऱ्यासाठी काही तरी special करुन त्याची वाहवाही घेत मुटकुन हसाव… कधी घरात serious गोष्ट सुरु असेल तर सगळयांच्या चेहऱ्याकडे एक नजर बघुन चटकन हसाव… कधी सासु सासऱ्यांन पुढे जोक करुन हळुच हसाव… कधी कधी कारण नसतांनी एखादा जुना प्रसंग आठवुन वेड्या सारख Non-Stop हसाव…. कधी कधी सगळया चिंता दुर सारत भरल्या डोळयांनी हसाव…

 खर आंनद लुटायचे आणि लुटवायचे अनेक मार्ग असतात…  बस त्यांच्या शोधात कायम असाव लागत…. म्हणुन स्वतः ही सदैव हसत.. खळखळत राहाव आणि दुसऱ्यांनाही प्रवृत कराव…

       हसण…  अजिबात विसरु नये….  ते निरंतर चेहऱ्यावर तेवत ठेवाव….

 

©️अश्विनी दुरगकर…

 

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा