न्यूनगंड म्हणजे काय?

Written by
  • 2 महिने ago

सर्वप्रथम न्यूनगंड म्हणजे काय हे समजून घेऊ. न्यूनगंड या शब्दात दोन उपघटक आहेत पहिला न्यून म्हणजे कमी, कमतरता अर्थात न्यूनता असेही म्हणता येईल व दुसरा म्हणजे गंड. गंड या शब्दाला इंग्लिशमध्ये कॉम्प्लेक्स म्हणतात. आता ही झाली पुस्तकातील व्याख्या. साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचे म्हटले तर न्यूनगंड म्हणजे आपल्या मनात असलेली कमीपणाची व नकारात्मक भावना. स्वत:ला इतरापेक्षा कमी लेखण्याची वृत्ती. न्यूनगंड म्हणजे आपल्यात असलेली आत्मविश्वासाची कमतरता. मानसशास्त्रीय दृष्टीने न्यूनगंडाकडे पाहिले पाहिजे. आपण प्रत्येक काम दोन टप्प्यांत पूर्ण करतो. पहिले त्या कामाविषयी मनात एक चित्र बनवतो व नंतर ते काम प्रत्यक्षात पार पाडतो. न्यूनगंडाची विशेषता अशी की जेव्हा आपण कामाबद्दल चित्र बनवत असतो तेव्हा काही नकारात्मक विचारही मनात आणतो. जसे, आपण हे काम करू शकणार नाही, तो एवढा हुशार मुलगा नाही करू शकला तर आपण कसे काय करू शकणार, अपयशी ठरलो तर लोक काय म्हणतील, असे नकारात्मक विचार मनात येऊन न्यूनगंड निर्माण होतो. ‘लोक काय म्हणतील’ हा जगातील सर्वात मोठा रोग आहे. िंनदकाचे घर असावे शेजारी या ओळीप्रमाणे आपण याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण होते उलटेच. दुसर्‍याच्या बोलण्यानेच सर्वात जास्त न्यूनगंड निर्माण होतो.
न्यूनगंड निर्माण होण्याची करणे
आपल्या जीवनात एखादा असा क्षण येतो जेथून न्यूनगंडाची सुरुवात झालेली असते. न्यूनगंड हा खेड्यातील मुलांमध्ये अधिक उद्भवतो, असे काही मानस तज्ज्ञांचे मत आहे. खेड्यातील मुले स्वत:ची तुलना नेहमीच शहरी मुलांशी करतात. आपले शिक्षण मराठी माध्यमातून झाले, ‘त्यांचे’ इंग्लिश माध्यातून, आपल्याला सोयीस्कर शिकवणी वर्ग उपलब्ध नाहीत, ‘त्यांना’ आहेत वगैरे विचारांमुळे न्यूनगंडाची भावना निर्माण होते. तसेच न्यूनगंडाचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे पालकांनी विशेषकरून ‘आयांनी’ आपल्या मुलाची िंकवा मुलीची इतर मुलांशी केलेली तुलना. तो/ती बघ किती अभ्यास करतो/करते, तो/ती किती हुशार आहे ही अशा प्रकारची वाक्ये मुलांमध्ये न्यूनगंड वाढविण्याचे काम करतात.
न्यूनगंडावर मात कशी करायची?
आपण प्रत्येक वेळी दुसर्‍याचा विचार करत असतो. मित्र-मैत्रिणी असल्यास मग 24 तास त्यांच्याबद्दल विचार करण्यात जातो. पण आपण कधी स्वत:बद्दल विचार करतो काय? खूपच कमी. न्यूनगंडावर मात करायची असेल तर आपली बलस्थाने आणि उणिवा यावर पद्धतशीर अभ्यास करायला हवा. या दोन गोष्टींची एक यादी तयार करायला हवी. उणिवा कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवे. डोळे उघडे ठेऊन बघितले तर आपल्या सभोवताली न्यूनगंडावर मात करून यशाचे शिखर गाठलेली असंख्य उदाहरणे दिसतील. तेव्हा उंची कमी आहे, दिसायला चांगला नाही, उत्तम इंग्रजी येत नाही, चाणाक्ष/हुशार नाही, तल्लख बुद्धी नाही, हे असले स्वत:ला कमी लेखणारे विचार आधी झटकून टाकण्याची गरज आहे. स्वत:वर विश्वास ठेवत प्रयत्नपूर्वक न्यूनगंडावर मात करून यशाचे शिखर गाठणार्‍या लोकांचे उदाहरण सतत डोळ्यापुढे ठेवले पाहिजे. वर्त्त्त्त््त्त्

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.