परंपरेला फाटा देत… सुना बनल्या मुली

Written by

परंपरेला फाटा देत… सुना बनल्या मुली…..
माहिती नाही ही बातमी तुमच्यापर्यंत पोहचली की नाही. म्हणून लिहितेय, कारण अशा खऱ्या घटना ज्या समाजपरिवर्तनाची गरज आहे, तुमच्यापर्यंत पोहचाव्या हा शुद्ध हेतू…
तर काल.. परवा टीव्हीवर बातम्या लावल्या आणि बातमी सुरु होती…. “परंपरेला फाटा देत सुनांनी दिला सासूच्या पार्थिवाला खांदा ” सोबतच फोटो होता चौघींचा..
तर   हे असं अघटित कस घडलं…?????असा विचार डोक्यात सुरु होता.. माझ्या.. ???
जिथे सासू सुनेचा छळ करते,  तर कुठे कुठे सून सासुला घराबाहेर काढते , वृद्धाश्रमात रवानगी करते… अशा काळात मुलगा, जावई असूनही सुनांनी सासूच्या पार्थिवाला खांदा का दिला असेल?????? असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात डोकावत असेलच…
तर बघूया… का  घडलं हे सगळं…
बीड शहरातील पांगरी रोड,  काशिनाथ गिरम नगर येथे  सुंदरबाई दगडू नाईकवाडे (वय ८३) या आपल्या चार मुले व चार सुनांन सोबत राहत होत्या… वय बघा त्याचं यांचं८३ वर्ष… म्हणजे त्या आताच्या सासूबाई नाहीत…फार जुन्या आणि परंपरा पाळणाऱ्या, सासुरवास करणाऱ्या सासवांच्या काळातील होत्या..
अध्यात्मिक वृत्तीच्या असलेल्या सुंदरबाई यांनी आयुष्यात  देवधर्मासोबतच, आधुनिक विचार देखील अंगिकारले होते.  त्यांनी आपल्या चारही सुना लता, उषा, मनीषा, मीना यांना कायम मुलींपप्रमाणे प्रेम आणि माया दिली. रागावल्या असतील पण आईच्या हक्कानेच.. त्यामुळेच तर सुनांनाही सासूबाईचा विशेष लळा होता..
सासू- सुनाच नात समजून घेतल्याने खुप छान व घट्ट होत जात.. तसच काहीस सुंदरबाई व त्यांच्या चारही सुनांमध्ये हे प्रेमळ नात फुलल.
सुनांनीही कधी सासूबाईंचा शब्द खाली पडू दिला नाही. भांड्याला भांड लागल की आवाज होणारच.. तस यांचं झालंही असेल तरी सासूबाई या आईप्रमाणे रागावतात असं समजून त्यांनी कधीच सासूचा राग केला नाही.
वृद्धापकाळामुळे सुंदरबाई यांना चालणे मुश्किल होते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट त्यांना जागेवर, आणि जेव्हाच्या तेव्हा अगदी मागण्याअगोदर हजर असे.
यातही चारही सुनांनी “मीच का करू” “तू का नाही करत ” असं कधीच केल नाही.   चौघीनी मिळून सासुला काय हवं, केंव्हा हवं हे बरोबर हेरून त्यानुसार सगळ्या गोष्टी सासूला जागेवर दिल्या.
यावरून तर हेच कळत की “त्यांच्यातले नाते म्हणजे सासू-सून नाही तर, आई-मुलीप्रमाणेच फुलत गेले आणि शेवटपर्यंत टिकलेही.”
गौरीं-गणपतीच्या सण आला.. गौरी उठल्यानंतर सोमवारी 9-9-1019ला. सुंदराबाईंचं वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला व जास्त सुनांना कारण त्यांना आईची माया आता मिळणार नव्हती…
अंत्यविधीची सर्व  तयारी झाली… पार्थिवाची अंत्ययात्रा निघाल्यानंतर या चारही सुनांनी आपली खांदा द्यायची इच्छा दर्शवली.. आणि घरच्यांनी त्यांच्या इच्छेला मान दिला.
बऱ्याच जागी स्मशानभूमीत महिलांनी जाण्याची प्रथा नाही. त्या परंपरेला छेद देत लता, उषा,  मनीषा, मीना  यांनी  सासुबाईंच्या पार्थिवाला खांदा दिला.
त्या सुनांच म्हणणं होत की “सासुबाईंनी आम्हाला सन्मानाने वागायला शिकवलं. त्यांनी कायम आम्हाला मुलीसारखं  वागणूक आणि प्रेम दिली . मूलं म्हणजेच आमचे पती खांदा देतील. पण, आईनी आमच्यावर तेवढंच प्रेम केल आहे. म्हणून आम्ही चौघीदेखील खांदा देउ..” याप्रमाणे सुंदरबाईंच्या अंतिम यात्रेत त्यांच्या सुनांनी मुलांच्या बरोबरीने खांदा दिला. ते सासूकडून मिळालेल्या मायेमुळे, प्रेमामुळे.
आजकालच्या जमान्यात हे उदाहरण म्हणजे……मला देखील शब्द अपुरे पडत आहेत त्याविषयी लिहायला.. फक्त त्या सासू -सुनेच्या नात्याला ???सलाम करील मी मनापासून.
जिथे सासूच्या नावाने सुना बोंब ठोकतात… तिथे सुनांनी यातुन नक्कीच आदर्श घ्यावा..

आता सुना म्हणतील की “त्या सुंदराबाई चांगल्या सासू असतील आमची तशी नाही “ तर त्या सुनांना एकच सांगायचे आहे की “एका हाताने टाळी वाजवून दाखवा “

ज्यांची वाजेल त्यांना पूर्ण अधिकार अशा कमेंट करण्याचा..

माझ्या समोर बरीच उदाहरणे आहेत.. “जिथे सासू सुनेला मुलीसारखं वागवते तरी सून सासूलाच उलट बोलते..”
आणि
जिथे “सून चांगली आहे,  आई.. आई करते तिथे सासू वाईट आहे”.
आणि
अपवादात्मक जागी सासू -सुना दोन्ही चांगल्या आहेत.. ते सुंदरबाई व त्यांच्या सुना यांच्यावरून स्पष्ट होत..
नात कोणतंही असो त्याला आपापली मोकळीक दिली की नात खुलत…सासू -सुनेचं देखील.
मी फक्त सुनांना म्हणतं नाही आहे..सासूबाईना पण हात जोडून विनंती ?की परक्या घरची पोर जेंव्हा तुमच्या घरची लक्ष्मी बनते तेंव्हा तिला ऍडजेस्ट व्हायला वेळ द्या. चुकलं तर आईच्या मायेने समजून सांगा… आणि जर नसेलच ऐकत तर मग… तुम्ही आहातच सासूबाई ???.

सुनांना देखील विनंती… की तुम्ही दुसऱ्या घरी जाता तेंव्हा तिथल्या चालीरीती बघा व शिका “माझ्या आईकडे अस..नाही. माझ्या आईकडे तस आहे.” अस म्हणून आपण चुकतो का हे तपासा.
सासू ही आई होत नसते…. खरं सांगा सून तरी मुलगी होते का??? ? 
नाही न..

मग सासूने.. आई होऊ नये. व सुनेने मुलगी होऊ नये.

जे नात आहे सासू -सुनेच तेच निभवायचं प्रेमाने, समजदारीने, कधी रागाने, कधी भांडून देखील बर का…?

कारण भांडणाने प्रेम वाढते अस ऐकलं आहे मी. त्यानुसार जगातील सासू -सुनाच एकमेकींवर जीवापाड प्रेम करत असतील नाही का??? ???

तुम्ही पण करून बघा.. हे सगळं दोघींसाठी आहे सासू व सुनान साठी.कुणा एकीला म्हणतं नाहीच आहे मी.. तरीही सांगण्यात काही चुकलं असेल तर क्षमा असावी ??
समाप्त….. ©®जयश्री कन्हेरे -सातपुते
आवडल्यास like करा.. तुमच्या तिखट.. गोड प्रतिक्रिया नक्की द्या.. आणि वाटलं काहीतरी चांगला संदेश जातोय यातून तर तो इतरांपर्यंत पोहचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका… आणि हो..मला फॉलो नक्की करा.. माझे इतर लेख वाचण्यासाठी… ©®जयश्री कन्हेरे -सातपुते फोटो साभार गुगल

प्रतिक्रिया व्यक्त करा