परिस्थितीशी लढण्याची सकारात्मकता

Written by

समस्त गाव माधवचं कौतुक करत होतं…. नुकताच त्याला कृषी विभागातील आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर भरपूर शोध लावल्याने राष्ट्रपतीच्या हस्ते गौरोवण्यात आलं होतं….. एवढं कौतुक झाल्याने त्याच्या गावातील लोकांनी त्याचा सन्मान करायचं ठरवलं होतं…… आणि त्याने गावाला मार्गदर्शन करावे या दृष्टिकोनातून एक कार्यक्रम ठेवला होता…..

कार्यक्रमाचा दिवस उजाडला….माधव ने कार्यक्रमात मार्गदर्शन सुरु केले…… मित्रहो मी तुम्हाला मार्गदर्शन करण्याइतका नक्कीच मोठा नाही पण मी जे अनुभवले….. किंवा मी हे का केले याची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे……

माझा जन्म, माझं  बालपण इथेच आपल्या गावात गेलं…. मला शिकून मोठा साहेब व्हायचं होतं म्हणून मी खूप अभ्यास केला…. इंजिनिअर झालो…. नौकरी ही मिळाली चांगली पाच आकडी पगाराची…. पण एका माणसाने केलेल्या घोटाळ्यामुळे मला आणि माझ्या मित्रांना नौकरी सोडायला लागली….. नवीन नौकरी शोधत होतो पण नौकरीच मिळत नव्हती…… साठवलेले सगळे पैसे संपले….. माझ्याकडे तरी शेती होती म्हणून मी घरी आलो….. पण बाकीचे मित्र….  त्यांचेही खूप हाल होत होते…. त्यांच्यावर त्यांचे कुटुंब अवलंबून होते……

आम्ही सगळेच वेगवेगळे इंजिनिअर होतो…. त्यातील मी मेकॅनिकल तर माझा एक मित्र chemical, आणि दुसरा biotech.तिसरा सिव्हिल इंजिनिअर.. .. मी गावाकडे आल्यावर शेतीचे हाल बघितले….. आणि मग माझ्या मध्ये काही सकारात्मक विचार येऊ लागले….. सगळ्या इंजिनिअरला एकत्र आणून त्याचा वापर शेतीसाठी केला तर??
जसं की जलस्रोत बनवणे, खतांची निर्मिती करणे, शेतीची कामे झपाट्याने करण्यासाठी काही उपकरणे तयार करणे, जैविक, अजैवीक खतांचा वापर……सुरवातीला आम्हाला हे थोडे अवघड गेले कारण पैसे संपले होते….. पण काही उधार… काही कर्ज अस करून पैसा जोडला आणि हे शक्य झाले…..

आणि  आता तर सगळ्यांची एकत्र इंडस्ट्री तयार झाली आहे…. आणि खूप मोठया प्रमाणावर आधुनिक उपकरणे आणि बाकीच्या गोष्टी तयार होत आहेत……

हजारो रुपयांनी सुरुवात झालेली आता करोडो मध्ये उलाढाल करत आहोत…… आणि तुम्हीही आधुनिक उपकरणांचा वापर केला तर वेळ आणि पैसा वाचेल आणि उत्पन्नही चांगले मिळेल…

या अनुभवाने असे लक्षात आले की मी आलेल्या संकटातून माझ्या सकारात्मक विचारांमुळे बाहेर पडलो आणि मित्रांनाही त्यातून बाहेर काढू शकलो….
#माझेलेखन

कथा आवडल्यास like करा, share करायची असल्यास नावासहित share करा.
©® डॉ सुजाता कुटे

Article Categories:
तांत्रिक

प्रतिक्रिया व्यक्त करा