पहिलं प्रेम तो आणि ती

Written by

१९९५ चं ते वर्ष, शाळेतलं ते निरागस वय

पाठीवर दप्तर घेऊन , सकाळी शाळेची ती स्कूल बस पकडायची घाई आणि भिरभिरणारी नजर सतत त्याच्या शोधात ……..त्याला पहायला आसूसलेली ती आणि

तुच्छतेने तिच्याकडे तिरका कटाक्ष टाकणारा तो ……

त्याच्या चालण्यापासून ते त्याच्या शाळेच्या ड्रेसवरचं जॅकेट निरीक्षणारी ती

आणि स्वतः च्याच मस्तीत राहणारा तो…….

कसंही करून सतत तो नजरेसमोर असावा अशा जागी उभी राहणारी ती

आणि तिच्या नजरेतला भाव ओळखून छद्मी वागणारा तो ……..

आपल्याला छान रंग नाही, आणि दिसणंही जेमतेम पण तरीही त्याने पहावं म्हणून तयार होऊन शाळेसाठी निघणारी ती आणि

आपल्यावर कोणतीही मुलगी फिदा होते ह्या भ्रमात राहणारा तो ……

दिल तो पागल है मूव्ही पाच वेळा थेटर मधे पाहून त्याच्यासाठी हिम्मत करून प्रपोज कार्ड घेणारी ती आणि

स्मार्ट मुलींच्या गराड्यात मुलींना फ्लर्ट करणारा तो …….

मला तु आवडतोस , नव्हे तर खुपच आवडतोस रे असं एकदातरी त्याला सांगून घेतलेलं प्रपोज कार्ड त्याला द्यावं, अशी पोकळ आशा बाळगणारी ती आणि

तिच्या दिसण्यावर, तिच्या रंगावर टोमणे मारणारा तो……

समजायचं तिला त्याचं हे सगळं वागणं ,पण त्या वयातल्या त्या निरागस भावना आणि त्यालाच प्रेम समजणारी ती आणी

तिच्या ह्या निरागस भावनेला खळखळुन हसणारा तो……..

कधी त्याची नजर तिला सगळं काही सांगून जायची तर कधी त्याचे कुत्सीक टोमणे …….. पण तरीही तिला तो सतत आवडायचा …… कधीतरी आपण त्याला आपल्या मनातल्या भावना सांगून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करु ह्या प्लॅनिंग मधे असणारी ती

आणि ती समोर दिसताच लांबूनच स्वतः चा रस्ता बदलून तिच्याकडे पाहत छद्मी हसणारा तो ……

तीन वर्षात एकदाही प्रयत्न करूनही त्याच्याशी एक शब्दही न बोलू शकणारी ती …..घेतलेलं प्रपोज कार्ड त्याला कधीच न देऊ शकणारी ती ……. मनात त्याच्याबद्दलचे ते सुंदर क्षण मनात ठेऊन पुढे जाणारी ती ……

आणि तिच्या मनातल्या भावना ,कधीच न समजू शकणारा अाणि सुंदरतेच्या वेगळ्याच व्याख्येत शेवटपर्यंत अडकलेला तो ……

प्रेमाच्या थोडं खाली, आकर्षणाच्या थोडं वर …….ह्याच्या मधली स्थिती होती तिची , 

त्यावेळचे ते अल्लड भाव ,निरागस भावना आणि तिच्या शब्दातलं ……तिचं ते सो काॅल्ड  प्रेम …… मनातच राहिलं रे नेहमी ……… कधी रडायची तर कधी हिरमुसायची पण कधीही एका क्षणासाठी सुध्दा तिच्यामनातलं तिचं प्रेम कधी कमी झालं नाही ……..

असच तिचं निरागस प्रेम अधुरच राहिलं………. पण त्याच्या त्या अशा वागण्याने तिला तो नकळत बरच काही शिकवून गेला……

मुळात आपल्याला कोणीतरी नाकारेल हीच भिती आपल्या मनात पक्की असते आणि म्हणूनच समोरच्याला आपण किती छान आहोत हे दाखवण्यासाठी वाट्टेल तसा हट्ट करायला आपण तयार होतो, आणि नेमकं ईथेच आपण चूकतो कारण, ज्या व्यक्तीला आपण आवडतो ना……., ति व्यक्ती आपल्याला आपल्या गुण आणि दोष ह्या दोन्ही गोष्टी सहीत स्विकारत असते ,म्हणून तिथे भावना महत्त्वाच्या असतात दिसणं आणि बाकी गोष्टी यांना तिथे महत्त्व राहत नाही …….म्हणूनच आपण आहोत तसेच छान आहोत आणि त्या छान पणाला अजून चांगलं करायचं असतं ते आपल्या कलागुणांनी……. पण कधीही समोरच्याला इंप्रेस करायच्या नादात स्वतः चा सेल्फ रिसपेक्ट कधीच गमवायचा नसतो.

समोरच्याला आपल्याला हिणवायचा चान्स कधीच द्यायचा नसतो आणि महत्वाचं आपण जशे आहोत तसच आपण स्वतःनेही स्वतः ला स्वीकारायलं हवं ……

आयुष्यात काही घटना आपल्याला खुप काही शिकवून जातात म्हणूनच तर  आयुष्यात काही गोष्टी खुप महत्त्वाच्या असतात मग त्या  मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही…………

©Sunita Choudhari.

(मित्र-मैत्रीणींनो मजेत आहात ना?  आणि  हे  वाचून जुन्या आठवणीत गेलात की नाही?? हे जे लिहीलय त्यात सगळंकाही खरं आहे …… जे घडलं त्याला शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलाय ? ह्या आधी हे प्रतीलीपी , माँम्सप्रेसो  तसेच फेसबुक पेजवर प्रकाशित झालेलं आहे…….. वाचून आपला अभिप्राय नक्की कळवाल ….. लेखनाचे हक्क लेखीकेकडे राखीव आहेत  )

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत