पहिला दिवस शाळेचा………..

Written by

अनिश आमचा मुलगा… बघता बघता तीन वर्षांचा झाला… आणि आम्हाला वेध लागले त्याला शाळेत टाकण्याचे..

आजूबाजूला काही मुलं त्याच्या पेक्षा लहान असूनही शाळेत जायला लागली होती.. शाळा म्हणजे play group ला पाठ्वण्यासाठी आम्ही तयारीला लागलो…

अनिश पण आमचं पाहून मला शाळेत जायचंय असं म्हणू लागला.. अजून शाळा सुरू व्हायला 2-3 महिने होते.. मात्र अनिश एवढा तयारीला लागला होता की एकदा सहज म्हणून फिरायला गेला असताना त्याच्या आज्जी कडे हट्ट करून त्याने शाळेत जाण्यासाठी दप्तर आणले…

नवीन दप्तर घेऊन, पाठीला लावून, चकरा मारून झाल्या.. आणि” मम्मा मी रोज शाळेत असा जाणार”… अशी प्रतीज्ञा पण झाली….

अशा या रोजच्या चकरांमध्ये नवीन दप्तर पूर्ण तोडून झालं…

आणि अखेर तोच शाळेचा पहिला दिवस उगवला…

नवीन डब्बा, warter bag, दप्तर, आणि डब्ब्यात आवडीचा खाऊ अशा जय्यत तयारीत स्वारी निघाली…

ममा मी शाळेत गेल्यावर Mam ला म्हणणार “Good Morning!”…. इति अनिश…

जसं बाळाला शाळेत उतरवले तसं नवीन वादळ सुरू झालं..

ज्या वेगाने अनिश शाळेत गेला त्याच वेगाने परत बाहेर आला…

“आणि मला घरी जायचं”… म्हणून मोठया मोठ्याने रडू लागला…

त्याला परत गेटच्या आत घेण्यात आले… गेटच्या आत शाळेमध्ये तर जणू तू मोठ्याने रडतो का मी ? अशी स्पर्धाचं सुरु होती..

कावरेबावरे बाळांचे चेहरे जसे गेटच्या आत होते…

तसेच काहीसे कावरेबावरे चेहरे गेटच्या बाहेरही होते… त्यांच्या पालकांचे…

Regular timing मध्ये शाळा सुरु व्हायला अजून अवकाश होता..

त्यामुळे मुलांना सवय होईपर्यंत शाळा थोडाच वेळ असणार होती…

मात्र शाळा सुटेपर्यंत फक्त आणि फक्त्त रडण्याचाच आवाज येतं होता…

सर्व मुले अगदी एक सुरात रडत होते.. चुकुनमाकून एखादा रडायचं थांबलाच तर आजूबाजूचे अजून मोठ्याने रडून त्याला परत आठवण करून देत होते…

शाळा संपली… अनिश बाहेर आला..

सकाळी शाळेत गेला होता तेव्हा मस्त ड्रेस, चोपून पाडलेला भांग, fresh चेहरा आणि शाळा सुटली तेव्हा चुरगळलेला ड्रेस,विस्कटलेले केस अन रडून रडून गालावर पडलेले डाग असा लक्षात येण्याजोगा बदल होता…

शाळेतून बाहेर पडल्यावर त्याने एक सुटकेचा निश्वास टाकला… आणि “ममा मी शाळेत नाही जाणार “, तो म्हणाला….

आम्ही घरी आलो…

“बाळा तुझी शाळा किती छान आहे ना… मला खूप आवडली” ..

असं आपण, पॉसिटीव्हली म्हटलं की “ममा मी शाळेत नाही जाणार !”

दोन्ही डोळ्यात तुडुंब पाणी आणून अनिश म्हणायचा….

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यापासूनच “ममा मला शाळेत नाही जायच”; असा धोशा सुरु झाला….

आणि बाळा शाळा कशी छान असते हे आम्ही त्याला पटवून देउ लागलो….

baby dove Casio babydove
अनिशचा शाळेत न जाण्याचा निश्चय पक्का असल्यामुळे शाळेत सोडताना तूला गाडीवर चक्कर मारायला नेतोय असं खोटं सांगून शाळेत न्यावे लागलं ..

त्याला शाळेत सोडल्यानंतर त्याने असा काही गोंधळ घातला की विचारता सोय नाही…

जेव्हा आई बाबा नजरेआड झाले आणि आता आपल्याला आता इथेच रहायचं आहे हे त्याच्या लक्षात आले तेव्हा “मला झोकयावर बसायचं ना” म्हणून तो रडू लागला…

मॅडमनी जेव्हा त्याला बसवलं तेव्हा” मला भूक लागली ना” म्हणून तो रडू लागला….

जेव्हा त्याला खायला डब्बा दिला तेव्हा” मला भूक नाही लागली ना “; म्हणून अजून जोरात तो, रडू लागला…

रडणं मात्र शाळेची वेळ संपेपर्यंत continue सुरूच होतं…

संध्याकाळी कधी चक्कर मारायला त्याच्या शाळेच्या रस्त्यावरून गेलो तर” मला शाळेत नाही सोडणार ना “, असं तो काळजीयुक्त स्वरात विचारू लागे…

त्याचं एकंदरीत शाळेवरचं प्रेमं पाहता आपण याला शाळेत टाकायची घाई तर नाही केली ना असं मला वाटू लागलं…

शाळेत जाताना न चुकता अनिश रडत असे… हे सतत महिनाभर सुरू होते..आता आजूबाजूला सर्वांनाच समजलं होतं की अनिश शाळेत जातोय..

आता त्याला गाडीवर नेताना मध्ये बसवून न्याव लागे… आणि अर्थातच घरापासून ते शाळेत पोहचेपर्यंतचा प्रवास हा रडत रडतच असे..

तो शाळेत गेल्यावर परत येईपर्यंत दरम्यानच्या काळात त्याचं रडणं आठवून मी इंटरनेट वर home schooling, म्हणजे काय असते याचाही शोध घेतला…

शनिवार -रविवारी शाळेला सुट्टी असल्यानं घर आणि मन खूप शांत शांत वाटायचं…

सोमवार उजाडला की खरंच अनिशला शाळेत जायला आवडेल की नाही अशी शंका मला वाटू लागली होती ….

आणि माझी आई, सासू बाई मात्र अगं लहान आहे तो अजून.. म्हणून रडतोय… हळू हळू होईल त्याला सवय…

तू पण रडायची शाळेत जातांना… असं म्हणून आई आणि नवरा पण कसा लहानपणी शाळेत जातांना कसा त्रास द्यायचा हे सांगून मला धीर देत होत्या …

त्यांचे हे शब्द खरंच खरे झाले… अनीशला शाळा हळू हळू आपलीशी वाटू लागली.. आमच्या मॅम असं म्हणाल्या.. … आम्हाला हे शिकवलं…

आज आम्ही शाळेत अशी गंम्मत केली…आमच्या शाळेत झोका आहे… असं तो कौतुकाने सांगू लागला…

सांगायच तात्पर्य असं की एक पालक म्हणून आपण आपल्या बाळाला समजून घेतलं पाहिजे… कारण हा त्याच्या आयुष्यातला खुप महत्वाचा टप्पा असतो…आणि शाळेची आवड किंवा भिती याचं काळात तयार होते…

आजही आपण आपल्या शाळेच्या आठवणीने हरखून जातो…

शाळेचे हे सोनेरी दिवस काही परत येत नाहीत…

जेव्हा शाळेत जाण्यासाठी मुलं नाही म्हणत किंवा त्रागा करत तेव्हा त्याच्या बरोबर ती, आपलीही कसोटी असते.. आणि मुलं रडत असताना त्याला न रागावता, शांतपणे परत परत तेच समजून सांगणं ; हे जमणे फार मोठं stress managment च काम आहे असं माझं मत आहे….

कारण एरव्ही घरात रडत असताना आपल्या डोळ्यासमोर आपलं मुलं असतं मात्र शाळेत त्याला रडत असताना तसंच रडत सोडून घरी येताना आपले पाय आपोआपच जड होतात…. आणि तेव्हाच आपलीही कसोटी असते…

आणि कितीही त्रास झाला तरी मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी त्यांच्या सोबत थोडं कठोर वागण्याशिवाय गत्यंतर नाही..

तुम्हाला काय वाटत? नक्की सांगा…

Article Categories:
शिक्षण

प्रतिक्रिया व्यक्त करा