पाऊस….शेतकऱ्यांचा….

Written by

पाऊस….शेतकऱ्यांचा….

            गळत घर…गळत छप्पर…

राहायला नाही स्वत:चे घर…

तरीही पाऊसाची वाट बघतोय….तो माझा शेतकरी II

धान्य धुन्य, भाजी पाला, पीक पाणी..

उधळूनी जातोय पाण्याखाली..

चिंता त्याची सर्वोपरी..जीव नसतोय जागेवरी

तरीही पाऊसाची वाट बघतोय….तो माझा शेतकरी II1II

जमीन, मालमत्ता,  अंथरून, कपडे..

उधळूनी जाते क्षणोक्षणी..

बघण्याशिवाय पर्याय नसतो…मुरझूनी जातोय मनोमनी

तरीही पाऊसाची वाट बघतोय….तो माझा शेतकरी II2II

टपोरे थेंब, विजांचा मारा, पावसाच्या धारा..

मृत्यू चा अभास कणाकणातुनी…

कष्टाशिवाय भाकर नाही…जाणतोय तो तळातुनी…

तरीही पाऊसाची वाट बघतोय….तो माझा शेतकरी II3II

 

 

                                                                   सरिता खरबडे पुनसे

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत