पावसात एकदा

Written by

पावसात एकदा

पावसात एकदा भेटायचय तुला.पावसातच का ?अस विचारशील.
पण हो.पावसातच भेटायचंय.पावसातली संध्याकाळ हुरहूर लावणारी आणि ओढ लावणारी असते म्हणून. पावसात एकदा भेटायचंय.
माझ्या ओढीला बंधन आहेत ती पाऊसच झुगारून देऊ शकतो.म्हणून पावसात एकदा….. भेटायचंय.

नजरेतच अडलेले मन पाऊस मोकळं करेल.

पण भीती वाटते कधीकधी की हा पाऊस इतका घातकी आहे ना,की मन नुसतं मोकळं नाही तर अनिर्बंध करेल……

ही भीती असली तरीही एकदा अनिर्बंधही होऊन बघायचंय.”म्हणूनच एकदा पावसात भेटायचंय.

एकदा भान हरपून तुझ्यात रमून जायचंय…..

हे भान हरपण हा पाऊसच शिकवतो……म्हणून पावसात एकदा………

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा