पुन्हा नव्यानं तुझी भेट घडावी…❤

Written by

पुन्हा नव्यानं तुझी भेट घडावी…❤

पुनर्जन्म झाला तर …

माझ्या मनाच्या कोंदणी तुझी प्रीत जडावी ।
पुन्हा नव्यानं तुझी भेट घडावी ।।
सहवासात तुझ्या माझे अंतरंग उजळावे ।
नयनी माझ्या तुझे प्रतिबिंब झळकावे ।।

आगमनाने तुझ्या नवे प्रेमांकुर फुटावे ।
कात टाकुनी जुनी पुन्हा नव्याने बहरावे ।।
स्पदंनात हृदयीच्या तुझे अस्तित्व जपावे ।
विसरुनी माझे मी पण तुझ्यात एकरूप व्हावे ।।

शेवटच्या श्वासापर्यंत तुझी साथ असावी ।
मनमंदिरात माझ्या तुझ्या प्रीतीची ज्योत जळावी ।।
नाते तुझे माझे असावे जन्मजन्मांतरीचे ।
दूर कुठेतरी क्षितिजा पलीकडे विश्व दोन जीवांचे ।।

पुन्हा नव्यानं तुझी भेट घडावी ।
पुन्हा नव्यानं तुझी माझी प्रीत जुळवी ।।

© सुनीता पाटील.

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा