पुन्हा नव्यानं…♥

Written by

ते दोघे मावळतीच्या सोनेरी रंगात न्हाऊन निघाले होते… आपल्या सोनेरी भविष्याच्या सुंदर स्वप्नात हरवले होते…
त्याने तिचा हात हातात घेतला, आणि तिने अलगद आपले डोके त्याच्या खांद्यावर ठेवले…ती म्हणाली “मी तुला कधीच सोडून जाणार नाही, तु असचं नेहमी मझ्यावर प्रेम करशील ना?…त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागेल…आणि तो भूतकाळात गेला…
दोघांचा सुखी संसार…संसाराच्या वेलीवर दोन सुंदर फुलं…
पण नियतीला काही औरच मंजूर…एका अपघातात तिचा स्मृतिभ्रंश होतो…आणि तो हवालदिल…ती सगळ्यांनाच विसरते तिचे आईबाबा, तिची पिल्लं, आणि त्यालादेखील…
तिचं शुन्यात नजर लावुन स्वतःच अस्तित्व शोधणं…आणि त्याच तिला जीवापाड जपणं…ह्यातच तिचं नव्यानं त्याच्या प्रेमात पडणं…स्वतःच्याच संसारात,आणि पिल्लांमध्ये नव्यानं रमण…♥
आज जवळ-जवळ दोन वर्षांनी ती त्याला गवसली होती नव्यानं!!!!!♥

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत