पुरग्रस्तांचा देवदूत ….!!

Written by

?पुरग्रस्तांचा देवदुत…..!!

कांही माणसांना अलौकिक साहस जन्मताच मिळते….अस्मानी संकटांचा सामना करताना अशी माणसे समाजाला माणुसकीचा वेगळा धडा शिकवतात.
कृण्णा नदीकाठी महापुराने थैमान घातले असताना माणसाच सारे जीवनच उद्ध्वस्त झाल होत.अशावेळी स्वतःचा जीव धोक्यात घालुन दुधोंडीपासून दोन तीन किलोमीटरवरील माळी वस्ती , सती आई मंदिर परिसर व जुने घोगाव अशा भागातील पूर बाधित सुमारे पाचशे पेक्षा जास्त नागरिकांना आपल्या छोट्यांचा काहिलीव्दारे सतत चार दिवस तीनशे फेर्या मारुन पुरातुन सुरक्षितपणे बाहेर काढणारा हा पंच्चावन वर्षाचा अवलिया म्हणजे रामदास उमाजी मदने…..आपल्याला आश्चर्य वाटणारी हि बाब सांगली जिल्ह्यालाच नव्हे तर पुर्या महाराष्ट्राला अभिमान अशी कामगिरी साठीकडे झुकलेल्या माणसाने केली आहे.दुधोंडी तालुका पलुस जिल्हा सांगली येथे राहणारा हा माणुस नदीकडेच्या घरात राहुनही माणुसकीचा झरा त्याच्यातुन खळाळून वाहताना दिसला.या माणसाचे घर जमिनीपासून दहा फुट अंतरावर असुनसुद्धा घरात चार फुट पुराचे पाणी शिरले होते तरीही या माणसाने आपले कुटुंब इतरत्र हलविले परंतु महापुराच्या पाण्यात आपण मात्र स्वतः दिवसभर छोट्याशा काहिलीव्दारे आपल काम सुरु ठेवून ५०० नागरिकांना पुरातुन बाहेर काढण्याचे काम सलग चार दिवस तीनशे फेर्यातुन केले आहे.शिवाय रात्र झाली तर हा माणुस घराच्यावर झोपत होता व त्याचा पुतन्या विजय मदने वेगवेगळ्या ईमारतीवरुन त्याला जेवण पोहचवत होता.असा हा निस्वार्थी माणूस शोधुन तरी सापडेल का .? एवढे महान कार्य करुन सुद्धा प्रशासानाने अथवा कोणत्याही शासकीय आधिकार्याने साधी दखल देखिल घेतली नाही.एकदा कुंडल पोलीस स्टेशनच्या फौजदार मॕडम आपल्या पोलीसासह पुरग्रस्त ठिकाणी आल्या त्यांना रामदास मदने यांनी आपल्या काहिलीत बसवुन माळी वस्तीवरुन फिरवुन काठावर आणुन सोडले त्यावेळी त्या म्हणाल्या “बाबा तुम्ही छान काम करता..!! ” यापलीकडे त्यांना कोणत्याही प्रकारची शाबासकीची थाप अथवा मदत मिळालेली नाही.
छोट्याशा कायलीतुन पुराच्या पाण्यातुन तीनशे फेर्या मारत पाचशे पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणार्या माणसातील अमाप ईच्छाशकीतीचा अपरिमित आदर करावासा वाटतो. समाजातील अशी माणसे देव नैसर्गिक संकटाच्यावेळी ब्रमस्रासारखी बाहेर काढतो..तो देवदुताच्या रुपाने.. सर्वांना नवसंजीवनी देतो…नवे जीवन देतो…पुन्हा बहरण्यासाठी…..

रामदास उमाजी मदने या अवलियाच्या कार्याला लाख लाख सलाम…..!!

✍नामदेव पाटील .

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत