पुस्तक

Written by

ती फिरतफिरत त्या शेल्फपाशी आली…

वरून तिसऱ्या आणि खालून चौथ्या फळीवरच ते भगवत्गीतेसारखं जाड पुस्तक तिनं उचललं..

इतक्यात शेजारी बादली आपटल्याचा आवाज आला..

साफसाफई करणाऱ्या मावशी कामाला लागलेल्या होत्या…त्यांच्या कामात लुडबुड नको म्हणून ती हातातला  कॉफीचा मग घेऊन जिन्याखालच्या कोपऱ्यातल्या टेबलवर जाऊन बसली…

लाइब्ररीतलं ते वातावरण ती आज खूप वर्षांनी अनुभवत होती.पुस्तक वाचायला,कॉफी घ्यायला किंवा नुसत्याच गप्पा मारायला ती इकडे यायची.ग्रुपचा अड्डाच झाला होता हा !

आज फारशी गर्दी नव्हती.वेळ सकाळची होती त्यामुळं गर्दी व्हायला अजून वेळ होता.

एखादा दुसरा ग्रुप दिसत होता,एखादी दुसरी स्पर्धा परीक्षा देणारी देखील मंडळी वाचन करण्यात गुंतली होती,मागे छान मंद Symphony ऐकू येत होती आणि हातात वाफाळत्या कॉफीचा मग होता….

 

.कॉफीचा एक सिप घेतल्यावर तिनं ते पुस्तक हातात घेतलं पण लगेच  उघडलं नाही..

त्या पुस्तकाचा रंग,त्याच ते कव्हर,त्याचा वास,तो स्पर्श  सगळंसगळं ओळखीचं होत तिच्या !

त्या पुस्तकाकडे बघताना तिच्या चेहऱ्यावर काहीतरी मिळवल्याचा आनंद दिसत होता…

तिनं आजुबजुला एकदोनदा नजर फिरवली पण तिच्या आसपास कुणीच दिसत नव्हतं.इतक्या सकाळी लायब्ररी मध्ये कुणी येण्याचा प्रश्नच नव्हता..शेवटी तिथं कुणी नाही हे बघून तिनं पुस्तकाचं मधलं पान उघडलं…

कधीकाळी ‘तो’ याच मधल्या पानावर चिट्ठी ठेवायचा !!

 

 

आजही एक चिट्ठी तिथं होती…..!!

 

“Surprissseeee”

ओरडत तिच्यासमोर तिचे कॉलेजचे  बरेच Classmates कल्ला करत  हजर झाले…..

आणि या सगळ्यांच्या मागून ‘तो’

हातात तिच्या वाढदिवसाचा cake घेऊन !!

 

काही क्षणात बाकी सगळे आले तसे पटापट निघून गेले…

आता पुढचे काही क्षण फक्त त्या दोघांचे होते…!!

Article Tags:
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत