पूरग्रस्तांना मदतीचा हात : दातृत्वाचा परिमळ…!!

Written by

?पूरग्रस्तांना मदतीचा हात : दातृत्वाचा परिमळ ….!!

संकट ही सांगून येत नसतात .लहान – सहान संकटांचा सामना तुम्ही कसातरी करु शकाल पण नैसर्गिक संकटांच्यापुढे मानवाला हतबल व्हावे लागते.सध्याच पावसाने हाहाकार माजवल्यामुळे प्रचंड महापूर आला.महापूराच्या धक्यातुन आजुनही पूरग्रस्त सावरलेले नाहीत.

कोल्हापूर , सांगली भागात पूराची भीषनता भयानक होती.पावसाने कहर केल्यामुळे पाण्याची पातळी वाढतच चालली होती.नदीचे पात्र , शेतीवाडी सगळे गिळंकृत करत होती पण पुराचे पाणी जेंव्हा घराच्या उंबर्याला लागते तेंव्हा काय मनाची अवस्था होत असेल..!! घरे , दारे , शेतीवाडी सगळ पाण्याखाली गेलं…सारा संसार उध्वस्त झाला..स्वनांचा चक्काचुर झाला…सार होत्याच नव्हत झाल…दुडूदुडू धावणार अंगण गेल…जे वासरु गायीसाठी हंबरत होतं ते तडफडून मेल…ज्या बैलांनी शेतात घाम गाळला होता ती बैलं दाव्याला मेली… धान्यासकट सार कांही बुडाल….पीकांनी तर केंव्हाच प्राण सोडला होता…किती विदारक सत्य होत हे … मानवाने कितीही प्रगती केली तरी नैसर्गिक संकटांच्यापुढे मानवाचे शहाणपण कुचकामी ठरते.

पूर ओसरला …आणि आपली संस्कृती कामी आली…ज्या संस्कृतीने सार्या जगाला धडा दिला त्या संस्कृतीतील माणुसकी कामाला आली.पूरग्रस्तांना सर्व प्रकारची मदत मिळू लागली.लाखो हात मदतीसाठी धावू लागले …..पूरग्रस्तांना मदतीचा ओघ वाढला…अनेक कलाकार…सेवाभावी संस्था…तरुण मंडळे…सामाजिक प्रतीष्ठान….यांच्याकडून भरीव मदत मिळू लागली …गावोगावी मदतीसाठी हात सळसळू लागले ….पूरग्रस्तांना प्रत्यक्ष मदत मिळू लागली. धान्य , जीवनावश्यक वस्तु , कपडे , यासारख्या मदतीने पुरग्रस्तांचा दिलासा मिळाला.अनेक स्थलांतरीत पूरग्रस्त आपला संसार नव्याने मांडण्यासाठी धडपडू लागले…महापूराने माणसातील माणूसकी कामाला आली….निसर्गाने जरी संकट दिल असले तरी माणुसकीने त्यावर मात केली होती…मदतीचीच्या ओघाने सर्वत्र दातृत्वाचा परिमळ पसरला होता….!!

पूरग्रस्तांनी नव्या जोमाने , नव्या उर्जेने आपले संसार उभा करावेत हिच सदिच्छा…!!

✍नामदेव पाटील.

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा