पैठणी आणि आठवणी – मास्टर

Written by

पैठणी अत्यंत सुंदर ,कोरीव, भरजरी असे महाराष्ट्राचे महावस्त्र. हे सारे काही विलोभनीय वाटत असले तरी ही सुरेख कला जोपासणारे आणि पुढे नेणारे हात फार थोडे आहेत आणि अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत त्यातलेच एक म्हणजे आमचे मास्टर. हा आता मास्तर म्हणजे अनुभवी विणकर म्हणा हवा तर,
पारंपरिक पैठणीची कला जोपासली, पुढच्या पिढीलाही शिकवली.आमच्या साऱ्या पैठण्या तेच विणत, ग्राहक सुखी तर ते समाधानी पण दुर्दैवाने त्यांची प्रकृती खालावली आणि अचानक ते आम्हाला सोडून गेले, कुशल कारागीर गमवावा हे आमचं दुर्भाग्य.
गेले तेव्हा ते आमच्या साठी एक साडी तयार करत होते. ती अपूर्ण राहिली . तिचे काठ आपण जरा वेगळे करू अस रचना ठरवताना ते म्हणाले होते तेव्हा त्यांच्या मनात काहीतरी खूप छान असेल असे वाटले होते,पण ईश्वरी इच्छा; त्यापुढे आपलं काहीच चालत नाही.

साडीचा काठ सोडून बाकी पूर्ण काम झाले आणि त्यांचे निधन झाले .त्यांची मुलं साडी पूर्ण करून द्यायला तयार होती पण का कुणास ठाऊक मला ती अपूर्ण साडी सुद्धा अप्रतिम कलाकृती वाटत होति. मी आजपर्यंत ज्याकाही साड्या विकल्या त्या प्रत्येक साडीची एक गोष्ट होतीच , एक भावनिक पदर सगळ्याच पैठण्यांशी जोडला गेलाय त्यात ही आणखी एक साडी.

फोटोत दिसेल तुम्हाला आमच्या मास्टर चा मास्टरपीस..
धन्यवाद मास्टर ….

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा