पैशांना महत्व कितापत

Written by

मला तर अगदी वेल सेटल्ड , चांगली सॅलरी असणारा , आणि मुख्य म्हणजे स्वतःच घर आणि कार असणारा नवरा पाहिजे बाकी पाहायला येणाऱ्या मुलाला मी भाव पण देणार नाही अशा अनुश्री च्या बोलण्यावर मनस्वी मनसोक्त हसू लागली , अग वेडे मग तू इंजिनिर कशाला झालीस तुला जर असाच मुलगा पाहिजे तर?

जर मुलगा मनाने चांगला असेल , समजूतदार असेल आणि एक ठीकठाक नोकरी असेल इंजिनीरिंग केल्याचा हिशोबाने तर बस ,
माझी काही स्वतःच असा घर आणि कार वगैरे असला काही स्वप्न नाही बाई , आम्ही दोघे लग्नानंतर उभा करू की घर न कार आणि अजून भरपूर काही , असा स्वतंत्र विचाराची मनस्वी ,

दोघीही इंजिनीरिंग च्या शेवटच्या सेमिस्टर ला , एकदम जिवलग मैत्रिणी पण विचारसारनी अगदी भिन्न।
इंजिनिरिंग झाल्यानंतर घरी लग्नासाठी मूल पाहायला सुरवात झाली , मनस्वी ने जॉब करायचं मनावर घेतला आणि अनुश्री ने पोस्ट graduation करायचा म्हणून ME ला ऍडमिशन टाकला , अनुश्री ला मात्र वेल सेटल्ड मुलगा हवा होता म्हणून तिच्यासाठी स्थळ शोधायला थोडा वेळ लागला ,

या कालावधीत मनस्वी च लग्न पण झालं सागर सोबत अगदी मनस्वी ला पाहिजे तसाच मुलगा मिळाला, समजूतदार , मनमिळाऊ , तो वेल सेटल्ड नव्हता पण मनस्वीची ही तशी काही अट नव्हती ,

काही दिवसात अनुश्री ही विवाह बंधनात अडकली , तिला ही तिच्या इच्छेनुसार
वेल सेटल्ड , चांगली सॅलरी असणारा , आणि मुख्य म्हणजे स्वतःच घर आणि कार असणारा मुलगा तिच्या आईबाबांनी शोधून दिला, आणि खऱ्या अर्थाने दोन्ही मैत्रिणी संसाराला लागल्या , अनुश्री ने post graduation नंतर घर सांभाळण्याचा निर्णय घेतला, अनुश्री ला असा वाटे की जर आपल्या नवऱ्याची आर्थीक स्थिती जर चांगली आहे तर मला जॉब करण्याची काहीच गरज नाही आणि राजीव तिचा नवराही तिच्या मताशी सहमत होता ।

मनस्वी आणि सागर दोघेही जॉब करत होते , काही दिवसातच त्यांनी स्वतःच घर घेतलं , सागर ला मनस्वी चा खूप अभिमान वाटे , तो नेहमी तिला बोलायचा किती मदत करतेस मनू तू मला माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी ,
खर तर घर वगैरे घेणं ही माझी जबाबदारी आहे पण तू कधी असा भासवू देत नाहीं , किती करतेस माझ्यासाठी ?

त्यावर मनस्वी नेहमी हसून उत्तरे देत , आपल्या दोघांचंच तर आहे सगळं , तुला मदत केली म्हणून काय झालं , त्यामुळे सागर च्या मनात मनस्वी बद्दल प्रेम आणि रेस्पेक्ट वाढू लागला, एकापाठोपाठ मनस्वी न सागर प्रगती करू लागले , त्यांनी एक वेल सेटल्ड आयुष्य निर्माण केला , त्यात मनस्वी ची नेहमीच सागर ला साथ आणि मदत असल्याने सागर साठी मनस्वी म्हणजे त्याच सगळं काही होती ,

अनुश्री चा housewife होण्याचा निर्णय फार समाधान कारक ठरला नाही , काही दिवसातच राजीव ला जाणीव होऊ लागली आपण आपला विश्व खूप मेहनतीने स्वतःच स्वतः उभा केला, यात अनुश्री चा काहीच सहभाग नाही , ती मात्र माझ्याच पैशावर आरामात जगतेय , मग मात्र दोघनमध्ये वादविवाद सुरू झाले , अनुश्री ला रेस्पेक्ट देना कमी होय लागला , महागडे कपडे , महागड्या वस्तू , सगळी सुख अनुश्री च्या पायाशी लोळण घेत होते , पण एका नवऱ्याकडून जो सन्मान , आधार आणि प्रेम मिळयला पाहिजे ते मात्र कुठेतरी हरवला होता, राजीव ला फार गर्व वाटायचा स्वतःच्या संपत्तीचा , पैशांचा , तो अनुश्रीला सारखे टोमणे मारायचं हे घर माझं आहे , ही सगळी महागडी सुख फक्त माझ्यामुळे तुला मिळतात, तुला त्यासाठी कधी कष्टाचं पडले नाहीत , तुला काय किंमत असणार याची , अनुश्री या रोजच्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळली होती ,ती खूप बाजू सवरन शांत राहण्याचा प्रयन्त करी पण राजीव तिच्यावर राग काढण्याची संधी कधीच सोडत नसे,

आता मात्र अनुश्रीला तिच्या वेल सेटल्ड , चांगली सॅलरी असणारा नवरा या विचाराची घृणा वाटू लागली।

विषय अगदी घटस्फोट पर्यंत येऊन ठेपला, अनुश्री माहेरी आली , काय करावं , कसा वागावं तिला काही समजताच नव्हता,
मनस्वीला हे कळताच ती अनुश्री ला भेटायला गेली , तिने तिला धीर दिला, स्वतः शिकलेली आहेस काम कर, स्वतःच अस्तित्व निर्माण कर , अनुश्री ने मास्टर ऑफ इंजिननेरिंग केलाय मग तिने लेक्टरशिप जॉईन केली पुढे तिने पीएचडी केली , पुढच्या काही इयर्स मध्ये ती प्रिन्सिपॉल बनली, राजीव ने या काही वर्षांत अजिबात ही अनुश्री ची दखल घेतली नाही, त्याला त्याच्या हाई प्रोफेसनाल जॉब खूप गर्व झालेला, त्याला त्यापुढे अनुश्री दिसलाच तयार नव्हती,

एकदा एका कंपनीच्या प्रोग्राम मध्ये अनुश्रीला चिफ गेस्ट म्हणून बोलावतात,न तिच्या हस्ते परितोषिक वितरण पण होणार होता, तीच हॉलमध्ये आगमन होताच एकदम टाळ्यांचा कडकडाट झाला, काहीच वेळात तिने प्रमुख पाहुण्यांचा आसन ग्रहण केला , ज्या कंपनीत राजीव काम करत होता त्याच कंपनीच्या प्रोग्रॅम मध्ये अनुश्री चीफ गेस्ट असते , ही इथे काय करतेय , राजीव मनाशीच पुटपुटला, पण त्यालाही काही कळेना, प्रोग्रॅम मनजमेंट ने अनुश्री ची ओळख करून दिली आणि पारितोषिक वितरणाला सुरवात झाली, राजीव ला बेस्ट एम्प्लॉयी अवॉर्ड जाहिर झाला , तो त्याला अनुश्री च्या हातून घेताना शरम वाटू लागली , आणि अनुश्रीही एकदम राजीव ला पाहून चपापली

प्रोग्रॅम पार पडल्यावर राजीव ला आपल्या चुकीची जाणीव झाली ,
तो अनुश्री ची माफी मागू लागला,
अनुश्री बोलू लागली, ” housewife होण्याचा निर्णय दोघ्याच्या संमतीने झाला होता, म्हणून तू माझा अस्तित्व च विसरलास?माझ्यातली कॅपबिलिटी विसरलास? पैशापुढे माझी किंमत करू लागलास?

मला मफ कर अनु ,
घरी परत चल, नाही राजीव सगळं संपलाय, मी त्या घरी परत येणार नाही , फक्त पैशासाठी तू बायकोची थट्टा माँडलीस, जग की तुझ्या पैशांसोबत, तुझ्या विचारसरणी प्रमाणे पैसे असेल तर तू काही पण करू शकतोस, मग त्या पैशानच तुझी बायको समज आणि जग,

अनुश्री त्याच काहीच ऐकण्याच्या मानस्थितीत नव्हती,
अनुश्रीला एवढ्या वर्षे नवऱ्याकडून विनाकारण होणाऱ्या त्रासातून बाहेर पडून स्वतःचा अस्तित्व निर्माण केल्याचं समाधान ,
आणि राजीव ला फक्त पैशाच्या, मोठ्या पदाच्या अतिघमंड पायी अनुश्रीलं गमावन्याच दुःख।

©Best one
कथा आवडल्यास शेअर करायला विसरू नका, कथा कॉपराईट सहित शेअर करा

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत